भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 5:05 pm

आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.

ध्येय(Goals): एक भारत, श्रेष्ठ भारत, सुशासन, सर्वसमावेशक सर्वस्पर्शी व सर्वदेशी विकास

आव्हाने(Challenge): भ्रष्टाचार, महागाई, रोजगार, आर्थिक विषमता, देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास, वित्तीय नुकसान(CAD), रुपयाचे झालेले अवमूल्यन, परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था, देशातील अंतर्गत बाजारपेठेत चीन व इतर देशांनी काबीज केलेला मोठा वाटा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारतीय निर्यातीचा घटलेला वाटा.

मुख्य कार्यवाही केंद्र(Focus for Action): महिला सबलीकरण व संरक्षण, शेतकरी, कामगार, विद्ध्यार्थी, रोजगार निर्माण करणारे छोटे व्यावसायिक यांना हव्या त्या सुविधा स्वस्तात पुरविणे, लहान लहान खेड्यांपर्यंत रस्ते व मुलभूत साधनसुविधा उपलब्ध करणे, औद्योगिक उत्पादने, जल व उर्जा स्वतंत्रता, रस्ते-जहाज व नवीन गोदी बांधणी, शिक्षण, स्वास्थ्य व संशोधन यात अग्रेसर होणे, सिंचनाचे आधुनिक मार्ग अवलंबणे, नवीन मार्ग शोधणे व जरूर पडल्यास नदीजोड प्रकल्प उभरणे, पर्यटन व निर्यात यात मुलभूत सुधारणा, आर्थिक क्षेत्रासाठी व प्रामुख्याने NBFC साठी चांगले नियंत्रक उभे करणे व भारताला आर्थिक महासत्ता बनविणे.

काश्मीर व राममंदिरासारख्या मुद्द्याला भारतीय घटनेला अनुसरूनच कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-
- काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार. कठोर उपाययोजना करणार.
- कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार.
- विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
- ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि संपत्तीच्या वाढीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीची गरज आहे, तेथेच एफडीआयला परवानगी देणार.
- नाशवंत शेतीमालाचा इतर भागांमध्ये पुरवठा करण्यासाठी अॅग्री रेल नेटवर्क उभारणार.
- हायस्पिड ट्रेन नेटवर्कसाठी डायमंड क्वॉड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करणार.
- महागाई रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
- शिक्षण आणि उद्योगात अल्पसंख्याकांना अधिक संधी देणार.
- केंद्र आणि राज्य सरकार या मधील संबंध सुधारण्यावर भर देणार.
- ज्युडिशिअल रिफॉर्म, इलेक्ट्रोल रिफॉर्मला प्राथमिकता देणार.
- नवीन आरोग्य धोरण आणले जाईल.
- ग्रामीण भागात वाय-फाय झोन उभारणार.
- महिला सबलीकरणासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड.
- टॅक्स व्यवस्था आणि बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष भर.
- प्रत्येक राज्याच्या राजधानीत एम्स उभारले जाईल.
- नॅशनल ई-वाचनालय सुरू केले जाईल. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
- राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. उर्दू भाषेचे संरक्षण आणि प्रसार केला जाईल.
- एससी, एसटी प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक न्याय आणि सबलिकरण करण्यावर भर.
- शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी दूर करणार.
- प्रत्येक भारतीयाला पक्क्या घराचे आश्वासन.

सर्व वर्ग, प्रांतिय व धर्मियांना सुख, शांती, समाधान, सुरक्षा, विकास व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाची विक्रयमूल्य (ब्रांड व्हॅल्यू) वाढविण्यासाठी गुजराथचे सलग तीन वेळेला निवडून आलेले व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले “माननीय श्री नरेंद्र भाई मोदी” व “भारतीय जनता पक्ष व इतर मित्र पक्षांचे खासदार पदासाठीचे इतर अधिकृत उमेदवार” यांनाच निवडून आणावे, ही विनंती माननीय श्री लाल कृष्ण अडवाणी व श्री राजनाथ सिंग यांनी केलेला आहे.

प्रथमदर्शनी अशक्य भासणारे परंतु तितकेच महत्वाचे मुद्दे ऐकून माझे कान टवकारले गेले व हातातील कामे सोडून मी टीवीवर नजर खिळवून बसलो. देशहिताला प्रथम व पूर्ण प्राधान्य देवून भाजप व मित्र पक्षांनी निवडणूक जिंकल्यावर काय चांगले होवू शकते यावर केलेला विचार मनाला पूर्ण भावून गेला. निवडणुकीला सामोरे जातांनाच अगदी पहिल्या पायरीवरच या तऱ्हेने बारीकसारीक गोष्टींचा पूर्ण विचार करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे व पक्षाची देशाप्रती असणारी एकूण तळमळ (प्रतीबद्धता) या “संकल्प पत्रा” द्वारे व्यक्त केली गेली आहे असेच वाटले.

चांगला मुद्दा हाती नसल्यामुळे, अगदी निवडणूक सुरु होण्याच्या मुहूर्तावरच हे प्रकाशन झाले आहे, यावरच बऱ्याच पक्षांनी टीका केली आहे. इतर सर्व पक्षांनी निव्वळ कागदी प्रकाशनाची औपचारिकता दाखवून केवळ मतदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असेच वाटते. त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे. या आरक्षणामुळे फक्त वरवर लेप लावून खालची जखम तशीच भळभळत ठेवण्यासारखेच आहे, हे आजवर कोणाच्याही लक्षात कसे आलेले नाही?

नुसती खोटी प्रलोभने देत व मोठमोठे घोटाळ्यांचे विश्वविक्रम रचलेल्या कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात तर पुढच्या एका वर्षात १० लाख रोजगार निर्माण करू अशी पोकळ आश्वासने दिली आहेत, ज्यावर कोणा मतदाराचा विश्वास बसेल का?

गरिबांच्या रोजच्या खर्चावरचे चमत्कारिक व अवास्तव गणित करून कोंग्रेसच्या नियोजनमंत्र्यांनी त्यांच्या तोंडावर चपराक मारलेली आहे, हे कोणी विसरेल का?

विदेशी अर्थपुरवठ्याशिवाय विकास शक्य नाही असेच इतर सर्व विरोधी पक्षांना वाटत असतांना, आजपर्यंत असा आमुलाग्र बदल घडवण्याचा “१८०अंश विरुद्ध” विचार कोणत्याही पक्षाला करणे जमलेले नाही. पण काळाची हीच खरी गरज आहे, ज्यामुळे मरगळलेली भारतीय मने निश्चितच जागरूक होऊन भारत एक आर्थिक महासत्ता बनेल अशी खात्री वाटू लागते. व त्याचा परिणाम कि काय गेल्या १० वर्षात रुपयाचे मूल्य ४० वरून ६८रुपये प्रती डॉलर एवढे घसरलेले असतांना नुसते “मोदीच निवडून येतील असा मतदारांचा आशावाद” दोन महिन्यात ५९ रुपया प्रती डॉलर पर्यंत मूल्यवर्धन करू शकतो, याचा अर्थ मोदी निवडून येण्याबद्दल किती उत्सुकता व विश्वास आहे हेच दिसून येते.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!

