नमोंची देशाकरताची आर्थीक रणनिती : इकॉनॉमीक टाइम्स मधील मुलाखत

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
22 Apr 2014 - 8:23 pm
गाभा: 

मोदींना पंतप्रधानपदाची संधी किती हे ठरवणारं घोडा मैदान दूर नाही, गणित जुळवा जूळवीत काही वेळ लागलातरी मे अखेर पर्यंत चित्रस्पष्ट होईलच. किमानपक्षी संसदेतेले एका मोठ्या पक्षाचे नेते हे बिरूद तर कुठेच नाही गेल. कोणत्याच पक्षाला २/३ बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने किमान महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाची मदत घ्यावीच लागेल. मोदी आणि त्यांच भविष्यातील अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय (व्यापारी) संबंध या बद्दल इतर मिपा धाग्यांवर चर्चा चालुच आहे. मोदींची बहुसंख्य भाषणे आणि मुलाखती राजकीय आहेत पण इकॉनॉमीक टाईम्सने त्यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे त्यामुळे मिपाकरांच्या अपेक्षांसोबत मोदी काय म्हणतात ते महत्वाचे.

सध्याच्या त्यांच्या बहुसंख्य मुलाखतीतील उत्तरे 'पॉलीटकली राईट' प्रकारात मोडतात. काँग्रेसच्या चांगल्या पॉलीसी चालू ठेऊ विरोधी पक्ष म्हणून आम्ही काँग्रेसला कस सहकार्य केल तसच त्याचही घेऊ वगैरे त्या मुलाखतीत आल आहे. मला जाणवलेल वेगळेपण म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फेडरल स्ट्रक्चर अधिक चांगल्या रितीने राबवण्याच आश्वासन, प्रकल्पांना वेगानी क्लिअरन्सेस देण्याच आश्वासन या सोबतच पर्यावरण विषयक क्लिअरन्सेस अडवणूकीशिवाय देण्याच आश्वासनही त्यात दिसतय. तत्वांना गुंडाळून बसण्या पेक्षा प्रॅक्टीकल व्यावसायिक निर्णय ही पद्धती अंमलात येण्याची शक्यता. इंदिरा गांधी समाजवादी धोरण अमलात आणत पुढे आल्या नमो भांडवली धोरण आमलात आणत पुढे येतील असा अंदाज आहे. केंद्रसरकारी वर्चस्व कमी करायच तरी पंतप्रधान म्हणून विकास दाखवायचा तर अधिकाधीक राज्यातील मुख्यमंत्र्यांपुढे आणि जनतेपुढील प्रेरणा म्हणून ते कसे उभे रहातात यावर खर यश अवलंबून असेल. अर्थात नेमकं काय होईल ते काळ सांगेल.

संदर्भः इकॉनॉमीक टाईम्स मधील मुलाखतः

Narendra Modi interview: Ready to work with Congress; on FDI, policy continuity top priority

प्रतिक्रिया

जातवेद's picture

22 Apr 2014 - 8:38 pm | जातवेद

हमम...आकलन करतोय