गाभा:
नमस्कार
अनॆकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील पण जे २००६ पासून मराठी संकेत स्थळे बघात आलेली लोक आहेत त्यांनाच नक्की पटेल
१) मराठी ब्लोगरस कमी झाले
२) मराठी ब्लोगरास मिट शेवटची २०११ झाली नंतर बंद
३) बरेच मराठी संकेत स्थळॆ बंद झालीत www.laibhaari.com सर्वात धक्का दायक
प्रतिक्रिया
6 Apr 2014 - 4:37 am | कंजूस
१साठी :स्पष्ट आणि ठाम मते असणारे कमी झाले .इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले आणि नातवंडे यांचे कौतुक (=appreciation हो !) वाढले .
२ आणि ३ साठी :वरील स्थित्यंतर होत असतानाच २०००साली इंटरनेट स्वस्त होऊ लागले आणि मराठी संकेत स्थळांचा उदय झाला .
आणखी काय सांगणार .चित्र स्पष्ट आहे .कागद कोरा होत चालला आहे .
6 Apr 2014 - 5:22 am | एकुलता एक डॉन
फुगा फुटला असे म्हनुया का?
6 Apr 2014 - 8:52 am | विवेकपटाईत
मराठी संकेतस्थळ वाचून, मी मराठी लिहायला शिकलो. स्वत:चा मराठी ब्लोग ही बनविला. सुरवातीला ब्लोग वाचणार्यांची संख्या फारच कमी होती. पण गेल्या वर्षी अर्थात २०१३ पासून वाचणार्यांची संख्या वाढली. आज सकाळीच ब्लोगचा इतिहास बघितला.(सकाळची संख्या २०८०० वर होती यात अर्ध्यापेक्षा जास्त गेल्या वर्षातील आहे) तब्बल ५४००च्या जवळपास लोकांनी एक पेक्षा जास्त वेळा ब्लोग बघितला आहे. ३६ देशातील अर्थातच मराठी माणसांनी ब्लोग वाचला आहे त्यात १८% अमेरिकेत राहणारे आहे. असा अनुभव अधिकांश ब्लोग लेखांचा असेल.
मी काही चांगला लेखक नाही. मराठी सुद्धा अशुद्ध असते. मराठी वाचकांची संख्या वाढली कि कमी झाली, आपण स्वत: ठरवू शकता. वाचणार्या आणि लिहिणार्यांना अधिक वाचायला मिळत आहे. हे सत्य.
बाकी नवी पिढीचे म्हणाल तर त्यात बहुसंख्यक काहीच वाचत नाही. आमच्या कार्यालयात निवृत्त होणार्या शिपायाला ही शेक्स्पेअर माहित होता पण नव्या कर्मचार्यांना माहित नाही. वाचण्याची आणि लिहिण्याची सवय आजची पिढी विसरत चालली आहे. हे जागतिक सत्य आहे.
8 Apr 2014 - 11:09 am | तुमचा अभिषेक
हा अनुभव आहे खरा, मी तर नुकताच दोन तीन महिन्यांपूर्वी ब्लॉग बनवला आहे, हेतू एवढाच की माझे लिखाण एका जागी सुरक्षित जमा राहावे, कोणी तिथे येऊन वाचेल असा विचारही केला नव्हता वा अजूनही नाहीच करत. कारण मिसळपाव आणि मायबोली या संकेतस्थळांवर प्रकाशित करतोच, तसेच काही लिखाण फेसबूकवरही टाकतो. मी स्वता माझ्या ब्लॉगला विजिट एखाद्या विकांताला वा एखादा लेख अपडेट करायचा असेल तरच देतो. पण स्टॅट्स रेकॉर्ड पाहिले तर मात्र रोजचा काही आकडा दिसतोच. माझ्यापुरता तरी तो समाधानकारक आहे.
16 Jun 2019 - 9:37 am | जेम्स वांड
तरण्या पोरांवर बिले फाडणे कधी बंद होईल!?
निवृत्तीला आलेल्या चपराश्याला शेक्सपियर माहिती होता, मग?? किती एक्स्ट्रा पगारवाढी मिळाल्या, किंग लियर अन ओथेलो माहिती आहेत म्हणून? नवीन चपराश्याला माहिती नाहीत, किती पगार कपात झाली म्हणायची त्याची ??
प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट का साधली जावी? भलते सोस अन अपेक्षा फक्त अपेक्षाभंगच देऊ शकतात.
6 Apr 2014 - 11:32 am | सुहास..
ब्लॉगर्स चा ही कंपु आहे ......मला आश्चर्य वाटते ...शिवाय ही मंडळी अगदी चेपुवर पण त्यांच्या त्यांच्यामध्येच असतात , तु माझी पाठ खाजव , मी तुझी खाजवतो ...मी २००३ पासुन जवळपास ८० % ब्लॉगच वाचायचो, पण बर्याच ब्लॉगर्स चा इगो पाहुन थांबविले , इतकेच काय स्वता: चा पण कधी केला नाही ..एक ट्राय केला होता , पण मला तो निव्वळ मुर्खपणा वाटत राहिला .....एक उदाहरण मात्र मला हसवुन गेले , एक सिनीयर काका होते , रोजचा अपडेट (हिट्स ) चा फेबु वर ..हात होडले शेवटी ..........
7 Apr 2014 - 4:21 am | एकुलता एक डॉन
रोजचा अपडेट (हिट्स ) चा फेबु वर ?
8 Apr 2014 - 10:57 am | तुमचा अभिषेक
म्हणजे रोज किती जणांनी ब्लॉगला विजिट दिली याचा आकडा फेसबुकवर टाकायचे ते कौतुकाने.
14 Apr 2014 - 4:40 pm | एकुलता एक डॉन
खरा कि खोटा ???????????
6 Apr 2014 - 12:49 pm | मारकुटे
मराठी संकेतस्थळांना उर्जितावस्था होतीच केव्हा की आता दैन्यावस्था आली म्हणुन खंत करायची?
मुळात मराठी संकेतस्थळांचे सदस्य भले १०-२०-३० हजार असुदे.. सक्रिय सदस्य ३००-४०० च्या वर नाहीत. तीच ती मंडळी. सुरवातील म्हणजे साधारणतः २००० ते २००८ पर्यंत सगळं कसं छान होतं मह्णजे बघा अमेरीकेत नाहीतर पुण्याबंगळूरात नोकरी, छोकरी राजाराणी संसार किंवा यंदा कर्तव्य आहे टैप. २००८ नंतर अनेकांचे संसार कुरबुरी सुरुझाल्या, अनेक घटस्फोत झाले, अनेकांना मुल होत नाही म्हणुन कुरबुरी सुरु झाल्या. एकंदर जीवन बदललं. तेच प्रतिबिंब इथे दिसतं. नवे सदस्य तितक्या प्रमाणात येत नाहीत. नवीन पिढिला मराठी येतच नाही. संकेतस्थळांमधील चर्चा त्याच त्या होत आहेत. एकंदर दैन्यावस्था आहेच.
6 Apr 2014 - 12:51 pm | नितिन थत्ते
>>मराठी ब्लोगरस कमी झाले
ब्लोगरस हा कुठला रस?
6 Apr 2014 - 1:43 pm | आदूबाळ
माझ्या निरीक्षणाप्रमाणे वरील तिन्ही गोष्टी वाढत आहेत. आज आंजावर मराठीमध्ये ज्या विषयांचं वैविध्य वाचायला मिळतं तसं सुमारे १० वर्षांपूर्वी वाचायला मिळत नसे.
एक दोन उदाहरणं घेऊन थेट "दैन्यावस्था" वगैरे टाहो फोडण्यात काहीच अर्थ नाही.
