तू कितीसा उजेड पाडलास?
सोमिवरच्या पोष्टी पाहून विचारलेच त्याने एकदा
बरा वेळ मिळतो तुम्हाला बघावं तेव्हा पडीक असायला.
सतत ऑनलाईन दिसता; रिकामटेकडे आहात का?
आता आली वेळ बौद्धिक घेण्याची या वैतागेश्वराची
म्हणालो "तुला रे का इतकी काळजी इतरांच्या वेळेची?"
गरज काय दुसर्याच्या खाजगी जीवनात डोकावायची?
४७ नंतर विज्ञानातली किती नोबेल मिळाली भारताला?
की मिळाले एखादे ऑस्कर इथल्या उत्कृष्ट सिनेमाला?
बघ करतोस का प्रयत्न यातले एखादे मिळवायला?