मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

मावळतीचा सूर्य

रेशा ·
लेखनविषय:
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

((मी सदस्य होणारच!))

अन्या दातार ·
आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789 आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे.

प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...

विसुनाना ·
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्‍या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही. सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प.

सुदर्शन पटनायक

चैतन्य गौरान्गप्रभु ·
वाळू! केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण!

शाळा : प्रत्येकाच्या मनातली

परिकथेतील राजकुमार ·
मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्‍याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे.

उडालं गेऽऽ धर!!! (एका विस्कळीत लेखाचे विच्छेदन)

यकु ·
लेखनविषय:
मूळ कलाकृती इथे वाचा: http://www.aisiakshare.com/node/451 आपण आपल्यासाठी सोपे नसलेले प्रश्न स्वत:लाच कशाला बरे विचारतो? कारण आपला आजूबाजूला जे घडतंय, घडत आलं आहे त्यावर, आपल्या आधीच्या किंवा सोबतच्या माणसांवर, अनुभवांवर, कश्‍शा-कश्शावरही, अगदी स्वत:चा स्वत:वरही विश्‍वास नसतो. त्यामुळं या सोप्या प्रश्नांची उत्तरं आधीच्या लोकांच्या विचारपद्धतीतून आलेल्या धारणांपेक्षा वेगळीच असतात. कुठेही गेल्यावर कशा प्रतिक्रिया याव्यात ते आपल्याला अपेक्षित असतं. एकदम वेगळेच प्रतिसाद आले तर मग डोकं सुन्न होतं. कालच एका ठिकाणी फिरायला गेल्यावर असाच काहिसा अनुभव आला.

विनोबा भावे-अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत अध्यात्मातील वन लायनर्

कापूसकोन्ड्या ·
नमस्कार, या आठवड्याच्या सुट्टीत इंटरेनेटवर लक्ष्मीबाई टिळक आणि प्रभाकर माचवे यांचे काही लिखाण शोधत असताना, अचानक हाती घबाड सापडले. ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत. त्यात माझ्या आवडीच्या लेखकांपैकी विनोबा भावे यांचा १९४६ सालात प्रसिद्ध झालेला विचारपोथी नावाचा एक ग्रंथ सापडला. पुस्तक प्रथम अधाशासारखे उतरवून घेतले. स्कॅन करून पिडिएफ केलेले असल्यामुळे समोर ठेवून स्वत: टंकलेखन केलेले आहे.

महात्मा गांधी.. एक विचार

गणेशा ·
लेखनविषय:
नोट : सदर लेखन हे माझे नसुन माझा नेट फ्रेंड 'दिपक साळुंखे' याचे आहेत. हे लेखन येथे देण्याचे कारण फक्त येव्हडेच आहे कीहे लेखन वाचुन कोणा एकाच्या जरी विचारात बदल झाला तर या धाग्याचे उद्दीष्ट्य साध्य होयील. तसेच मागे एकदा सांगितल्या प्रमाणे गांधीजींच्या बद्दल असणारा विचार माण्डणार असे बोलण्याने हा धागा देत आहे. पार्श्वभुमी : मी अगोदर गांधीजींचा उल्लेख आजचे कित्येक तरुण मंडळी करतात तसाच "टकल्या" म्हणुन करायचो. तेव्हा "मी नथुराम गोडसे बोलतोय.." नाटक पाहिलं होतं आणि त्याच्या प्रचंड प्रभावाखाली होतो.

दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!

डॉ.श्रीराम दिवटे ·
दी क्लिन (बोल्ड) पिक्चर! त्या पिक्चरच्या नावात जरी ‘डर्टी’ शब्द मुद्दाम टाकला असला तरी एका सत्यकथेची ती क्लीन स्टोरी असून ती पाहतांना त्यातील बोल्ड सीन्स ओघानेच अंगावर येत राहतात व नेमकं फिल्म इंडस्ट्रीत असंच घडतं का? या मंथनात रंगलेला प्रेक्षकच अखेरीस क्लीनबोल्ड होऊन थिएटरच्या बाहेर येतो... कथानक सर्वांना परिचित वाटावं असंच असलं तरी यशाच्या शिखरावर असतांना अल्पावधीत प्राप्त केलेलं ते भौतिकसुख कसं बोचू लागतं, कसा पलटवार करू पाहतं आणि एकदा जिंकलेला जुगार कसा लगेच हारावा लागतो याचं मोठं संयमी चित्रण करण्यात फिल्म यशस्वी ठरली आहे. थोडक्यात ‘विषय’ असा फुलत जातो... ती एक अल्लड मुलगी- रेश्मा.

मगधीरा

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
काजल अगरवाल हिच्यावरती आजकाल आमचा भारी जीव. तिच्यावरती चित्रित केलेले मगधीरा मधील ' धीर धीर..' हे आमचे अत्यंत आवडते असे गाणे.