"The plural of anecdote is not data"
6 Apr 2014 - 3:03 pm | माहितगार
हातात अगदीच फिल्ड सर्वेक्षणाचे आकडे नसताना बोलणे माझ्याकरता धारीष्ट्याचे होऊ शकते. सध्याच्या अवस्थेच वर्णन करण्यासाठी दैन्यावस्था विशेषण वापरण किती सयूक्तीक याबाबत चर्चा होऊ शकते पण स्थिती खरेच आपण म्हणता तशी आदर्श आहे का या बद्दल मी साशंकीत आहे.
हे गुणोत्तर वाढलं तरी मराठी संकेतस्थळांना त्याचा खरेच किती फायदा पोहोचतो आहे (सहभाग वाढतो आहे) या बद्दल मी साशंकीत आहे. साधारणतः दहावी इयत्तेनंतर इंटरनेट वापरण्याच स्वातंत्र्य अधिक मिळत अस मी गृहीत धरतो वर्षाकाठी १४लाख महाराष्ट्रीय मुल मॅट्रीक करतात त्यातली नव्वदटक्के सोडून देतो दहा टक्के म्हणजे १,४०,००० गेल्या दहावर्षात महाराष्ट्रात इंटरनेटला उर्जीतावस्था आली अस धरल तर १,४०,००० गुणीले १० वर्षे बरोबर १४,००,००० उपयोगकर्त्यांच किमान पोटेंशिअल असू शकल असत दहा मराठी संकेतस्थळांची सदस्य संख्या ४०-४० हजार धरा (ती २०-२५च्या पुढे नसावी) तरी ४लाखाच्या पुढे आकडा जाणार नाही (बहुधा हेही दहापट ओव्हर एस्टीमेशन आहे) तरी सुद्धा किमान दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्यास मराठी संकेतस्थळे कमी पडली. मराठी संकेतस्थळांकडे शक्य असलेला सुशिक्षीत अभिजन वर्ग २००३ मध्येच आला त्यात थोडीफार वाढ झाली असेल नाही असे नाही पण तेही मोठ्या शहरातील मोजकाच. सर्वाधिक ग्रामिण वाचकवर्ग मराठी विकिपीडियावर येतो तेथे घेतलेल्या सर्वे मध्ये तुम्हाला माहित असलेली अथवा वापरलेली ५ मराठी संकेतस्थळे सांगा असा प्रश्न असतो ९८ टक्के लोकांना कोणतेही मराठी संकेतस्थळ ठाऊक नसते एखाद टक्का लोकांना मराठी वृत्तपत्रांची संकेतस्थळे ठाऊक असतात. केवळ मराठी लोकांच्याच अस्थेच्या असलेल्या इंग्रजी विकिपीडियावरील आणि मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळणार्या हिट्सची मी बर्याचदा तुलना करत असतो. मराठी विषया बद्दल लोकांना आस्था असते म्हणून ते वाचत असतात पण केवळ इंग्रजी मधून . इंग्रजी विकिपीडियाच्या केवळ दहाटक्के हिट्स मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळतात त्याच्या एक टक्का कसा बसा मराठी संकेतस्थळांपर्यंत पोहोचला तरी डोक्यावरून पाणि गेले. मी अशाच लेखांची तुलना सांगतो आहे जे मराठी विकिपीडियावरही बर्यापैकी लिहिले आहेत आणि गूगल मधून इंग्रजी अथवा मराठीतून दोन्हीतूनही सर्च दिल्यास टॉप पहिल्या क्रमांकात येतात.
मिसळपाव संकेतस्थळाने यावर्षी दिवाळी अंक काढला तरी किमान दोन जुन्या मराठी संकेतस्थळांना दिवाळी अंकांना मिस द्यावालागला असे आठवते. मराठी संकेतस्थळांचा सदस्य संख्या वाढवण्याबाबत केलेले ठळक प्रयत्न म्हणून फारसे काही पुढे उभे टाकते काय ? की मराठी संकेतस्थळे अल्पसंतुष्ट आणि सध्याचा सदस्यवर्ग सदस्य जोडण्याबात प्रयत्न पोटेंषियलच्या दृष्टीने पुरेसे आहेत काय ?
माझ्या या प्रतिसादातिल मांडणीला कुणी आकडेवारी सहीत खोडून दिले तर पहिला आनंद मलाच असेल. असो.
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे येथील मराठी संकेतस्थळांची यादी जूनी झाली असून त्यावरून आता बंद पडलेल्या मराठी संकेतस्थळांची आणि नवीन सुरू झालेल्या संकेतस्थळांची माहिती या धागा चर्चेच्या निमीत्ताने मिपाकरांकडून मिळाल्यास आनंद वाटेल.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
एनी वे
6 Apr 2014 - 3:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंटरनेटचा वापर आता ब-यापैकी घरात पोहचला आहे. आता इंटरनेट मराठी माणसाच्या घरात पोहोचलं म्हणजे तो लगेच मराठी संकेतस्थळावर लिहायला तयार झाला असे होत नाही. इंटरनेटचा वापर कशासाठी ? माहितीसाठी, मेल वापरण्यासाठी, ऑफीस कामाचा डाटा इकडून तिकडे देण्यासाठी देवाण-घेवाण,गप्पा किंवा अजून काही असेल ते पण मराठी संकेतस्थळावर नियमित लिहिण्यासाठी-वाचण्यासाठी उपयोग करतात असं नाही. एक तर मराठी लिहिण्याची प्रचंड भीती. कोणतं सॉफ्टवेअर असतं ? कुठे मिळतं ? या आणि नसत्या प्रश्नापेक्षा नको ती झंजट हा निवडलेला सोपा मार्ग. 'रोमन मराठी' लिहायला सांगा किंवा असे एखादे संकेतस्थळ सुरु करा नै संख्या वाढली तर मग बोलू नका. फेस्बूकवर लिहिणा-याचा पाहा कसा आत्मविश्वास वाढलेला दिसतो (तिथे बरा लिहायला-वाचायला वेळ मिळतो) तसं मराठी संकेतस्थळावर लिहिण्याच्या बाबतीत दिसत नाही. ही उदासिनता म्हणा की आळस हा एक भाग दैन्यावस्थेचा वाटतो.
-दिलीप बिरुटे
6 Apr 2014 - 4:23 pm | पैसा
संस्थळांची दैन्यावस्था की काय ते माहित नाही, पण आणखी एक प्रकार पाहिला आहे. नवीन संस्थळ निघाले की नव्या सदस्यांपर्यंत पोचायचे प्रयत्न फार कमी असतात तर आधीच जे कोणत्या ना कोणत्या संस्थळाचे सदस्य आहेत त्यांच्याशीच संपर्क साधण्याची प्रवृत्ती असते. काही संस्थळे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार नसतात. त्यांना आपल्या हस्तिदंती हुच्चभ्रू मनोर्यात रहाणे आवडते. मग भले संस्थळ बंद पडायची वेळ आली तरी चालेल.
काळ बदलत आहे. वाचक, त्यांच्या आवडी बदलत आहेत याचा विचार केला आणि वाचकांना आवडेल ते द्यायचा प्रयत्न केला तर संस्थळ वाढू शकते. मिपाला किती हिट्स असतात याचा अंदाज घ्यायचा तर रोज सुमारे ५०/६० जण लॉग इन करत असतील तर त्याच्या १०० पटींनी लॉग इन न करता वाचणारे असावेत. हा माझा अंदाज आहे.
तुमचा विकिवरचा लेख फारच कालबाह्य झाला आहे. त्यातील "मिसळपाववर वाद सुरू झाले आहेत" इ. उल्लेख काढा अशी तुम्हाला विनंती करते.
6 Apr 2014 - 4:51 pm | प्यारे१
माहितगार ओळखीचे आहेत काय तुमच्या?
