कविता

आतल्या आत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 8:33 pm

संदर्भचौकटी मोडून पडल्या तेव्हा
मी अधांतराचा धरला अलगद हात
मग रिक्तपणाने भरलो काठोकाठ
अन् ओसंडून सांडलो आतल्या आत

धगधगून निखारे विझून गेले तेव्हा
मी हिमपातावर कसून केली मात
मग पलित्यातळिच्या अंधारात बुडालो
अन् लखलख तेजाळलो आतल्या आत

भ्रमनिरास बनले जगणे सगळे तेव्हा
मी सुखस्वप्नांचा सहज सोडला हात
जरी भोवतालच्या कोलाहली विस्कटलो
उलगडलो अवघा पुन्हा आतल्या आत

कवितामुक्तककविता माझी

तोरण मरणाचे

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 7:55 pm

नोट :मूर्ख या कर्नलतपस्वी यांच्या कवितेला रिप्लाय देताना हि कविता लिहिली गेली.. या कवितेचे श्रेय त्यांना आणि त्या मुळ कवितेलाच..
---
.

आयुष्याच्या क्षितिजापाशी
भावनांचा उडतो कल्लोळ..
मागे जीवनाचे सैल धागेदोरे
अन पुढे असते तोरण मरणाचे

पक्षी उडून जातात घरट्यात
अन स्तब्धता उरते मागे...
हसत दिवस जातो खोटाच अन
मग रात्र सावरण्यास येते..

प्रकाश शोधण्या जीवन संपते
अन क्षितिजावरती कळते शेवटी
अंधार असतो खरा सोबती
तोच सुरुवात..अन तोच शेवट..

कविताआयुष्य

वार्‍याने पेटते रान आता हे ..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 2:50 pm

घामाच्या चिंब भरलेल्या सदर्‍याला
ठिगळे अनेक रंगबेरंगी..
पोटाच्या खळगीसाठी उगाच चालली
बेसुमार झीज पायाची ..

वार्‍याने पेटते रान आता हे
कशास विचार फुका..
होरपळले शेत जरी हे
ढेकळाचा रंग काळा तो काळाच..

ठिंणगी बनलेला विचार तुझा
तू दूर आकाशातील तारा ..
ओसाड ह्या जगण्यावरती
उगा बुजगावण्यांचा पहारा..

दगडाला कुठे फुटतो पाझर ?
कुठे शोधु देवपण त्याच्यात ?
जन्मलो मातीत या
पुन्हा मातीत मिटण्यासाठी...

-- शब्दमेघ
(शीघ्रकाव्य, २१-०२-२०२१)

कवितामुक्त कविता

प्रवासी

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 6:09 am

ती पहाट निरागस होती, क्षितिजावर होती लाली
नादातुन निर्मित झाली, अनंत अगम्य भूपाळी
भोवताल न्याहळत होतो, अमृत प्राशन करताना
अमरत्व ओढुनी आलो, होतो मी कोणे काळी

असंख्य मनोहर स्वप्ने, ते लांब गहिरे श्वास
अतर्क्य, अबाधित होता, विचार-कृती सहवास
आनंद सोहळ्यामध्ये, मी भिजलो अनंत काळी
अद्वैत भोगले होते, मी काही वेळ सकाळी

दिवसा चित्र पालटले, मयसभा संपली आता
सत्य उलगडत गेले, मज प्रारब्धाची गाथा
जीव तोडून जोडून पळलो, दिवसा मी रानोमाळी
दिवसाचा जोशच न्यारा, दिवसाची नशा निराळी

कविता

आपलेच दात.....