एक आवाहन: मेरा देश लंगडा हो गया है|आप देशको उठाकर चला दिजीये|

धोरणसमाजजीवनमाननोकरीअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारअभिनंदनप्रतिक्रियामाध्यमवेधबातमीशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

7 Apr 2014 - 5:15 pm | शशिकांत ओक

मित्रा,
निवृत्त, आम्हाला 'वन रँक वन पेंन्शन' टंगळ मंगळ न करता लागू केले जाईल ही घोषणा आयुर्हितकारक म्हणून भावली...

विकास's picture

8 Apr 2014 - 2:59 am | विकास

ज्या आप्तेष्टांना आणि पारंपारीक सत्ताधिशांना पाठींबा देणार्‍या वाचक/सदस्यांचे सध्याच्या काळातल्या लोकसत्तेमधील संपादकीय वाचून डोके भणभणते त्यांना एक सुसह्य फरक जाणवेल असा या विषयावरील आजचा अग्रलेख वाचण्यासारखा आहे असे वाटते.

जोशीबुवांचे चऱ्हाट

अर्थात त्याचा अर्थ इतर पक्षिय शहाणे ठरतात असा नाही. त्या संदर्भात नुसत्या अग्रलेखाच्याच नाही तर वर्तणुकींच्या पण लिंक्स देता येतील. काळजी नसावी. ;)

दिलेल्या लिंक वरचा सुविचार:
बुध्दीमान व्यक्ती शत्रुंचा देखिल उपयोग करून घेतात, पण मूर्ख व्यक्तींना मित्रांचा देखिल उपयोग करून घेता येत नाही.
वाचला आणि संपादकीय लेख वाचल्याबरोबर त्याची १००% प्रचीती आली!
असो.

गिरीश कुबेर किंवा कुमार केतकर कोण आहे ह्या लेखाचा लेखक? कळले असते तर अजून बरे झाले असते.
जो कोणी का असेना संपादक, अगदी सुमार बुद्धी असलेलाच आहे, हे लेख वाचल्यावर स्पष्ट होते.

किती अज्ञानात जगतात लोकं ? आणि चांगला मार्ग दाखवणाऱ्यांनाही ते मानायला तयार नसतात.
या संपादकांना मी "आळसाधीपती अज्ञानपरायण" पदवी द्यावीशी वाटते.

कारण लेखात आळसाधीपती अज्ञानपरायण संपादक म्हणतात:

अकराव्या शतकात भारतदर्शन केलेल्या आणि येथील प्रगतीमुळे दिपून गेलेल्या स्पॅनिश लेखकाचा मुबलक दाखला प्रा. जोशी यांच्या जाहीरनाम्यात आहे. या प्रवासी लेखकाच्या मते त्यावेळी भारत हा विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर होता. या स्पॅनिश अभ्यासकास भारतातील ही प्रगती कोठे दिसली हे कळावयास मार्ग नाही. अकराव्या शतकात भारतात दक्षिणेत चोला साम्राज्य कर्तृत्वाच्या शिखरावर होते. परंतु म्हणून त्या काळात भारतात वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीचे दीपस्तंभ निर्माण झाले, असे मानणे 'आपल्याकडे सर्व काही होते', असे मानत स्वांतसुखात रमणाऱ्यांना शोभते

सोरटी सोमनाथवर १७वेळेला स्वारी करून लुटणाऱ्या गजनीच्या मोहम्मदाबरोबरअल बेरुनी नावाचा विद्वान दुभाषी येत होता.येथे भारतातील मौल्यवान संशाधन,ग्रंथ संपदा व असलेले लिखाण उंटावर लादून न्यायचा. हे सर्व ज्ञान त्याने भाषांतर केले. भारतीय संशोधकांनी खगोलविज्ञानावरील लावलेले शोधावरील त्याचे "तारीख अल हिंद" हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेली पुस्तके वाचून व भारतात येणारे व्यापारी यांच्या मुलाखती घेणारा "अबू अब्दुल्ला मोहम्मद इद्रिसी" हा मोरक्कन असून पालेर्मो-स्पेन मध्ये राहणारा (म्हणून स्पॅनिश)याने आपल्या "किताब नुझत अल मुश्ताक" व किताब रुजर “The Book of Roger” मध्ये भारतीयांनी लावलेल्या शोधांवर विस्तृत वर्णने आली आहेत.

फार काय तर अगदी प्राचीन भारताने लावलेले शोध वरही सारे लिखाण उपलब्ध आहे.
आभार:Reocity

राजेश घासकडवी's picture

8 Apr 2014 - 8:35 am | राजेश घासकडवी

कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे.

हे तुमचं मत आहे की भाजपाचं? नाही, म्हणजे नक्की कोण यडपटासारखं बोलतं आहे हे कळायला मदत होईल. कारण गेल्या १० वर्षांत आयटी इंडस्ट्रीमध्येच २० लाख लोक आले आहेत. आणि त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून सुमारे १ कोटी रोजगार तयार झाले आहेत... दुवा.

आयुर्हित's picture

8 Apr 2014 - 2:28 pm | आयुर्हित

Forget jobless growth, India's job base is actually shrinking dramatically. Even as growth sags alarmingly and the third quarter for Financial Year 2012-13 saw GDP coming in at 4.5 per cent, news comes in that India has lost 5 million jobs in a five-year period ending 2010, according to the Planning Commission.

Amid economic slowdown, India lost 5 million jobs during 2005-2010

राजेश घासकडवी's picture

9 Apr 2014 - 7:50 am | राजेश घासकडवी

अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ ते २०१० मध्ये नोकऱ्या वाढल्या असं रिपोर्ट सांगतो. कमी झाले ते मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स. त्यातही २००० ते २००५ मध्ये तेच मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स दहा मिलियननी वाढले होते... शिवाय, तुम्ही त्या पाच वर्षांचं नाही, तर गेल्या दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्याचं लिहिलं आहे. गेल्या दहा वर्षांत भारताचं जीडीपी दुप्पट झालं (इन्फ्लेशन वगळून). आणि जॉब्स तितकेच राहिले, म्हणजे दरडोई प्रॉडक्टिव्हिटी दुप्पट झाली असं तुम्ही म्हणताय?

दहा वर्षांत फक्त सव्वा लाख नोकऱ्या वाढल्या हे तुमच्या लेखातलं विधान आहे. ही आकडेवारी तुम्ही कुठून काढली ते सांगा.

फक्त माहितीचे तंत्रज्ञानविषयी बोलायचे झाल्यास

ज्यावेळी देशात NDA चे सरकार होते वार्षिक निर्यातवाढ ४०% होती.(१९९९-२००४)
पण
ज्यावेळी UPA चे सरकार आले, पहिल्या ५ वर्षात वार्षिक निर्यातवाढ 3०%वर आली आणि UPA२ च्या काळात पुढच्या ५ वर्षात ती फक्त ९% आहे.(२००४-२०१४). असे जर असेल तर नोकऱ्या वाढणार का कमी होणार?