6 Apr 2014 - 6:03 pm | पैसा
इथे मिपावरच!
6 Apr 2014 - 8:15 pm | प्यारे१
हम्म्म्म!
7 Apr 2014 - 1:34 pm | माहितगार
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्ययावत होण्याची गरज आहेच, कारण लेखाचे मुख्यत्वे लेखन २०१०च्या आसपास झाले असावे. नरेन्द्र गोळे यांचा "महाजालावरील मराठीचा इतिहास" , मिसळपाव वरील प्रमोद देव आणि विनायक पाचलग यांच्या लेखनाचे संदर्भ मुख्यत्वे त्यासाठी वापरले होते. मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणारे लेखन २०१० नंतर झाले असण्याची शक्यता असू शकते असे ज्ञानकोशीय दखल घेण्या जोग्या लेखनाचे या विषयावरील लेखांचे दुवे उपलब्ध झाल्यास लेख पुढे अद्ययावत करणे सोपे जाईल म्हणून असे दुवे उपलब्ध करून साहाय्य करावे असे सर्व मिपा लेखक वाचकांना आवाहन आहे.
सोबतच मराठी संकेतस्थळांच्या विकासात (अथवा काही संकेतस्थळे मागे पडण्यात) मराठी संकेतस्थळांवरील वाद विवादांचा कसा प्रभाव पडतो या बद्दल मागे प्रमोद देव यांनी मिसळपाववरच २००७ च्या आसपास लेखन केले होते (त्याची दखल मराठी विकिपीडियातील लेखात घेतली गेली) या विषयावर असेच अजून गेल्या चार-पाच वर्षातील अद्ययावत लेखन झाले असल्यास त्याचेही दुवे दिल्यास ससंदर्भ लेखन करणे सोपे जाईल. (पै तैंनी लक्ष वेधलेल्या मिपा वादविवाद संबंधीत टिका प्रमोद देव यांच्या मिपावरील लेखातून ससंदर्भ आलेली आहे; मी मराठी विकिपीडियातील वाक्यरचनेत अल्पसा बदल आणि वर्तमान काळातील वाक्यरचनेस भूतकाळात बदलले आहे.)
मराठी संस्थळांच्या आशय व्यवस्थापन सॉफ्टवेरची तांत्रिक प्रगती या बाबत सुद्धा काही लेखन झाले असल्यास माहिती हवी आहे.
बंदपडलेली मराठी संकेतस्थळे असा माहिती पूर्ण परिच्छेद आणि (जमल्यास चालू-बंद या कालानुक्रमे ससंदर्भ उपलब्ध असेल तेथे कारणांसहीत) यादीही प्राधान्याने हवी आहे.
संबंधीत इतरही बर्याच विषयांवर माहिती हवी आहे. पण त्या बद्दलच्या चर्चांकरता येत्या काळात वेगवेगळे धागे काढेन.
पैतैंनी मराठी संकेतस्थळे लेख अद्ययावत करण्या बद्दल यापुर्वीही विनंती केलेली होती आणि ती लक्षात घेऊनच मराठी संकेतस्थळे या विषयावर विवीध धागे काढतो आहे. प्रतिसादातून पाठ पुरावा करण्याबद्दल पैतैंना खूप खूप धन्यवाद
8 Apr 2014 - 10:04 am | एकुलता एक डॉन
साहित्य चोरि बद्दल काय मत आहे
8 Apr 2014 - 10:16 am | माहितगार
मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे या लेखात ज्ञानकोशीय सुधारणा आवश्यक असल्याचे मी पै तैम्शी मागेच अॅग्री केले म्हणूनच संदर्भाकरता अधिक दुव्यांची विनंती केली वेगळी धागा मालिका चालू केली. संदर्भ नमुद केला म्हणजे क्रेडीट दिले असे होते आणि प्लॅगरीझम किंवा साहित्य चोरी हा आरोप पुर्णपणे लागू होत नाही. विकिपीडियातील मजकुर लेखनात विशेषणे अलंकारीकता आणि वर्णनात्मकता वगळताना स्वतःच्या शब्दात पुर्नलेखन होतच असते त्यामुळे मजकुराबाबत तो जसाच्या तसा दीर्घकाळ टिकुन रहात नाही. छायाचित्रे अधिक कालजीचा मुद्दा असतो.
जनरलायझेशनपेक्षा आपला रोख कोणत्या विशीष्ट मजकुराकडे आहे ते कळवल्यास तपासणे सोपे जाईल. मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद
8 Apr 2014 - 10:26 am | एकुलता एक डॉन
तसे नाही
सहित्य चोरि मुळे तर सन्केत स्थळ बन्द होत नाहिये?
9 Apr 2014 - 9:13 am | माहितगार
जेव्हा संकेतस्थळे प्रथमच बनत होती तेव्हा कोर्या पाटीपासून काम चालू झाले असणे समजण्या सारखे आहे. आजही नवीन विषयाबद्दलचे संस्थळ असेल तर कोर्या पाटी पासून काम सुरू करू शकेल. पण एक नवे रेग्युलर संस्थळ, स्पर्धेत येऊन चालू करावयाचे झाल्यास तुमच्या कडे रेडीमेड मजकुरच असून चालणार नाही लेखक वाचकांचा किमान स्वरूपाचा कम्पू जो नवागतांना आकर्षितही करेल आणि सहभागी करून घेऊ शकेल याची गरज पडेल असे वाटते.
नवीन संस्थळाने मजकुराचा भाग साहित्यचोरी करुन भरल्यास प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष कारणाने संकेतस्थळ लगेच कोमेजू शकेल असे वाटते. त्याचे कारण म्हणजे गूगल शोध प्रक्रीयेचा अभ्यास केला तर डाटा मिररिंग करणार्या/कॉपी करणार्या संस्थळांना गूगल शोध पिछाडीला टाकते. त्यामुळे असा प्रयोग कुणी करत असेल तर नुकसानच अधिक होण्याचा संभव असे वाटते.
त्यापेक्षा स्वतःचा ओरीजनल मजकुर असलेली स्वतःचा छोटाका होईना जुना कम्पू असलेली संस्थळे विकत घेऊन पुर्नजिवीत करणे हे व्यावसायिक दृष्ट्या अधिक शहाण पणाचे होऊ शकेल किंवा खाली विश्लेषण केली तशी पुढारी सारख्या वृत्तपत्राशी संधान बांधून त्यांचा कंटेट आणि लेखक वाचक मिळवणे किंवा अशी बंद पडणार्या संस्थळांना वृत्तपत्र आणि मासिकांनी भांडवली भागिदारी करणे अशा व्यावसायिक पर्यायांचा विचार करावयास हवा.
9 Apr 2014 - 10:04 am | एकुलता एक डॉन
मस्त कल्पना
8 Apr 2014 - 2:21 pm | पैसा
http://upakram.org/ हे मला वाटतं जुलै २०१३ पासून वाचनमात्र उपलब्ध आहे. तिथे नव्या पोस्टस नाहीत.
http://mimarathi.net/ हे मध्यंतरी काही काळ बंद पडले होते. नंतर काही दिवस मराठी फेसबुकप्रमाणे चालू होते. आणि हल्लीच परत द्रुपल आधारित जुन्या स्वरूपात फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाले आहे.
7 Apr 2014 - 2:07 pm | आदूबाळ
आंजा वापरणारे मराठी लोक ज्या गतीने वाढताहेत त्या गतीने मराठी संस्थळे वापरणारे वाढत नाहीयेत. हा तुमचा मुद्दा पटण्याजोगा आहेच.
8 Apr 2014 - 12:27 am | एकुलता एक डॉन
पण कशामुळे असे होतेय?
