लोचा ए उल्फत
पहाटे पहाटे दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली.
बेडवर उठून हाताचे दर्शन घेतले. जमिनीला वंदन करून पाय ठेवला.
कोण आले एवढ्या सकाळी?
दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला.
दुधाची पिशवी सोबत आजचा पेपर घरात आत घेतला.
पेपर उघडत असतांना, डोळे चोळत चोळत, आज पहाटेच पडलेल्या स्वप्नाचा विचार करत होतो.
अगदी ओळखीचा चेहरा होता तो, हातात पेटी घेऊन गाणे म्हणत रेल्वेत डब्या डब्यात हिंडत होता....!!!