Nandan Nilekani's Aadhaar project a political gimmick with no vision

सुमारे दोन लाख लोकांचा सुटला रोजगार: वाहन उद्योगासाठी गेले आर्थिक वर्ष सर्वाधिक कठीण काळ होता. या काळात वाहन उद्योगातील उत्पादनाच्या प्रक्रियेतील कच्चा माल पुरवणाऱ्यांपासून ते वाहनांची विक्री करणाऱ्या वितरकांपर्यंतच्या मालिकेत सुमारे दीड ते दोन लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे.
- विक्रम किर्लोस्कर, अध्यक्ष, सियाम
साभार:घटती वाहनविक्री रोजगाराच्या मुळावर
- - सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 एप्रिल 2014 - 01:00 AM IST

विवेकपटाईत's picture

8 Apr 2014 - 8:56 am | विवेकपटाईत

५० लाख लोक या घटकेला रस्त्यावर बेरोजगार झालेले आहे. चालू कामे बंद झालेली आहे नवीन स्वीकृत प्रोजेक्ट्स वर काम सुरु झालेली नाही. हीच दशा रेल्वेची आहे. infrastructure बंद करण्या मागचा हेतू काय?

वोट देण्याआधी अवश्य वाचा:
माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत,

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2014 - 11:53 am | श्रीगुरुजी

जाहीरनामा हा केवळ उपचार असतो. मी कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा कधीच गांभिर्याने घेत नाही. कोणताही पक्ष आपला स्वतःचा जाहीरनामा गांभिर्याने घेत आहे असे वाटत नाही.

आयुर्हित's picture

8 Apr 2014 - 4:29 pm | आयुर्हित

"मायबाप जनतेने" आतातरी लक्ष घालावे म्हणतो!

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2014 - 12:43 pm | प्रकाश घाटपांडे

हा वचननामा आहे कि जाहिरनामा? सर्वेपि सुखिन: संतु।

कृपया http://bjpelectionmanifesto.com/ वरून सर्व माहिती उतरवून घ्यावी, हि विनंती.

हा जाहीरनामाच. शिवसेनेचा वचननामा, मनसेचा वचकनामा आणि सर्वेपि सुखिन: संतु म्हणजे common minimum programme :)

ऋषिकेश's picture

8 Apr 2014 - 1:51 pm | ऋषिकेश

१.

देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास

छ्या नेमका एन्डीएच्या ६ वर्षातच काय तो भरपूर विकास झाला असा दावा भाजपाचा असेल तर तो खुळचटपणाचा आहे. वाजपेयी सरकारच्यावेळी विकास झालाच, पण म्हणून नेहरू, शास्त्री, श्रीमती गांधी, राव, मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला विकास अल्पसा वगैरे कसा ठरतो हे कळत नाही! प्रत्येक कार्यकाळात विकासाचा दर कमी जास्त आहे हे खरेच पण त्याची कारणे वेगावेगळी आहेत.

२.

विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.

म्हणजे काय करणार हे जाहिरनाम्यात दिलेले नाही. आणि त्याबद्दल काही स्पष्ट योजना भाजपासकट कोणत्याही पक्षाकडे असण्याची शक्यता कमीच

३.

त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे

भाजपाचाही महिला आरक्षणा पाठिंबा आहे.

बाकी भाजपाच्या घोष्णापत्रात काही भाग (विशेषतः मुस्लिमांसाठी काहितरी ठोस योजनांचा, इ-वाचनालय, डायमंड क्वाड्रिलॅटरल वगैरे) आवडला हे ही नमुद करतो, मात्र बाकी बहुतांश गोष्टीत नव्या वेष्टणात तोच माल भरला आहे.

आज एक लेख वाचला, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात....प्रचंड आवडला.....

