केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार स्वस्त होणार आहेत.
या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी अबकारी दर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली तसेच छोट्या वाहनांसाठीचा अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
- लष्करामध्ये एक रँक एक पेन्शन योजना.
- लष्कराच्या पेन्शन योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद
यामुळे सुबोध खरे साहेबांकडून एक पार्टी येऊ शकते. अजून कोण आहेत लष्करात जे पार्टी देऊ इच्छितात?
- अबकारी कर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर
- छोट्या वाहनांसाठी अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर.
- SUV वाहनांसाठी अबकारी कर ३० टक्क्यांवरून २४ टक्क्यांवर.
राजेंद्र मेहेंदळे साहेबांकडून एक पार्टी येऊ शकते. अजून कोणाला नवीन गाड्या घेऊन पार्टी द्यावीशी वाटते?
- मागसवर्गीयांमध्ये उद्योजक निर्मितीसाठी २०० कोटी
- युवक कौशल्य विकास यंत्रणेसाठी १ हजार कोटी
- शेतीच्या कर्जात २ टक्के व्याजाची सुट कायम राहणार.
- यंदा सरकारी बँकाच्या ८ हजार पेक्षा जास्त शाखा उघडणार.
- मार्च २०१३ पर्यंतच्या शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सूट मिळणार.
यामुळे उद्योजक निर्मितीसाठी व उच्च शिक्षणासाठी मोठी मदत होऊ शकते.
मिपावर उद्योजक निर्माणावर भर देणारे नवीन धागे येऊ द्यात व सर्व मिपाकर याचा फायदा घेऊ यात.
प्रतिक्रिया
18 Feb 2014 - 12:48 pm | मदनबाण
पीसी स्वस्त होणार आहे,अपग्रेड करण्याचा विचार आहे...पण हे केव्हा पासुन लागु होणार आहे ?
18 Feb 2014 - 12:53 pm | सचिन कुलकर्णी
१ एप्रिलपासून - बजेटला संसदेकडून मंजुरी मिळाली तर. (अर्थात तशी ती मिळतेच दरवर्षी)..
18 Feb 2014 - 12:58 pm | आयुर्हित
अबकारी कर (excise duty)हा बजेट मध्ये सांगितल्याच्या क्षणापासून(with immediate effect) बदलत असते.
18 Feb 2014 - 12:54 pm | आयुर्हित
१७ फेब्रुवारी पासून जो नवीन माल(उत्पादन)कारखान्यातून बाहेर पडेल, त्यावरच हा फायदा होईल.
जो साठा विक्रेते आधीपासून धरून बसले असतील, त्यावर हा फायदा होणार नाही.
18 Feb 2014 - 6:42 pm | जेपी
काय फायदा घेणार . आता काप गेली आणी भोक उरली आहेत सगळी . महागाईने बेजार केल . आता उसाला भाव देताना ही कां कू चाललाय .
18 Feb 2014 - 8:46 pm | सुबोध खरे
मी लष्करातून बिना पेन्शन बाहेर पडलो आहे. पण पार्टीचे म्हणाल तर कट्टा ठरवा बिल मी भरीन.
हा का ना का
18 Feb 2014 - 10:59 pm | आयुर्हित
ओ नो.... मी समजू शकतो काय परिस्थितीतून जावे लागते ते, अक्षरश: तावून सुलाखून निघावे लागते ते.
पार्टी म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करणे एवढेच महत्त्वाचे आहे.
काही हरकत नाही, नाराज होऊ नका.
आपण दुसरे एखादे चांगले कारण शोधूया की, आनंद साजरा करण्याचे!
धन्यवाद.
18 Feb 2014 - 11:36 pm | सुबोध खरे
आनंद साजरा करण्याचे कारण शोधावे लागते ?आणि नाराज होण्याचे मला तर कोणतेच कारण दिसत नाही.
उगाच कारण शोधण्याच्या लफड्यात कशाला पडताय ? वेळ आणि ठिकाण सांगा कट्टा करून टाकू
हा का ना का.
19 Feb 2014 - 7:13 pm | अनिरुद्ध प
मु वि च्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
20 Feb 2014 - 11:13 am | आयुर्हित
शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी आणि वाढीव मुदत