6 Apr 2014 - 3:06 pm | आशु जोग
आणि आणि आमच्या मिपाबद्दल काय म्हनने आहे
7 Apr 2014 - 4:17 am | जयंत कुलकर्णी
I am writing in English as I anable to write today in Marathi. If I type in Marathi something else is being typed....Anyways the poor state of Marathi sites is just because of those who use these sites as chat room......
Sorry to say that but it is true.....
22 May 2016 - 5:27 pm | कपिलमुनी
या वाक्यात बरेच काही आले
22 May 2016 - 5:35 pm | नाईकांचा बहिर्जी
सहमत आहे सर!
7 Apr 2014 - 8:06 am | कंजूस
आता जी काही दोन तीन मराठी संस्थ० चालू आहेत ती पुरेशी आहेत .काही जण तिथे आपल्या लेखाची तोंडओळख देऊन अधिक माझ्या या ब्लॉगवर वाचा असे लिहितात ते मला आवडले .प्रत्येक आवडत्या व्यक्तीचे ब्लॉगवर लक्ष ठेवून वाचणे केवळ अशक्य आहे आणि त्यांच्या लेखनात सातत्य राहात नाही .
7 Apr 2014 - 8:08 am | एकुलता एक डॉन
आता जी काही दोन तीन मराठी संस्थ० ???????????? माफ करा पण ह्याला कुप मडुक अवस्था असे नाही म्हणता येणार का
7 Apr 2014 - 11:14 am | ऋषिकेश
मराठी संस्थळे ही बरी चाल्लीयेत की. काही नवी येणार, काही जुनी मागे पडणार -बंद होणार हे चक्रनिक्रमेण चालुच राहणार!
सदस्य संख्या वाढणे कठीण आहे कारण म्राठी संस्थळांवर प्रमाणभाषेतच लेखन करावे लागते. आणि अश्या भाषेत लेखन करू इच्छिणारी/शकणारी काही मंडळी जालावर फुकट लेखन करायला तयार नाही व उर्वरीत मंडळी मराठीतच लेखनाला तयार नाही ;)
नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ नये अशी व्यवस्था पालकांनीच केलेली आहे, नी मराठीच्या नावे गळेही तेच काढत आहेत असे सर्वसाधारण चित्र दिसते :P
7 Apr 2014 - 1:57 pm | आदूबाळ
आँ?? सरसकटियस, दाऊ टू?
7 Apr 2014 - 2:31 pm | बॅटमॅन
पण आचारविचारात फरक असला तरी चालेल आणि त्याला इतरांनी कै बोलायचं नै अशी इतकी खुल्लमखुल्ला मोकळीक अगोदरच दिलेली असताना वरील वाक्याचे प्रयोजन खरंच कळ्ळे नै ;)
7 Apr 2014 - 2:48 pm | अनुप ढेरे
=))
7 Apr 2014 - 5:46 pm | पगला गजोधर
जसे जगातील अवघड भाषांपैकी ऐक अशी, म्यानड्रीन (चायनीज) भाषा, त्यांनी सिम्पलीफाइड -चायनीज म्हणून आणली, तशीच, आपण सिम्पलीफाइड मराठी, वापरायची ठरवली तर ? कि जिच्यात व्याकरण, ऱ्हस्व, दीर्घ, पहिली / दुसरी वेलांटी वैगरे चा बाऊ नको व ती qwerty वर पटकन टाईप करता येण्याजोगी …. वैगरे वैगरे, ३ री ४ थी ची मुलेही पटकन शिकतील अशी !!!
7 Apr 2014 - 6:54 pm | कंजूस
तुमची ती मुलांसाठी सोप्पी मराठी वगैरे पटत नाही .
8 Apr 2014 - 8:41 am | माहितगार
पेज व्ह्यूज आणि व्हिजीट्स चा अभ्यास करून वेबसाईट्सच रँकींगकरणार्यात अलेक्सा डॉट कॉमच रँकींग्स विचार करण्याजोगे असते. रँकींग करण्या करीता त्यांचा स्वतःचा अल्गोरीदम आहे. एखाद्या वेबसाइटच्या एखाद्याच पानाला हिट्स जास्त बाकी साइटला कमी किंवा नाही असे काहीसे होऊ शकते आणि एका पानाच्याही हिट्समुळे रँकींगवर जाऊ शकते तसे होऊ नये याची अलेक्सा डॉट कॉमच अल्गोरीदम काळजी घेत असा त्यांचा दावा असतो.
कोणती मराठी संकेतस्थळे पुढे आहेत हे पाहण्यासाठी मी alexa.com/topsites/category/Top/World/Marathi ला अधून मधून (वर्षा दोनवर्षातन) भेट देतो. मागची बरीच वर्षे महाराष्ट्र शासनाच maharashtra.gov.in हे संकेतस्थळ प्रथम क्रमांक राखून होत; याच एक कारण आपण Maharashtra/महाराष्ट्र Marathi/मराठी या दोन शब्दांची गूगल ट्रेंण्ड्स अभ्यासली तर लक्षात येत Maharashtra/महाराष्ट्र आणि Marathi/मराठी रोमन असो वा देवनागरी लिपी Maharashtra/महाराष्ट्र शब्द Marathi/मराठी शब्दा पेक्षा अधिक शोधला जातो. दुसरी गोष्ट महाराष्ट्र शासनाचेही कर्मचारीवर्ग यंत्रणा मोठी आहे तेही लोक मोठ्याप्रमाणावर लॉग इन होत असणार; पण महाराष्ट्र शासनाचा शासकीय कर्मचारी वर्ग आंतरजालावर असूनही मराठी संस्थळांवर न दिसण्याची कारण शासकीय कार्यालयातील मोठ्या प्रमाणावर नॉन-युनिकोड फॉण्ट्सचा वापर; हि परिस्थिती त्यातील नवीन पिढीकरता बदललेली असणार आहे परंतु त्यांचा ओढा फेसबुक सारख्या वेबसाईट कडे अधिक आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे.
पण प्रतिसाद देण्याकरता म्हणून अलेक्सा रँकींग अभ्यासल तेव्हा मराठी संस्थळांमध्ये www.esakal.com ने महाराष्ट्र शासनाच्या संस्थळाला मागे टाकून प्रथम क्रमांक घेतला आहे असे लक्षात आले. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट्चे रँकीग वरून तुलना करणे कठीण असे कारण गूगलवर अमराठी लोक सुद्धा Maharashtra शब्द सर्च करू शकत असतात. पण 'सकाळ'चे तसे नाही sakal/सकाळ हा शब्द मराठी लोकच शोधणार मी चार एक वर्षापुर्वी माहिती घेतली तेव्हा esakalची रोजची हिट्स ५-६लाख रोजच्या घरात होती. मराठी वृत्तपत्रीय संकेतस्थळा मध्ये सुरवाती पासून नवीन तम आंतरजालीय तंत्रज्ञान वापराचा प्रयत्न चालू ठेऊन काळासोबत पाऊल टाकण्याचा इसकाळचा प्रयत्न स्तुत्य म्हणण्या सारखाच होता. विंडॉ ९८च्या युनिकोड उपलब्ध नसलेल्या काळात डायनॅमीक फॉण्ट मध्ये साइट उपलब्ध करणे ते युनिकोड उपलब्ध होताच त्यात बदलणे ते परदेशी स्थित मराठी लोकांकरता पैलतीर सारखी सदरे उपलब्ध करून देणे ते पुणे पश्चिम महाराष्ट्रात सकाळ वृत्तपत्राचा असलेला प्रसार आणि पुढारी सारख पश्चिममहाराष्ट्रातील महत्वाच ऑनलाईन वृत्तपत्र युनिकोडात नसल्यामुळे तो वाचकही इसकाळने सुरवातीच्या काळातच मिळवला असण्याची बर्यापैकी शक्यता वर्तवता येते.