तो पूर्ण लेख इथे पेस्ट करतोय...
*सार्वत्रिक निवडणूक आणि मुस्लिमांची भूमिका *
हिंदुस्थानात मुसलमान स्वत:च्या ताकदीवर ना राष्ट्रीय पक्ष उभारू शकतात ना लोकसभेत ते स्वत:ची बाजू प्रभावीपणे मांडू शकतात. असे का व्हावे याचा विचार निवडणुकीच्या विचारापेक्षा अधिक सखोलतेने करणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षातील मुसलमान असो, तो स्वत:ला केवळ मुसलमान म्हणूनच अभिव्यक्त करतो, हिंदुस्थानी म्हणून नव्हे. ते स्वत:ला जोपर्यंत हिंदुस्थानी म्हणवून घेणार नाहीत तोपर्यंत कोण त्यांना खरा देशवासी म्हणेल?
प्रचंड जोर लावल्यानंतरही यंदा कॉंग्रेस आपले सरकार बनवू शकणार नाही हे निश्‍चित आहे. अर्थात तरीही कॉंग्रेसला मुस्लिमांची मते आवश्यक आहेत त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही कॉंग्रेसची गरज आहेच. ज्या राज्यात दंगे होतात त्या राज्य सरकारला मुस्लिम अतिशय आक्रस्ताळेपणाने बदनाम करतात. उत्तर प्रदेशात मुस्लिम लोक समाजवादी पक्षाचा उदोउदो करीत. परंतु मुजफ्फरनगरच्या दंग्याने त्यांचे डोळे उघडले. आता उत्तर प्रदेशातील मुस्लिमांचा कल कोणत्या पक्षाकडे वळेल? असा विचार केला जात आहे. तात्पुरत्या निवडणुकीपुरता होणारा हा विचार राष्ट्रीयदृष्ट्या मात्र अतिशय उथळ आहे.
इतिहास सांगतो की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांनी केलेल्या बहुतांश मागण्या कॉंग्रेसने जाणीवपूर्वक मान्य केल्या. याच्या अगदी उलट परिस्थिती पाकिस्तानात आहे. तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अहमदियांबरोबरच स्वत: मुसलमानांची तरी काय स्थिती आहे? त्यांच्याच इस्लामी राष्ट्रांमध्ये त्यांची ओळख तालिबानी आणि दहशतवादी अशीच आहे. हिंदुस्थानात फाळणीच्या काळाप्रमाणे आज मुस्लिम आर्थिक आणि राजकीय पातळीवर अस्थिर नाहीत. त्यामुळे खरे तर आता त्यांनीच बदलायला हवे. मुसलमानांच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानातील विरोधी पक्ष हे त्यांचे दुश्मनच असतील आणि कॉंग्रेसही त्यांच्यावर अन्यायच करीत असेल तर हिंदुस्थानी राजकीय व्यवस्थेत त्यांच्या समस्यांचे समाधान कसे होणार?
काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम नेत्याने म्हटले होते की, कॉंग्रेसने मुसलमानांना वेठबिगार बनवले. असे असेल तर मग ते वारंवार कॉंग्रेसकडे आपले रक्षण करा, अशी मागणी का करतात? येथील सामान्य मुसलमानांनी लक्षात घ्यायला पाहिजे की, त्यांच्या नेत्यांनी त्यांचा वापर करून केवळ आपले खिसे भरले आहेत. त्यांच्या याच प्रवृत्तीचा कॉंग्रेस ६२ वर्षांपासून फायदा घेत आहे. मुसलमानांची अवस्था त्या बकर्‍यासारखी होते ज्याचा बाजारात जाहीर लिलाव होतो. मुसलमानांच्या अदूरदर्शीपणामुळेच त्यांचा स्वाभिमान विकला जातो आणि ते निव्वळ कॉंग्रेसभोवतीच पिंगा घालत बसतात.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील दलित आणि मुस्लिमांची परिस्थिती एकसमान होती. आज दलित बांधव वेगाने प्रगती करीत आहेत. त्यांनी स्वत:चे अस्तित्व सिध्द केले. पण मुसलमान मात्र कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दरवाजात भिकेचा कटोरा घेऊन उभाच आहे. खरे तर दलितांनी आरक्षणाचा फायदा मिळवून स्वत:ची प्रगती साधली त्याचप्रमाणे मुसलमानांनी अल्पसंख्याक म्हणून कमी का फायदा घेतला आहे? पण ते केवळ धर्मातच गुरफटून राहिले. जरी ते गरीब असले तरी हज यात्रेला जाणार्‍या जगभरच्या मुस्लिमांत सर्वाधिक हिंदुस्थानी मुसलमानच का असतात. कारण हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान उपलब्ध आहे. यंदा तब्बल चार लाख मुसलमान मक्केला जाणार आहेत. हजसाठी तब्बल पाच लाखांचे तिकीट ते कसे घेऊ शकतात? हज कमिटीने प्रत्येक प्रांतात सरकारकडून हज हाऊस बनवून घेतले. हिंदुस्थानातील अन्य धर्मीय एवढा पैसा खर्च करू शकतात का? अल्पसंख्याक म्हणून देशातील प्रत्येक राज्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचीच शाखा त्यांना का हवी, देशात असंख्य विद्यापीठे असताना अलिगढ किंवा दिल्लीच्या जामीया मिल्लीयाच्याच शाखेचा आग्रह हे कशाचे द्योतक आहे? सर्वोच्च न्यायालयात जेव्हा शरीयतविषयक एखादा कायद्याचा मुद्दा येतो तेव्हा मुस्लिमांची मागणी असते की, त्यांच्यासाठी पर्सनल लॉनुसार चालणारी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभारून देण्यात यावी. स्वत:ला धर्माच्या नावावर ते विनाकारणच श्रेष्ठ समजत असतील तर देशातील बहुसंख्य समाजाने हे का खपवून घ्यावे?
लोकशाहीच्या नावाखाली एका सरकारांतर्गत दुसरे सरकार आणि एका कायद्याऐवजी दुसराच कायदा कसा चालेल? एक स्वतंत्र देश मागितल्यासारख्याच या मागण्या नाहीत का? निवडणुकांच्या काळात मुसलमानांनी एक हिंदुस्थानी नागरिक या नात्याने मागण्या करायला हव्यात. अन्यथा देशाच्या अखंडतेसाठी हाच सर्वात मोठा धोका ठरल्याशिवाय राहणार नाही. जगातील कोणत्या मुस्लिम राष्ट्रात शिया आणि सुन्नी मुसलमांनांसाठी वेगवेगळी कायदेव्यवस्था आहे? किंवा वर्ग किंवा पंथाच्या आधारावर त्यांची वेगवेगळी विद्यापीठे आहेत? मुस्लिम राष्ट्रांमध्येच जर अल्पसंख्य, बहुसंख्य असे लाड नसतील तर हिंदुस्थानात ते का असावेत?
राज्यघटनेने मागासांसाठी दोन मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. एकतर त्यांनी अल्पसंख्य म्हणून सरकारी सोयी-सवलती घ्याव्यात किंवा मग आरक्षण मिळवून विकास साधावा, परंतु मुस्लिमांना अल्पसंख्याक दर्जा आणि आरक्षण असे दोन्ही हवे. राज्य घटनेनुसार अशी दुहेरी सवलत मिळू शकत नाही. आरक्षित जातींना अल्पसंख्याक दर्जा मिळाला काय? मुस्लिमांचे अवाजवी लाड केल्यामुळेच आज आझम खान किंवा ओवेसीसारख्या नेत्यांचे फावले आहे. आज सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे बंद करण्याची गरज आहे. शिक्षण, रोजगार आणि प्रगतीत त्यांची भागीदारी व्हावी इतपत त्यांना सक्षम ठीक आहे. त्याकरिता राजकीय पक्षांबरोबरच मुस्लिमांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

मंदार कात्रे's picture

8 Apr 2014 - 2:33 pm | मंदार कात्रे

10 करोड नोकर्‍यांचे खोटे आमिष दाखवणारा पप्पू चा बोगस जाहीरनामा आणि जनतेला उल्लू बनवणार्‍या खोट्या टीव्ही जाहिराती करणार्‍या कोंग्रेस चा भुक्कड प्रचार पाहून आठवले....

2010 मध्ये युपीए सरकारचे 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चिदम्बरम ची मुलाखत सुरू होती, निवेदकाने प्रश्न विचारला की "आपने 2009 के चुनाव मे सबको सस्ते घर देने का और पेट्रोल की कीमत स्थिर रखने का वादा किया था . लेकीन वैसा हुआ नही. क्यो?"

यावर चिदम्बरम काय म्हणाला माहीत आहे?

" चुनावी वादे तो चुनावी वादे होते है . जनता तो भूल भी गयी, आप क्यो याद रखते है?"

जनतेला उल्लू बनवणार्‍यानो
अब् जनता माफ नही करेगी

अबकी बार -मोदी सरकार

आबा's picture

8 Apr 2014 - 11:46 pm | आबा

निराशाजनक आहे,
अर्थात दुसरी अपेक्षाच नव्हती म्हणा !

कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार
केवळ अशक्य !हिंदुंच्या रामाची टिंगल उडवायचे हे दिवस तिथे मंदिराचे काय घेउन बसलात ? बरं अशी टिंगल करण्यात दीड-शहाणे हिंदुच पुढे.ज्यांना स्वतःच्या दैवतांची फिकीर नाही त्यांचे भविष्य काय ते असणार ? तेव्हा हा मुद्दा गुंडाळला गेलाच समजा.

राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल.
हे कशाला ? दाढ्या कुरवाळण्याची खाज आता भाजपाला सुद्धा आली काय ? तो झाकिरडा तोंडाला येइल ते बरळतं असतो,असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी जे विष ओकत आहेत्,हिंदुंच्या रामाची जाहिर टिंगल करत आहेत तेव्हा यांच्या सारख्या अनेक सापड्यांना तुम्हाला पोसायचे आणि मोठे करायचे आहे का ? पण काय करणार आमचे हिंदुच जर त्यांच्या रामाची टंगल करतात, तिथे असले नाग फुक्त्कार टाकतात त्यात नवल ते काय ? उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?

असो...

