रिझर्व बँकेचा नवा आदेश आणि काळा पैसा
मित्रांनो,
रिझर्व बँकेच्या नव्या आदेशानुसार सन २००५ च्या आधीच्या म्हणजे थोडक्यात जिच्यावर साल छापलेले नाही अशा ५०० रुपयांच्या नोटा काही कालानंतर चलन म्हणून अमान्य होतील. ज्यांच्याकडे असतील त्यांनी नाव गाव पत्ता आदि सोपस्कार करून त्याऐवजी चालतील अशा नोटा बदलून घ्याव्यात असे साधारण म्हटले गेले आहे.
त्यामुळे -
१) विदेशातून काळ्यापैशाला परत आणण्याच्या विविध पक्षाकडून केल्या जात असलेल्या भीष्म प्रतिज्ञांच्या बोलीवर काय प्रभाव पडेल?
२) काळा पैसा असा बोऱ्या भरभरून स्विस व अन्य देशांच्या बँकात रचून ठेवला जातो काय?