ऑनलाईन मराठी वाचकांनी महाराष्ट्र टाइम्स च्या ऑनलाईन संकेतस्थळाचा क्रमांक मराठी वृत्तपत्रामंध्ये भलताच घसरवून त्यांना केवळ ऑनलाईन मराठी वृत्तपत्रीय यादीत (topsites/category/Top/World/Marathi/बातम्या) चक्क १५व्या क्रमांकावर नेऊन बसवल्याचे पाहून आश्चर्यच वाटले; म्हणजे अगदी मराठी वेबदुनीया, देशदूत, तरुणभारत, देशोन्नती, केसरी, ऐक्य, मी प्रथमच ऐकतोय(वाचतोय) नांदेडचे सत्यप्रभा डॉट कॉम आणि त्या नंतर महाराष्ट्र टाइम्स म्हणजे एकुण मराठी संस्थळात चक्क ४७व्या क्रमांकावर !! (??) हे असं का ? याच नीटस उत्तर मला माहित नाही कुणी विश्लेषण केल्यास समजून घेणे आवडेल. लोक्सत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीने एकुण मराठी संस्थळांच्या क्रमांकानात तीसरा क्रमांक ( म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट नंतरचा लगेचचा ) पटकवला आहे, म्हणजे मटाच्या गच्छंतीस लोकसत्ताची वाढलेली तौलनीक लोकप्रीयता कारणीभूत असू शकेल ?
मराठी ओव्हर ऑल लीस्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर लोकमत येत आहे हे समजण्या सारख आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातली या वृत्तपत्राच्या प्रींट आवृत्तीच्या उपलब्धते मुळे एका अर्थाने ते मोठे मराठी वृत्तपत्र आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील पब्लिक मध्ये बर्या पैकी वाचकप्रियही आहे.
पाचव्या क्रमांकावर google.com/inputtools/try/ मराठीमध्ये लेखन करण्याची सोय येतय आणि हे आजिबात आश्चर्य कारक नाही माझ्या स्वतंत्र ऑनलाईन पहाणीतही गूगलची मराठी टायपींग सुविधा सध्या सर्वात लोकप्रीय आहे आणि त्याला अलेक्साच्या रँकींगची पुस्ती पाहून दुजोराच मिळाला.
8 Apr 2014 - 10:31 am | पैसा
माहितीपूर्ण प्रतिसाद. इथले अनेक सदस्य सुद्धा इथली गमभन सुविधा आपल्याला वापरायला जमत नाही. ई-सकाळ किंवा गुगल वर टाईप करून इथे पेस्ट करतो असं सांगतात. खरे तर गमभन सुद्धा खूप सोपे आहे. पण नेमका काय प्रॉब्लेम होत असावा काय माहित!
8 Apr 2014 - 10:35 am | एकुलता एक डॉन
मला पन त्रास होतोय
तुम्हि ब्रोव्सेर कोन्त वपरत आहात?
8 Apr 2014 - 10:49 am | पैसा
आणखी बर्याच जणांना येतो आहे. मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे.
8 Apr 2014 - 11:02 am | एकुलता एक डॉन
बॅकस्पेस ,मला पन तोच त्रास होतोय
8 Apr 2014 - 11:12 am | डॉ सुहास म्हात्रे
मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे.
हा नक्कीच त्रासदायक प्रकार आहे. इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बॅकस्पेस / डिलीट ने हा प्रकार होताना दिसत नाही.अजून एक म्हणजे "ऑटो स्पेलचेक" अंतर्भूत (इनबिल्ट) असले तर शुद्ध मराठी लिहायला बरेच सुलभ होते.
8 Apr 2014 - 11:07 am | ब़जरबट्टू
अहो, कसे सोपे आहे ? काही तांत्रीक चुका होतात, जसे चुकिचे लिहिल्यास मिट्वायला गेले, तर सर्व वाक्य खराब होते, म्हणजे अक्षरे एक दुस-यात घुसतात.. आता तुम्ही म्हणता एकदा क्लिक करा, पण त्याने लिंक तुटते, त्याचे काय..
गुगल सर्वात मस्त.. :)) माफ करा..
मराठी प्रेमी.. बजरु..
8 Apr 2014 - 11:19 am | एकुलता एक डॉन
त्यावर मि उपाय शोध्लाय
स्पेस बर्याच वेळा दाबाय्चे
वाक्य तुटत नाही
8 Apr 2014 - 11:51 am | तुमचा अभिषेक
बॅकस्पेस दाबायच्या आधी एकदा स्पेस दाबून मग दोनदा बॅकस्पेसने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो.
8 Apr 2014 - 11:47 am | माहितगार
माझ्याकडील (सर्वेक्षण) आकडेवारीत संस्थळानुसार फरक पडतो पण तरी सुद्धा ४० % ते ६० % लोक ज्या संकेतस्थळावर जी प्रणाली आहे त्या प्रणालीशी जुळवून घेतात तर उर्वरीत २४ ते ४४ टक्के लोक कॉपीपेस्टींगचा मार्ग वापरत असावेत असा अंदाज आहे. (मराठी विकिपीडियावर rry टाईप केल्यास र्य येतो मिसळपाववर Ry टाईप केल्यावर र्य येतो अशा छोट्या छोट्या फरकांबद्दल ही मंडळी अल्प ते बर्या पैकी फसी असू शकतात.
उर्वरीत मधील ६ टक्के लोक विंडोज आयएमइ अथवा इनस्क्रीप्ट वापरतात त्यांना कोणत्याही संस्थळावर सहज वावरता येते. साधारणतः किमान १० टक्के लोक या पैकी कोणतीही पद्धत वापरण्यात हमखास अयश्स्वी होतात कारण जेव्हा मराठी टायपींग येणारा माणूस उपलब्ध असतो तेव्हा रस दाखवत नाहीत गरज पडते तेव्हा स्वतःचे स्वतः शिकताही येत नाही.
आणि मराठी टायपींग येणारा माणूस पुन्हा उपलब्धही होत नाही.
8 Apr 2014 - 12:22 pm | ब़जरबट्टू
अगदी असाच त्रास होतो.. काही नेहमी वापरणा-या शब्दाबद्दल घोळ होतो... याबद्द्ल मिपावर गमभन वापरायची बाराखडी दिली आहे का ? नसल्यास नक्की द्या...
10 Apr 2014 - 10:15 pm | शशिकांत ओक
मराठी ईबुक व अन्य
8 Apr 2014 - 10:03 am | एकुलता एक डॉन
एक सेनिओर काका आप्ल्य ब्लोग चे दर्रोज चे खोटे विझिट्स दाखव्त्तात असे पन लक्शात आले आहे
8 Apr 2014 - 12:15 pm | माहितगार
सहाव्या क्रमांकावर मायबोली डॉट कॉम येत. मराठी संस्थळांमधला दुसर्या मुख्य व्यासपिठाचा मान नक्कीच मिसळपाव डॉट कॉम कडे जातो पण एकुण मराठी संस्थळांच्या रँकींग मध्ये मिसळपाव आहे चक्क १५ व्या क्रमांकावर या दोन मधील फरकाच विश्लेषण करण्यापुर्वी ७ ते १४ क्रमांकावरील संस्थळांबाबत माहिती घेणे उद्बोधक होईल.