भाजपा एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन मला गेल्या १० वर्षात कधीच वाटला नाही, तसेच त्यांचे अस्तित्व आहे की नाही हीच मुळी शंका यावी अशी यांची विरोधी पक्ष म्हणुन कामगिरी वाटली.बरं एकट्या मोदींच्या जिवावर भाजपा आत्ता उड्या मारतो आहे यातच पक्षाची अवस्था लक्षात यावी ! बरं बिचारे मोदीच एकटेच खिंड लढवत आहेत असेच सध्या चित्र डोळ्यांना दिसत आहे, भाजपाच्या इतर नेत्यांच्या प्रचार सभा डोळ्यात भराव्या अश्या होतात ?
आडवाणींचा उल्लेख तर प्रामुख्याने करायलाच हवा ! एके काळी भाजपाचे लोह-पुरुष म्हणवणारे त्यांच्या राजकिय महत्वकांक्षेने इतके अंधळे झाले की त्यांचे एकच काम सुरु झाले ते म्हणजे सातत्याने पक्षाचा तेजोभंग करणे आणि मनोधैर्यावर आघात करत बसणे.यांच्याच पंगतीला आता जसवंत सिंग गेले आहेत. म्हणायचं नाही पण ह्यांची आर्धी लाकडं मसणात गेली तरी सत्तेचा मोह टाळता येत नाही.

अवांतर :- तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची कार्यक्षमता वाढवुन पगार दिला जातो,किंवा पगार वाढ दिली जाते असे म्हंटले जाते. पण आपल्या देशातील राजकारणी नक्की कशाचा पगार घेतात हेच मला कळत नाही ! आम्ही अमुक केल आणि तमुक केल किंवा करुन दाखवले असे सांगत फिरतात पण ही काम करण्यासाठी तुम्हाला जनता निवडुन देते ना ? मग कुठल्याही कामाचे श्रेय घेण्याचा मुद्दाच कुठे येतो ? ज्या दिवशी या देशात सत्तेवर असलेल्या पक्षास त्यांच्या कार्याची- विकासाची संपूर्ण माहिती उघड करण्याचे बंधन येइल त्यावेळीच एक प्रगत राष्ट्र म्हणुन आपली वाटचाल सुरु होइल.

धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?

उलट आहे.
हिंदु हे मुळातच सहिष्णु होते. इतकी वर्षे इतक्या धर्मियांची आक्रमणे झाली पण हिंदुंच्या कट्टर नसण्याने व लवचिकतेमुळे धर्म सोडावा लागला नाही. उलट आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अरब आखात आदी खंडात विविध मार्गांनी तेथील स्थानिकांना आपापले धर्म सोडावे लागले. पैगंबरानंतर अवघ्या काही वर्षात सिंधुपर्यंत इस्लाम पसरवता आला मात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती.

कुरूंदकर म्हणतात तसे, भारत हा एखाद्या दलदलीसारखा आहे, त्यात दगड टाकून त्यात तत्कालिक दुभाजन होतेही पण पुन्हा त्या दगडाला सामावून घेऊन एकसंधता येते. त्यामुळे फायदा असा की बाहेरच्या शक्ती इथे सहज बदल घडवू शकत नाहीत, याचा तोटा असा की आपला आपल्यालाही आवश्यक असा बदल घडवणे खूप कठीण होऊन बसते.

तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!

कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे.
थोड्या फार प्रमाणत सहमत.

मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!
हे कसे ? कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला.

कट्टर हिंदु होणे म्हणजे काय?
मुळात हिंदु हा एक पुस्तक, एक देव, एक सेट ऑफ आज्ञा वगैरे न मानणारा धर्म आहे. निरीश्वरवाद हा सुद्धा हिंदु धर्मातील अधिकृत व धर्ममान्य 'वाद' वा जीवनपद्धती आहे. अशावेळी हे हे केले म्हणजेच कट्टर हिंदु अशी सर्वसमावेशक व्याख्या करता येणे कठीण आहे.

उलट आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो आहे त्याने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे हिंदु पद्धतीने जीवन आचरणार्‍यांचे सार सांङता येतील. अर्थात एका जीवनपद्धतीशी - नियमावलीशी बांधिलकी नाही. --> अर्थातच 'कट्टर हिंदु' ही संज्ञा शक्य नाही.

इस्लाम वा ख्रिश्चन सारखा ठाम व अपरिवर्तनीय नियम असणार्‍या धर्माने प्रभावित होऊन त्यांच्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे कट्टरता ही व्याख्या चुकीची वाटत नाही का?

कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मला

मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ.

जोवर हिंदु धर्म सहिष्णुता दाखवेत तितका तो तोडणे कठीण आहे कारण तो हवा तसा-तेव्हा बदलता येतो. उलट जेव्हा जेव्हा तो कट्टर झाला, उदा, जातीव्यवस्था कट्टरतेने पाळून समाजात विषमता वाढली किंवा सतीसारख्या प्रथा आल्या किंवा विधवा पुनर्विवाहाला काही जातीत बंदी होती, तेव्हा तेव्हा धर्मांतर झालेले दिसते

रेव्हरंड टिळकांसारख्या व्यक्ती मला गोर गरिबांची सेवा करण्यात धर्म (पक्षी स्पृश्यास्पृश्यता) आड येत असेल तर मी तो बदलेन असे म्हणत धर्म बदलतात तेव्हा कट्टरतेचा अभाव नव्हे तर धार्मिक कट्टरता त्यांना धर्मबदल करायला भाग पाडते. सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2014 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा

@सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली? >>> त्याचं काय आहे म्हयत्यै का??? आधी तुकडे-पाडून जगणं ही आमची अवड! त्यात बाहेर गेलेले-आत आणून वाढवा कशाला????? अहो...भाकरी वाढवण्यापेक्षा-खाणारे-कमी झाले..तर बरं वाटतं आंम्हाला! ;)

मदनबाण's picture

9 Apr 2014 - 4:23 pm | मदनबाण

मुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ.

"With more than 71 million claiming Christianity, India is now the eighth largest Christian nation in the world," said Dick McClain, president and CEO of The Mission Society, publisher of Unfinished. "

ऋषिकेश's picture

9 Apr 2014 - 4:35 pm | ऋषिकेश

वाटलेच होते, म्हणूनच टक्केवारी हा शब्द वापरला होता.
ही नॅचरल ग्रोथ झाली, याने धर्मांतर झाले हे कसे समजावे?

आता वेगळे आकडे पाहु

भारतीय जनगणनेनुसार, १९९७१ ते २००१चे आकडे पाहुया:
हिंदु:
82.73%, 82.30%, 81.53%, 80.46%
मुस्लिम:
11.21% 11.75% 12.61% 13.43%
ख्रिश्चनः
2.44% 2.60% 2.44% 2.32% 2.34%

अर्थात ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत कोणताही मोठा शिफ्ट दिसत नाही. उलट मुस्लिमांच्या प्रमाणात हळु परंतू सतत वाढ दिसते, मात्र त्याची संभाव्य कारणे हा वेगळा चर्चेचा विषय आहे. धर्मांतर हा भागही त्यात आहे, मात्र हिंदूंने आता चवताळून उठावे असा कोणता ट्रेंड दिसतो

आणि मुळ विषय बाजुलाच राहिला, मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय?