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
20 Feb 2021 - 10:00 pm

लहानपणी दुधाचे दात पडून
त्या जागी नवीन यायचे.
वाईट वाटायचं एखादा दात
पडून गेला की काही वेळ

कधी कधी तर, असा पडलेला
दात, आठवण म्हणून जपून
ठेवायचो दिवसेंदिवस

सवयीने जीभ तिथं जायची
आणि मग आता तिथे काहीच नाही
हे लक्षात आल्यावर परत यायची

काही दिवस तर तो एक चाळाच
होऊन बसला होता मनाला

मग पुन्हा त्या जागी एक नवीन
दात दिसायला लागायचा हळुहळु..
हा दात इतर आधीच असलेल्या
दातांमध्ये स्वतःला सामावून घ्यायचा

कविता

गाठोड

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
18 Feb 2021 - 8:00 am

खतपाणी घातलं
निगा राखली झाडाची
बिज होत चागंल तरी
फळे मीळाली विषाची

वाटल झाड आहे दुबळं
त्याला द्यावी साथ
देणार्‍याचा अदांज चुकला
तुटायला आले हाथ

जरी ऋणानुबंधाच्या गाठी
तरी प्रारब्धाचा खेळ
कर्मच नाही चांगल
तर जुळणार कसा मेळ

आपल घर आपणच बाधांयचे
पेरललं तेच उगवायचे
क्षणभराची विश्रांती घेऊन
पुन्हा इथेच यायचे

कोण कुणाला पुरायचं
म्हणूनच आतल्या देवाला
निरंतर जागवायचं

आयुष्याच गाठोडे
आपण आपलच पेलायचं
१६-२-२१

कविता

मुर्ख

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
15 Feb 2021 - 12:59 pm

आयुष्याच्या उतरणीला
सगळे बोट दाखवतात
तु किती मुर्ख आहे
म्हणून सारे हीणवतात

माणुसकीच्या नात्यानं
जमेल तेवढे करत होतो
स्वतःच्या स्वार्था आधी
जबाबदारीला पुढं ठेवत होतो

तीच जबाबदारी आता
मुर्खपणा ठरते
ज्यानां आधार दिला
त्यांच्याच कडुन कळते

जेव्हां चुकत होतो
तेव्हां बरोबर म्हणायचें
गणित नाही कळाले
आता बरोबर वागताना
मार्क शुन्य पडले

आता काय उपयोग
हे सगळं बोलून
जेव्हा हातातले सारे
पक्षी गेले उडून

कविता

मुक्त

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
14 Feb 2021 - 11:25 pm

आभाळातून बरसून ही
पानावरच्या दवासम अस्तित्व
मिसळायच नाही वाहायच नाही..

अनाहूतपणे भेटून ही
स्वप्नांचा कापसासम स्पर्श
बांधून नाही हूरहूर नाही..

भेटीची ओढ असूनही
अनवट वाटेसम गूढ
टाळणार नाही विसरणार नाही..

कवितामुक्तककविता माझी

कविता - कविराज

Arun V.Deshpande's picture
Arun V.Deshpande in जे न देखे रवी...
11 Feb 2021 - 5:18 pm

अक्षरछंद वृत्त- देवद्वार
-------------------------------
(६-६-६-४)
कविराज
---------------------
कविता लेखन
असोशी मनास
करिते प्रयास
लेखनाचा    ।।

अभ्यास करावा
करावे वाचन
त्यावरी चिंतन
गरजेचे         ।।

सांगणारे कुणी
सोबत असेल
लेखन वाटेल
सुलभसे         ।।

कविताभक्ति गीत

आधार कार्ड

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
11 Feb 2021 - 9:11 am

मे भी एक बाप हूँ........

वो था तो कोई गम न था।
नही है तो आँखे नम होती है।
उसकी यादोमे अक्सर राते
गमगीन होती है।

नसीहत जो कभी
मुसीबत लगती थी।
आज वही मुसीबत मे
नसीहत लगती है।

रोकता था टोकता था।
अक्सर मन सोचता था
ये ऐसा क्युं है।
आज नही है तो दिल
उसीको खोजता क्युं है।

बरगद का साया था।
हर राझ सिखाया था।
परवरीश मे जिसने
अपना तन मन धन गवांया था।

था वो तो
हर मुकाम मुक्कमल हुआ।
जिंदगी के हर पादान पर
पहाड सा खडा हुआ।

कविता