अलेक्सा डॉटकॉमची आकडेवारी मागच्या तीन महिन्यांच्या अॅव्हरेजवर आधारीत सतत बदलती असते मराठी विकिपीडियाला कधी ७ कधी ६ कधी ५ तर या वेळी तो ८ व्या क्रमांकावर मागे गेला आहे. विकिपीडियाची आकडेवारी अभ्यासताना गेल्या वर्षातील गूगल सर्चच्या एका सुविधेने मोठा फरक केला गूगल सर्च अधिक इंटेलिजन्ट झाला आहे सर्च दिल्यावर केवळ विकिपीडीया किंवा इतर संकेतस्थळांचा दुवाच देत नाही तर त्यातील नेमकी मुद्देसूद माहिती तुम्हाला देतो त्यामुळे माहिती विकिपीडियामधली जरी असली तरी ती घेण्यासाठी प्रत्यक्ष विकिपीडियावर जावेच लागेल असे होत नाही त्रोटक माहिती पुरेशी असेल तर लोक गूगलवरच वाचून तिथेच थांबतात किंवा इतरत्र जातात म्हणजे माहिती तर विकिपीडियातली पण अद्ययावत करण्याकरता पुरेसे लोक पोहोचत नाहीत याचा नाही म्हटले तरी विकिपीडियांना फटका बसला. मराठी लोक शोध कामात बर्यापैकी इंग्रजी वापरतात. त्या मानाने हिंदी लोकांचा इंग्रजीचा वापर कमी असून हिंदीचा अधिक आहे आणि त्यांची सापेक्ष आंतरजाल साक्षरता पुर्वी मराठी पेक्षा कमी होती पण गेल्या एक-दोनवर्षात वेगाने वाढली त्यामुळे हिंदी विकिपीडियाची स्थिती मात्र वेगाने सुधारते आहे.
8 Apr 2014 - 12:52 pm | माहितगार
६व्या क्रमांकावरील मायबोली पाठोपाठ ७ व्या क्रमांकावर येत पुढारी डॉटकॉम या पश्चिममहाराष्ट्र पट्ट्यातील वृत्तपत्रीय संकेतस्थळाने अनपेक्षीत प्रगती साधलेली दिसते याचे कारण की संकेतस्थळ वृत्तपत्राची इआवृत्ती उपलब्ध करते पण युनिकोडात नाही त्यामुळे इतर मराठी शब्दावरील गूगल सर्च चा इसकाळ आणि लोकसत्ता लोकमत यांना जसा फायदा होतो तसा पुढारी ऑनलाईन आवृत्तीस होत नाही (शिवाय इतर संकेतस्थळांवरून विशीष्ट लेखाला दुवा दिला जाणे कमी संभवते) म्हणजे केवळ Pudhari शब्दाचे सर्चवर ७वा क्रमांक पटकावणे पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेली आंतरजाल साक्षरता आणि Pudhari कस्टमर लॉयल्टी दाखवते. Pudhari युनिकोडात असते तर किमान लोकमतच्या ऑनलाईन आवृत्ती बरोबरचा नंबर मिळाला असता.
१३व्या क्रमांकावर दिसणारे apalimarathi.com बंद पडले आहे का त्यावर कधी कंटेट नव्हताच आणि क्रमांक हिट्स रेशो मॅनिप्युलेट करून आणला आहे माहित नाही (जाणकारांनी प्रकाश टाकावा पण एकुण मराठी संस्थळांची दैन्यावस्था हा या धाग्याच्या विषयाला अनुसरून स्थिती आहे असे दिसते १२ व्या क्रमांकावरील marathi.webdunia.com आणि १० व्याक्रमांकावरील मराठी बातम्या हुशारीने मराठी कंटेंट भरून हिट्स मिळवतात असे वाटते. तरी सुद्धा महत्वाचे त्या खालील रँकींग असलेल्यांना या विशेष कंटेंट नसलेल्या संस्थळांना मात देता येत नाही म्हणजे मधला गॅप खूप मोठा आहे हे दर्शवते का?
सामना वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीचा कंटेंट मर्यादीतच असतो तरीपण ९वा क्रमांक मिळवणे वाचकांची लॉयल्टी सोबतच ११ क्रमांकावर असलेले प्रहार वृत्तपत्र आणि ३ र्या क्रमांकावरील लोकसत्ता वाचकांना रोख ठोक लिहिलेले वाचावयास आवडते हे दर्शवते का ?
यात इसकाळचा वाचक नॉन रेसिडेंट मराठी शहरी निमशहरी ते ग्रामीण असा वाटलेला असावा. लोकसत्ता आणि प्रहारचा वाचक मुख्यत्वे शहरी, लोकमत नीमशहरी, तर पुढारीचा ग्रामीण साक्षर असेल का ? या बद्दल इतरांची मते जाणून घेण्यास आवडतील. मायबोली मुख्यत्वे अभिजन सुशिक्षीत एन आर एम आणि शहरी वाचकांवर चालत असावे. वर ऋषिकेष म्हणतात तसे लिहिणार्याचे शुद्ध लेखन तपासत बसले आणि अजून एक दोन क्रायटेरीआ लावले की इतर वर्ग आपोआपच गळत असेल का ? अशी शंका येण्याचे कारण मिसळपाव हे संकेतस्थळाचा वाचकवर्ग मोठा असल्या मुळे चर्चा संकेतस्थाळत मायबोली पाठोपाठ क्रमांक असूनही १५ क्रमांका पर्यंत मागे आहे कारण वाचक एकदाच येतो वाचतो आणि लेखक बनत नसल्याने पुन्हा पुन्हा येण्याचे प्रमाण कमी होते याचे कारण ऋषिकेष यांच्या विश्लेषणात असण्याची शक्यता आहे का ? की इतर काही कारणे असू शकतील ?
8 Apr 2014 - 2:13 pm | आदूबाळ
आपलीमराठी हे मराठी सिनेमा-नाटकांच्या लिंका गोळा करायचे स्थळ आहे. तिथे एक मराठी इंटरनेट रेडिओ सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित भरपूर हिट्स असाव्यात.
8 Apr 2014 - 2:16 pm | पैसा
ब्लँक पेज येतंय माझ्याकडे.
8 Apr 2014 - 2:18 pm | एकुलता एक डॉन
आम्हि मराठी नावाच ब्लोग पन बन्द आहे
8 Apr 2014 - 7:06 pm | माहितगार
इसकाळ, मायबोली आणि मिसळपाव यांचे अलेक्सा विश्लेषण जर आणखी थोडे बारकाईने पाहीले तर मायबोलीचे सिंगल पेज व्ह्यूची टक्केवारी अवघी १२ टक्के इसकाळची २२ टक्के मिसळपावची ३३ टक्के आहे म्हणजे एवढे वाचक एका पेज व्ह्यू नंतर निघून जातात याचाच अर्थ मायबोलीचे वाचक रिटेंशन सरासरी चांगले आहे एवढेच नाही तर मायबोलीचे पर व्हिजीटर एकुण पेजव्ह्यूजचे परसेंटेज बाकी दोघा पेक्षा चांगले आहेच, शिवाय मायबोलीवर व्हीजीटर ने घालवलेला वेळ सुद्धा इतर दोघांपेक्षा अधिक म्हणजे अॅव्हरेज ३० मिनीटे आहे.
8 Apr 2014 - 8:29 pm | माहितगार
अलेक्सा विश्लेषणातून मायबोलीच्या आणि मिसळपावच्या वाचकांच्या कंट्री प्रोफाईल मधील फरकही ढळढळीत पणे समोर येतो. मायबोलीचे ५५% वाचक भारतातून तर ४० टक्के युएसए मधूनच आहेत एवढेच नाही तर मिसळपावच संपुर्ण भारतातील वाचन संख्या लक्षात घेता कंट्री रँकींग ४२७४८ आहे तर मायबोलीला युएसएतल २८२२९ हे रँकींग आहे मायबोलीच पुर्न भारतातल रँकींग आहे ११४६६ आणि मायबोलीची jahirati.maayboli.com मराठी विभागात १६व्या क्रमांकावर स्वतंत्र रँकींग दाखवते, मायबोलीने संपादीत केलेल एक चांगल यश, नाही का !