सध्या तरी हाताशी वेळ नसल्याने नक्की टक्केवारी {धर्मांतर झालेल्यांची} देता येत नाही. यातही धर्मांतरीत झालेल्या लोकांची नोंदणी कितपत होते या बद्धलच साशंकता आहे. असो...
मुळात हिंदू आणि कट्टरता हे शब्द एकत्र नांद(व)णे अयोग्य आहे हे तुम्हाला पटले आहे काय?
हिंदुंनी कट्टर असायलाच हवे असा माझा विचार आहे, आणि तो बदलेल असे वाटत नाही. जर तुम्हाला तुमच्या स्त्रीयांचे आणि स्वतःचे रक्षण करण्यास तुमच्या धर्मामुळे असाहयाता वाटत असेल तर तो धर्म काय कामाचा ? त्यामुळे जर तुम्ही हिंदु असाल तर कट्टरता ही असायलाच हवी ! इथे धार्मीक कर्मकांड अभिप्रेत नसुन आत्मरक्षणा पुरता तरी कट्टरतावाद असावा ही भावना आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Apr 2014 - 10:25 am | llपुण्याचे पेशवेll

बाणाशी सहमत आहे. उलट "तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!" हे विधान कैच्याकै हास्यास्पद आहे. हिंदू सहिष्णू वगैरे काही नाही. पळपुटा आणि बोटचेपेपणाच आहे. आणि जो काही हिंदू आता हिंदू म्हणून शिल्लक आहे तो सहिष्णूता वगैरेमुळे असे मला मुळीच वाटत नाही. मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना इथे येऊन इथल्या संख्याबळावर मात करणे शक्य नव्हते. जरी इथून एकजूट होऊन विरोध होऊ शकत नसला तरी स्वतंत्रपणे संख्याबळावर विरोध करू शकणारे राजे इथे अस्तित्वात होते. जसे औरंगजेबाचे बाहूबळ मोठ्याप्रमाणात रजपूतांवर अवलंबून होते. त्यामुळे कट्टरपण स्वीकारणे म्हणजे मुसलमान किंवा ख्रिश्चन होणे हे विधान अत्यंत बालिश वाटते.

आत्मशून्य's picture

10 Apr 2014 - 5:49 am | आत्मशून्य

ात्र भारतात येऊन कित्येक शतके
उलटली तरी इस्लाम पसरणे
सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण
हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच
सामावून घेण्याची अमोघ शक्ती.

बघ ना पाकी अन बांग्ला तर ज्यू लोकांचे प्रदेश आहेत. आणि आम्ही महाराजांचे कौतुक साजरे करतो... सूंता होता होता वाचली म्हणून

संजय क्षीरसागर's picture

9 Apr 2014 - 2:47 pm | संजय क्षीरसागर

उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?

आणि अजून शाबूत आहे!

मदनबाण's picture

9 Apr 2014 - 4:08 pm | मदनबाण

बाप्रे! काय हा प्रतिसाद!
ह्यात भयानक ते काय ? हिंदु स्त्रींयांची अवहेलना झाली नाही,त्यांच्यावर अत्याचार झाले नाही की त्यांच्यांवर यवनांनी बलात्कार केले नाहीत ? यवनांचे जनानखाने हिंदु स्त्रीयांनी भरलेले नव्हते का ? हैद्राबाद मधे रझाकारांनी हिंदु स्त्रीयांची आब्रु लुटली नाही काय ?तीच परिस्थीती भविष्यात होउ नये हीच भिती प्रतिसादात व्यक्त केली तर काय चुकले ?
असुद्दिन आणि अकबरुद्दिन ओवेसी हे दोघे ज्या प्रमाणे माथेफिरु भाषणे देत सुटले आहेत त्यांना कोण नीट ऐकत आहे का ? ते नीट ऐका बरं जरा... तू-नळीवर बरेच व्हिडीयो सापडतील.
बरं... तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद लतिफाबाद (पाकिस्तान) मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही, परंतु पाकिस्तानच्या http://tribune.com.pk/ या वर्तमान संकेस्थळावर ही बातमी इथे :- Hindu temple in Hyderabad broken into, set on fire वाचता आली.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2014 - 4:30 pm | अत्रुप्त आत्मा

@ तुम्हाला ठावुक आहे का की हैद्राबाद मधले हनुमानाचे देउळ तोडले गेले ? ही बातमी मला आपल्या देशातल्या {हो हिंदुस्थानात} कुठल्याही वर्तमान पत्रात दिसली नाही,तसेच कुठल्याही वाहिनीवर याचे वार्तांकन झालेले आढळले नाही>>> याबाबतीत सहमत आहे. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे बदमाश,अश्या गोष्टी कळल्यानंतर सुद्धा..पुन्हा त्या खोट्याच कश्या असतील..असे तर्कही लढवताना पाहिलं/ऐकलं आहे. त्यांना त्यांच्या घरांवर हात पडत नाही,तोपर्यंत काहिही खरं वाटत नाही. :)

आपण त्यांचे दाखले द्यायचे आणि त्यांनी आपली उदाहरणं द्यायची, परिणामी धर्माधिष्ठीत राजकारण चालू राहातं. पहिल्यांदा ते का पहिल्यांदा आपण हा वादच नको. Common Civil Code येईपर्यंत तरी धर्म घरात ठेवणं अगत्याचं आहे. अशा प्रकारे प्रचार करणारे भाजप (राममंदिर) आणि काँग्रेस (इमामांची भेट) दोघांनाही फाटा दाखवा. त्याच प्रमाणे संविधानाची ढाल करुन आरक्षणाच्या मुद्यामागे लपणार्‍यांना सत्तेतून दूर करुन खुल्या दिलानं आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा.

मदनबाण's picture

9 Apr 2014 - 8:14 pm | मदनबाण

धर्मांधता सोडणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे
अगदी सहमत ! मग कुठल्याच पक्षांनी धर्म,जात इं चा वापर करु नये, देशाच्या आणि जनतेच्या विकासाचे काय ते बोला म्हणावे. मदरसे, देउळ आणि पुतळे उभारण्या पेक्षा देशाला उभारण्यात वेळ घालवा. भाजपाचे मदरशाचे उध्योग वाचले आणि तसा प्रतिसाद दिला.
आर्थिक दुर्लबलतेला संधीचा लाभ मिळावा अशी कामना ठेवा.
१००% सहमत !
खरं सांगु का ? सामान्य माणसाला रोज चे जीवन जगताना आणि दोन घास गिळताना मंदिर-मस्जिद काही आठवत नाही,त्याच सामान्य आयुष्य अधिक सुखकर व्हाव हीच माफक अपेक्षा तो बाळगुन असतो...पण पदरात काय पडत ?
असो... तुमच्याशी या बाबतीत सहमत होताना आनंद झाला.

क्या बात है! धन्यवाद.

आयुर्हित's picture

9 Apr 2014 - 9:16 pm | आयुर्हित

मलाही आपले एकमत झालेले पाहून आनंद झाला.

आता वेळ आली आहे कि धर्म, प्रांत, जात-पात असे मतभेद विसरून देशाच्या विकासासाठी एकजूट होऊ या व एक चांगला सक्षम पक्ष व दूरदृष्टी असलेला पक्षनेता पंतप्रधानपदी निवडून आणू.

