'बिग डेटा' - म्हणजे काय रे भाऊ?
आज तंत्रज्ञानाचा वेग आणि झपाटा इतका आहे की त्या वेगाने बावचळूनच जायला होते. त्यात सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या सगळ्या ‘दादा’ कंपन्यांना 'मार्केट शेयर'वर ताबा मिळविणे गरजेचे असल्याने त्यातली स्पर्धा अतिशय जीवघेणी झालेली आहे. त्यामुळे ‘टाइम टू मार्केट’ ह्याला इतके महत्त्व आले आहे की थोडा उशीर झाला तर स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मग एखादी संकल्पना घेऊन बाजारात त्यावर आधरित एक गरज निर्माण करून, त्यावर आधारित प्रॉडक्ट्स बनवून ती विकण्यासाठी ‘बाजारपेठ’ तयार करण्याचे काम ह्या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्या नेमाने करत असतात.