United Arab Emirates च्या वाचकात मात्र मायबोली पेक्षा मिसळपावचा शेअर चांगला वधारलेला आहे. मिसळपावचे ६४ टक्के वाचक भारतातन तर १५ टक्क्याच्या आसपास युएईतन येतात एवढच नाही तर युएईतील वाचकांच्या कंट्री रँकींग मध्ये मिसळपाव 6,546 रँक मिळवते मायबोली 7,440 वा रँक मिळवते. तसा मी दोन्ही साइटचा नियमीत वाचक नाही त्यामुळे या फरकाच गुपित मिपाकरच उत्तमपणे सांगू शकतील आणि ते समजून घेणे निश्चित आवडेल.
इसकाळचा युएसए मधला कंट्री रँक 105,957 एवढा आहे तर मायबोलीला युएसएतल २८२२९ रँक आहे म्हणजे युएसएतल एन आर एम (नॉन रेसिडन्ट मराठी) माणसांचा शेअर मुख्यत्वे मायबोलीकडे आहे. या अर्थाने मायबोली अभिजनांना रिप्रेझेंट करत असण्याची शक्यता अधिक आहे त्यांचा वाचक हा आर्थीक आणि (मराठी/इंग्रजी दोन्ही) वाचनस्रोतांनी अधिक समृद्ध असल्यामुळे अधिक लिहिता आहे. अधिक लिहितो म्हणून लेखन आणि वाचन कालावधी सुद्धा अधिक नोंदवतो. उलटपक्षी मिसळपावचा अभिजन लेखक वाचक सुद्धा साधारणतः अधिक स्वांतत्र्य हव असलेला अभिजनेतरांशी कंपॅरेटीव्हली अधिक बरे जुळवून घेणारा असल्यामुळे आंतरजालावरील नीमशहरी वाचक मिसळपावकडे येतो पण पुस्तकवाचनात खासकरून इंग्रजी वाचनात आणि स्रोतातील उअपलब्धतेते मागे असल्यामुळे तो लिहितो कमी 'पैसांनी' मिपावरील लेखक आणि वाचक या संख्येतील तफावतीची शक्यता वर्तवली त्याचे गमक यात असेल का ?
मिपाचा वाचक मुख्यत्वे मराठी भाषेतून वाचत असल्यामुळे या दृष्टीने मराठीतील माहिती साठा वाढवण्यासाठी मिपाकरांनी अधिक पुढाकार घ्यावा असे मला वाटते पण या बाबतीतील धाग्या बाबत मिपाकरांकडून पुरेसा उत्साही प्रतिसाद का मिळाला नव्हता अथवा टायपिंग कॉंपीटीशन वगैरे गोष्टींची चर्चा मुद्दाम मिपावर येऊन केली पण मिपाकर यात मागे का, या बाबत अद्यापतरी मी अनभिज्ञ आहे.
8 Apr 2014 - 8:55 pm | पैसा
चांगलं विश्लेषण केलंत. मी मायबोलीवर सुद्धा सदस्य आहे. अगदी रेग्युलर नसले तरी अधून मधून वाचते. आणि लिहितेसुद्धा. सर्वात आधी सुरू झालेली असल्याने मायबोलीला जास्त वाचक बेस मिळतो हे एक कारण असावं. शिवाय तिथे सक्रीय भाग घेणारे बरेचजण अमेरिकेतले आहेत हे ऐकलं आहे. तेव्हा तुम्ही म्हणता तसे अभिजन जास्त प्रमाणात तिकडे वळले असावेत हे शक्य आहेच.
मिसळपाव सदस्य नसताना केवळ वाचणारे अनेकजण आहेत. भेटले की हमखास सांगतात. मात्र त्या तुलनेत लिहिणारे नेमके किती प्रमाणात आहेत हे नीलकांतच सांगू शकेल. कदाचित जरा लहान शहरातील वाचकवर्ग मिसळपावकडे जास्त प्रमाणात वळत असावा. काहीजणांना लिहायचा संकोच वाटतो, थट्टा होईल याचे भीती वाटते त्यामुळेही लोक जरा भितात हे खरं आहे. तेही अनेकदा अनेकजणांकडून ऐकले आहे.
मराठीत माहिती साठा वाढवण्यासाठी मिसळपाववरून जास्त लोक जास्त काम करू शकतील, मात्र बरेचजण यासाठी वेळ नाही हे कारण देतात. शिवाय अनेकजणांच्या ऑफिसातून मिसळपाव ब्लॉक आहे असेही ऐकले आहे. ते मग मोबाईलवरून जमेल तेवढे वाचतात. जास्त लिहू शकत नाहीत. या साईट ब्लॉक असण्याच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. नेमके काय कारण असावे हे कोणी तज्ञ सांगू शकेल.
21 May 2016 - 12:12 am | जव्हेरगंज
सकस चर्चा होणारे असे चांगले धागे वारंवार येवोत !!!
21 May 2016 - 10:55 am | विवेकपटाईत
माझे म्हणाल तर मी ब्लॉग वर, मिसळपाव, ऐसी अक्षरे कधी कधी ग्लोबल मराठी आणि मराठी सृष्टीवर. एकाहून अधिक संकेतस्थळांवर लेख टाकल्याने चोरी होण्याची शक्यता कमी. सुरवातीचं सन १३-१४ पर्यंत १०-१५ लेख दुसर्यांनी स्वत:च्या नावाने खपविले होते. त्याचा मला मानसिक त्रास हि झाला होता. पण मी सर्वाना जाब विचारला. अर्थात त्या बाबतीत आमच्या चिरंजीवानी नेट सर्वांची ईमेल शोधली आणि त्यांना जाब विचारला. त्यात मराठी अड्डात लिहिणारा एक लेखक होता. बहुतेक उचाल्गिरी करणार्यांनी लिहिणे सोडून दिले.
तरीही मराठीत हिंदी पेक्षा तरी जास्त लोक वाचतात. त्यात अमेरिकेत राहणारे मराठी लोक जास्त मराठी वाचतात. माझा अनुभव आता ब्लॉग वरून आंकडे पहिले १५७००० पैकी वाचणारे बहुतेक विदेशांत राहणारे मराठी भाषिक आहेत. आहे. EntryPagvbiews United States 58925 India 49196 Ukraine 11293 Spain 7501 Russia 7278 Taiwan 7120 Germany 3920 France 2132 Netherlands 688 United Kingdom 478.
गेल्या वर्षापासून एक निश्चित आकड्याच्या वर वाचणार्यांची संख्या जात नाही आहे. अर्थात मी काही चांगली मराठी लिहित नाही. पण चांगल्या लिहिणार्यांची वाचक संख्या निश्चित जास्त असेल.
22 May 2016 - 2:34 pm | नाईकांचा बहिर्जी
कंपुबाजीने भल्या भल्या अन चांगल्या साईट बर्बाद केल्या , दुर्दैवाने इथे सुद्धा ते (कंपुबाजी वगैरे) प्रकर्षाने जाणवले.असो
22 May 2016 - 4:20 pm | एकुलता एक डॉन
इकडे असेल कंपूबाजी पण बरबादी होणार नाही
22 May 2016 - 5:06 pm | नाईकांचा बहिर्जी
न होवो हीच आमचीही सदिच्छा! पण कंपुगिरी अन त्यातले छपरी कंपु मेंबर कायम डोक्यात जातात, नवे सदस्य आले की अंगात हिव भरल्यागत काहिबाही करून त्यांची रेवड़ी उडवणे, खरड़फळा टाइप पब्लिक ब्रॉडकास्ट सिस्टम स्वतःच्या वैयक्तिक पेज थ्री सारखे वापरणे ह्याने नव्या मेंबर्स चा ओघ आटु शकतो असे वाटते. असो
22 May 2016 - 4:24 pm | मित्रहो
क्रमांक आता मायबोली पेक्षा वर आहे.