जय हिंद! जय भारत!!

कुठल्याच पक्षाला रस नसल्याचे बघून खेद वाटला. तसेच सर्व जनतेला अजुन नळाचे पाणिही पुरवण्यास सर्व राजकीय पक्ष विसरलेले दिसत आहेत.

"सार्वजनिक स्वच्छतागृह सुधारणा" हा खूप चांगला मुद्दा आहे आपला. त्यासाठी शहरात नगरपालिकेत नगरसेवकांच्या किंवा खेड्यात ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देतांना याचा विचार जरूर व्हावा. सध्या खासदारांच्या निवडणुकीत हा मुद्दा तितकासा महत्वाचा नाही.
निवडणुकीत काय महत्त्वाचे

हवालदार's picture

9 Apr 2014 - 8:41 pm | हवालदार

कारण समस्या भारतात सर्वत्र आहे. विशेषतः प्रष्ण पाण्याच्या कमतरतेशीही निगडीत आहे. आणि प्रत्येक खासदाराकडे खासदार नीधी उपलब्ध आहेच की. विशेषतः स्त्रियान्ची होणारी कुचम्बणा लक्शात घेता हा मुद्दा बाकीच्या मुद्यान्च्या बरोबरीने महत्वाचा आहे पण कदचीत आपल्या सर्वाना इतकी सवय झाली आहे की हा मुद्दा लक्शातच येत नाही. हेच नळाच्या पाण्याचेहि म्हणता येईल.

मुल्य शिक्षण आणि शिक्षण पध्द्तीत बदल वगैरे मुद्दे तर पुढ्ची गोश्ट झाली.

आयुर्हित's picture

9 Apr 2014 - 9:23 pm | आयुर्हित

"जल स्वतंत्रता, सिंचनासाठी लागणारे आधुनिक मार्ग व प्रसंगी जरूर असल्यास नदीजोड प्रकल्प" हा महत्वाचा मुद्दा या जाहीरनाम्याचा एक महत्वाचा भाग आहे, जो आपल्या वाचण्यात आलेला दिसत नाही.

आज मोदींनी बडोद्यात निवडणूक अर्ज दाखल करतांनाही "महाराजा सयाजीराव गायकवाडांचा" याबाबतचा आदर्श सर्वांसमोर आणला आहे. जमले तर त्यांचे आजचे भाषण ऐकावे.

हवालदार's picture

9 Apr 2014 - 9:34 pm | हवालदार

जरूर ऐकू. धन्यावाद

हे वचननामे / जाहीरनामे वगैरे कायद्याच्या दृष्टीने "एन्फोर्सेबल" असतात का? उद्या यातली काही "वचनं" पाळता आली नाहीत, तर कोण जबाबदार असतं? म्यूचुअल फंडांना असतो तसा काही डिस्क्लेमर असतो का?

सुहासदवन's picture

9 Apr 2014 - 6:33 pm | सुहासदवन

काहीच काय कोणतीही "वचनं" पाळता आली नाहीत, तरी कोणी जबाबदार नसतं.

अजुन तरी आपल्याकडे accountibility and responsibility ह्या टर्म्स नेते मंडळी सोडून बाकी सर्वांना लागू आहेत.

आणि तसंही इथे प्रत्येकाला लहानपासून केवळ आपल्या मुलभूत हक्कांचीच जाणीव करुन दिली जाते. मग त्या स्त्रिया असोत, तरुण असोत किंवा वृद्ध असोत.

कर्तव्यांचं काय? हक्क काय फुकटही मिळतात आणि कर्तव्य पार पाडायची तर त्यांना कष्ट पडतात.
आपल्याकडे जसा मानवी हक्क आयोग आहे ना, तसा मानवी कर्तव्य आयोग असणं देखील गरजेचं आहे.

नेत्यांनी काहीही केले तरी आणि काहीही केले नाही तरी त्यांना फक्त निवडणुकीतच धडा शिकवता येतो(?)

आपल्या लोकांची/ पगारदारांची जशी वार्षिक appraisal process होते ना तशी ह्या नेत्यांची निदान पाच वर्षांनी एकदा तरी appraisal process करायला हवी. मग कळेल त्यांना.

नितिन थत्ते's picture

9 Apr 2014 - 7:13 pm | नितिन थत्ते

>>शी ह्या नेत्यांची निदान पाच वर्षांनी एकदा तरी appraisal process करायला हवी.

मग सध्या काय चालू आहे?

काय निकष असतात -
१. निवडणूक लढविण्यासाठी
केवळ भारताचा नागरिक असणं पुरेसं असतं का?
काय background check होते उमेदवारांची?
ह्या पायरीवर काही विदा मिळतो का ह्या check मध्ये किती पास झाले किंवा किती आणि का नापास झाले ते.
२. वारंवार निवडणूक लढविण्यासाठी तरी -
आतापर्यंत काय भरीव कार्य केले ह्याचे evaluation करता येते का? किंवा तशी काही यंत्रणा आहे काय? किंवा
अशी यंत्रणा असल्यास तिचा योग्य वापर होतो का?
ह्या वर्षीचा निवडणुकीसाठी फॉर्म भरताना उमेचदवाराच्या पक्षाचा गेल्या वेळचा manefesto किंवा संलग्न
खात्याचा अहवाल मागविला जातो काय? असं काही होत असेल तर काही विदा आहे काय कि ह्या पायरीवर किती
उमेदवार अपात्र ठरतात ते.
३. निवडणुक आयोग किंवा भारतीय सरकार, आत्तापर्यंतच्या निवडून आलेल्या नेत्यांच्या कामकाजाचा काही अहवाल किंवा
विदा बनविते काय? आणि जर बनवित असेल तर निवडक विदा जनतेपुढे ठेवते काय?
४. असा एखादा पक्ष जर वर्षानुवर्षे निवडणुकीआधी मांडलेला manefasto जर एका कमीतकमी टक्केवारी पर्यंत पाळत
नसेल तर त्याचं काय होतं.

इत्यादी इत्यादी .... बाकी नंतर....

या सर्व गोष्टी आपण जनता सहन करत आलो आहे.त्याचाच फायदा सर्व राजकीय पक्ष आजवर घेत आले आहेत.म्हुणुन तर हवालदारजींनी सांगितल्याप्रमाणे वीज, रस्ते व पाणी हे मुलभूत प्रश्न आजही तसेच असह्य आहेत.

जमल्यास सर्व मिपाकरांनी पुढाकार घेऊन एक दबावगट निर्माण करावा!

संजय क्षीरसागर's picture

10 Apr 2014 - 9:40 am | संजय क्षीरसागर

धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय ते आता उघड आहे. अशांना सत्तेत येऊ दिलं नाही की झालं!

धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय?
याचे उत्तर आहे :कॉंग्रेसच!

कॉंग्रेसच आजपर्यंत स्वत:ला "धर्मनिरपेक्ष" म्हणवते आणि बरोबर मतदानाच्या आधी जामा मस्जिदच्या शाही इमामांना भेटते व सर्व मुसलमानांना भावनिक आवाहन करते कि कॉंग्रेसला मतदान करा.

