नाराजीनामा

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
5 Mar 2025 - 9:57 am

अखेर ते घडले
दागी मंत्री पडले ।।

मंत्रिपदाचे ते कवच,
भ्रष्टांना असते हवंच ।।

कवच असता
न्याय ओलीस,
कवच नसता
ओढतील पोलीस ।।

म्हणे फोटो पाहून
हेलावले,
राजीनाम्याला
पेन लावले ।।

पोलीस,राजकारणी,
मीडिया, डॉक्टर, न्याय,
सर्वांची आहे मिलीभगत,
वोटर जनता पाहतेय
भांबावल्यागत ।।

एकेक निर्णयाला
लागतेय सदी,
एक पडला,
दुसरा कधी ?!

कविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

5 Mar 2025 - 10:52 pm | चौथा कोनाडा

पोलीस,राजकारणी,
मीडिया, डॉक्टर, न्याय,
सर्वांची आहे मिलीभगत,
वोटर जनता पाहतेय
भांबावल्यागत ।।

- दुर्दैवी सत्य परिस्थिती