बिग ब्रदर इज वॉचिंग.............

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
2 Jul 2013 - 10:54 pm
गाभा: 

विकिलिक्सच्या नंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा कारभार जगातील तमाम जनतेसमोर आणणारा एडवर्ड स्नोडेन ला भारतीय माध्यमांनी तितकीशी प्रसिद्धी दिल्यासारखे वाटले नाही. याचे कारण काय असावे ?
एडवर्ड स्नोडेनने आतापर्यंत २१ देशांच्या सरकारांकडे आश्रय मागीतला आहे मात्र व्हेनेझुआला या छोट्या देशाव्यतीरीक्त इतर कुणीही त्याला होकार दिल्याचे आढळले नाहीये.
खरेतर अमेरिका आपल्या देशावर देखील हेरगिरी करते हे प्रत्येकाला माहित आहे मात्र त्यांच्याशी उघड पंगा घेणे शक्य दिसत नाहीये. मग टिचभर व्हेनेझुआलाकडे ही ताकत (हव तर मग्रुरी किंवा मुर्खपणा म्हणा) आला कोठून ?
आता एडवर्ड स्नोडेनचे पुढे काय होते ते पहायचे.
विकिलिक्सच्या संस्थळावरील हा वॉलपेपर फारच आवडला.
त्यावरील वाक्ये खालीलप्रमाणे.....

Big brother is watching.....
So are we.....

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

6 Jul 2013 - 9:09 am | रमेश आठवले

वेनेझुएला ह्या देशाची खनिज तेलाची उत्पत्ती खूप आहे आणि तो देश त्यांची निर्यात करतो. यामुळे आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहे .त्या शिवाय त्याचे राजकीय धोरण cuba सारखेच म्हणजे वाम पंथाचे आहे. यामुळे त्या देशाला स्नोडेन ला आश्रय देऊन अमेरिकेसमोर नाक खाजवणे परवडते .