आंतरजाळावर मराठी लिहीआणि वाचवाचनारे वाढत आहेत आणि वाढतच जातील. मोबाइलचा वापर हे पण एक कारण आहे.
मराठी ब्लॉगला मात्र मर्यादित यश मिळेल असेच वाटते. तुमच्या लेखांचा संग्रह. मी तरी तसाच बघतो.
3 Mar 2017 - 6:49 pm | एकुलता एक डॉन
इंटरनेट वाढले पण मराठी संकेतस्थळे नाही वाढलेत
3 Mar 2017 - 7:14 pm | आदूबाळ
का बात कर रहे हो आन्ना...
मराठीपिझ्झा, पहावे मनाचे, बोभाटा अशा अनेक सायटी उदयाला आल्यात की.
3 Mar 2017 - 7:16 pm | एकुलता एक डॉन
पिझ्झा बघतली ,पण ते बहुतेक कॉपी पेस्ट आहे
बाकी साईट्स ची लिंक प्ल्झ
5 Jun 2019 - 3:15 pm | एकुलता एक डॉन
जुना धागा
12 Jun 2019 - 11:09 am | जालिम लोशन
मिपा ची पण तशीच अवस्था होइल.
12 Jun 2019 - 2:24 pm | हस्तर
अकु कोण ?
14 Jun 2019 - 2:32 pm | Rajesh188
भारतीय माणूस खूप संकुचित आहे .
कोणत्या हि भारतीय भाषेतील स्थळा वर असणारे सर्व सभासद स्वतः ल वेगळे समजतात .
कोणत्या हि विषयाकडे तथस्त पने ते बघत नाहीत तर चष्म्यातून बघतात चष्मा धर्माचा असतो ,जातीचा असतो,शहरी पणाच असतो ,शिक्षणाचा असतो , भाषेचा असतो .
त्या मुळे चर्चा होवून त्यात मत मांडणाऱ्या सर्व लोकांनाच मान राखला जात नाही .
तेच युरोपियन भाषेत आणि यरोपियन लोकात खूप मस्त चर्चा होते .
भारतीय लोकांनी ब्रॉड minded झाले पाहिजे .
फक्त कपडे वापरून आणि पिझ्झा खावून शहाणपण येत नाही
16 Jun 2019 - 11:31 am | जॉनविक्क
लोकांमधे मुक्त संवाद असावा, थोडी गंम्मत, थोडे विवाद.... आणि अजून बरेच काही इथं असावे असे वाटते.
नवं लेखकांनी जुने लिखाण वाचावे त्यामुळे मिपावर आपल्या आधीपासून लोकं का नांदत आहेत हे समजायला मदत होईलच पण सोबतीला संस्थळ(सभासद न्हवे) तुमच्याकडून काय अपेक्षेने पहात आहे हे समजायला सुद्धा मदत होईल.
सर्व्हयवल ऑफ फिटेस्ट हा निसर्ग नियम आहे, त्यानुसार नवीन सभासदांकडून अजून चांगल्या लिखाणाची अपेक्षा असणे व अपेक्षाभंगाने नियमीत सदस्यांचा हिरमोड होणे नक्कीच गैरवाजवी नाही. म्हणून अशा सभासदांनी जुन्या लोकांकडून होणाऱ्या टीकेला अथवा दर्जा खालावतो आहे वगैरे भडिमाराला अतिशय सकारात्मकच घेणे आवश्यक आहे....
पण सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट हा थोडा भ्रामक नियम आहे व निसर्ग सांगतो की जे बलवान असतात ते टिकतात असे न्हवे, तर जे बदलाशी जुळवून घेतात तेच टिकतात म्हणून जुन्या सदस्यांनी सुद्धा मिपाशी जुळण्याचा यत्न करणाऱ्या नव्या टग्यानां थोडे सांभाळून समज देणे अपेक्षित आहे. अर्थात ते सुद्धा मिसळीचा तडका राखूनच :) कारण हे मिपा आहे.
23 May 2023 - 11:11 am | एकुलता एक डॉन
आज. आठवण. झाली
23 May 2023 - 2:02 pm | विजुभाऊ
मनोगतवर अलीकडील लेखन हे दोन आठवडे एक दिवसापूर्वी इतके जुने आहे.( हे सर्वात नवीन लेखन होते)
त्याखालोखाल दोन आठवडे चार दिवस आणि तिसर्या क्रमांकाचे नवे लेखन एक महिना तीन आठवड्यांपूर्वी चे आहे.
तेथे कोण लिहीते हे माहीत नाही
23 May 2023 - 6:46 pm | कंजूस
पाच दहा लेखक लिहितात. प्रतिसाद असे नसतातच.
23 May 2023 - 2:38 pm | विवेकपटाईत
३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही, रस्त्यावर मिळणारे काही English पुस्तक सोडले तर. दिल्लीच्या पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तके दिसत नाही. साहित्य विकत घेणारे फारच कमी असतात. प्रेमचंद कालिदास ही नावे ही पुस्तक मेळाव्यात आलेल्या लोकांना माहीत नव्हती.
23 May 2023 - 6:27 pm | चौथा कोनाडा
अगदी सहमत.
ही पिढी व्हिडिओज आणि रील्स वाली आहे, इन्स्टा वाली आहे.
3 Jun 2023 - 2:36 am | चित्रगुप्त
३० वर्षांखालीलच काय, वरिष्ठ पिढीचे लोकही वाचत नाहीसे झालेले असण्याची खूप शक्यता आहे.
मी स्वतःचेच उदाहरण देतो.
सध्या माझे वय ७१ आहे. अगदी लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. पुढे तारुण्यात अगदी बस-ट्रेन प्रवासातच काय, सायकल चालवताना सुद्धा एका हातात पुस्तक धरून वाचायचो. ऑफिसात बराच वेळ मोकळा असायचा, तो सगळा वाचन-लेखन यात घालवायचो. पुढे पन्नाशी-साठीत रोज रात्री अडीच-तीनला जाग यायची, तेंव्हा तास-दोन तास वाचन करायचो. दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा तर असायचेच.
पुढे यूट्यूब, मिपा वगैरे सुरु झाल्यवर प्रत्यक्ष पुस्तके वाचणे कमी होऊ लागले ( मी पूर्ण जन्मात वर्तमानपत्र अगदी क्वचितच वाचले असेल, फार तर एक-दोन वर्षे ) लॅपटॉप, मोबाईल वापरामुळे डोळे बिघडू लागले, वाचायला त्रास होऊ लागला, आणि खरेतर लॅपटॉप, मोबाईलचा उपयोग कमी करायला हवा हे माहित असूनही पुस्तके वाचणेच जवळजवळ बंद झालेले आहे. आता बोला.
मनोंचे पानिपतवरील पुस्तक वाचायचेच, असे ठरवले आहे. इतर काही अलिकडे वाचलेले नाही.
23 May 2023 - 11:47 pm | विजुभाऊ
३० वर्षाखालील पिढी जरा जास्तच फोकस्ड आहे. त्यांना त्यांच्या विषयातील बहुतेक माहिती असते.
यू ट्यूब आणि विकी मुळे बराच फरक पडला आहे.
बाकी ललीत लेखन वाचन मात्र फारच कमी झाले आहे हे नक्की
26 May 2023 - 10:24 am | इपित्तर इतिहासकार
मी सहमत आहे,
स्पेशालिस्ट पिढी आहे ही. अगदी मिलेनियल पिढी पर्यंत तीच जनरलिस्ट असे. हा सूक्ष्म फरक आता मोठा झालाय इतके नोंदवून खाली बसतो.