पण ह्या वेळेला सर्व मुसलमान बंधूंना कळून चुकले आहे कि कॉंग्रेस मुसलमानांचा कसा (गैर)वापर करून घेते ते!
हे वाचा: Voting for Congress is betrayal of Islam, says Shia cleric Maulana Kalbe Jawwad

आज आपल्या बाजूने कोणता पक्ष आहे हे ही सर्वांना कळून चुकले आहे.
हे ही वाचा: जाफर आता मोदींचा खंदा समर्थक
BLOG : नरेंद्र मोदींवरील आरोप आणि त्याचे खंडन

कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Apr 2014 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll

हो का! मग सभेच्या वेळेला बांग लागल्यावर भाषण बंद करणारे कोणती अधार्मिकता पसरवत होते? खरेतर २न्ही कडे लाऊडस्पीकर होते ना मग ज्याने त्याने आपले काम चालू ठेवणे म्हणजे भाषण करणार्‍याने भाषण करणे आणि बांग देणार्‍याने बांग देणे चालू ठेवायला पाहीजे होते. परंतु तसे होताना दिसले नाही. बाकी आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे.

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2014 - 11:01 am | संजय क्षीरसागर

राममंदिराची उभारणी कुठे आणि बांग सुरु असतांना काही मिनीटं थांबणं कुठे... पण बुद्धीची झेपच इतकी मोठीये की तिथे सगळं सारखंच!

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Apr 2014 - 2:16 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह! तुम्हाला स्वतःच्या अगाध झेपेबद्द्ल (बुद्धीमांद्याबद्द्ल) इतकी खात्री आहे पाहून... खरंतर काहीच नाही वाटलं. :)

असंका's picture

15 Apr 2014 - 6:06 pm | असंका

With All Due Respect...

रोजच्या आयुष्यात संघर्ष टाळून आपण आपला विकास करून घ्यावा हे मला पटतं. पण संघर्ष टाळण्याची किंमत द्यावी लागते, आणि आपण सांगितलेली किंमत भलतीच जास्त आहे.

आणि पाकिस्तान आपल्याशी काश्मिर साठी लढतंय असं आपल्याला मनापासून वाटतं का? अहो काश्मिर नसते तर ते पंजाबसाठी लढले असते. ही डोकेदुखी काय पड खाऊन संपणारी आहे का?

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2014 - 8:37 pm | श्रीगुरुजी

>>> कायद्याच्या चौकटीत राहून (हे आपलं म्हणायला) राममंदिर उभारणी (एकदा का झाली) की ती भारताची कायमची डोकेदुखी होऊन बसेल. काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल.

राममंदीराची समस्या इतकी दशके चिघळत ठेवल्यामुळेच ती डोकेदुखी होऊन बसली आहे. जोपर्यंत तो विषय कायदेशीरदृष्ट्या सुटत नाही तोपर्यंत तो आपल्याला त्रास देणार. जर कायदेशीररित्या तो प्रश्न सुटला तर एक डोकेदुखी कायमची जाईल. कोणताही प्रश्न चिघळत ठेवल्याने डोकेदुखी होते. एकदा त्या प्रश्नाचा कायदेशीर निकाल लागला की तो प्रश्न सुटतो. १९७८ पासून १९९४ पर्यंत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न डोकेदुखी होऊन बसला होता. १९९४ मध्ये तो एकदाचा अधिकृतरित्या समाप्त झाला व नंतर लगेचच तो प्रश्न जनता विसरली. नामांतरानंतर सुरवातीला काही काळ काही घटकांमध्ये कदाचित नाराजी असेल, परंतु आता त्याचे नामोनिशाणदेखील नाही. राम मंदीराचा प्रश्न सुटला की असेच होईल व उलट हिंदू-मुस्लिमांमधील या प्रश्नावरून निर्माण झालेली तेढ नष्ट होईल.

>>> काश्मीर मुळे भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होणं अशक्य झालंय आणि या राममंदिरामुळे भारतात हिंदू-मुस्लीम तेढ कायमची निर्माण होईल.

काश्मिर हे केवळ एक निमित्त आहे. काश्मिर नसेल तर पाकिस्तान भारताशी शत्रुत्व सुरू ठेवायला कोणता तरी दुसरा मुद्दा वापरेल. ब्रह्मदेव आला तरी भारत-पाकिस्तानचे संबंध सुरळीत होणे शक्य नाही.

संजय क्षीरसागर's picture

10 Apr 2014 - 10:58 pm | संजय क्षीरसागर

हे माहिती असेल तर सांगा; मग पुढे ती (सध्या) नक्की कुणासाठी डोकेदुखी आहे ते पाहता येईल.

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2014 - 12:16 am | संजय क्षीरसागर

केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).

हे मी मागेच सांगितलं होतं. आता `कायद्याच्या चौकटीत राममंदिर उभारणी' हे डायरेक्ट मॅनिफेस्टोतच आल्यानं ते पूर्णपणे उघड झालंय.

राममंदिर बांधून देशाच्या परिस्थितीत नक्की काय फरक पडणार आहे ते देखिल कळवा म्हणजे सर्वांना बिजेपीचा `खरा अजेंडा' कळेल.

आयुर्हित's picture

11 Apr 2014 - 1:57 am | आयुर्हित

हा घ्या बिजेपीचा `खरा अजेंडा'
बिजेपीचा `खरा अजेंडा'

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2014 - 9:48 am | संजय क्षीरसागर

मूळ मुद्दा तोच आहे.

On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad.[22]

On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal. Other prominent political leaders indicted by the commission include late Shiv Sena chief Bal Thackeray, and former RSS leader K Govindacharya. Relying on the testimonies of several eye-witnesses, the report stated that many of these leaders had made provocative speeches at the rally that provoked the demolition. It also stated that they could have stopped the demolition, if they had so wished

यावर `कायद्याची चौकट' अलाहाबाद हायकोर्टानं आधीच ठरवली आहे आणि सुप्रीम कोर्टानं स्टेटस को दिलायं त्यामुळे सध्या परिस्थिती बरी आहे. आता पुन्हा हे लफडं सुरु करणं देशाला कमालीचं महाग पडेल. आणि राममंदिर बांधून देशाचं काय भलं होणाराये त्याचा ही विचार करा.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Apr 2014 - 10:29 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मंदिराच्या राजकारणातून भाजपा नेत्यांनी बाहेर यावे.कदाचित त्यांच्यावर दबाव संघ मंडळींकडूनच येत असावा.
(मोदी पंतप्रधान व्हावेत अशी ईच्छा असलेली)माई

मोदी संघाच्या हातातलं बाहुलं आहेत. संघानं अडवानींना संधी देऊन पाहिली पण आता त्यांच्याच्यानं ते होणार नाही म्हटल्यावर हा नवा गडी आणलायं.

आयुर्हित's picture

11 Apr 2014 - 12:43 pm | आयुर्हित

मंदिराचा प्रश्न मॅनिफेस्टोतून काढला की बिजेपीकडे राहतंय काय !
एवढा वरचा मूळ लेख, pictorial presentation वाचलच नाही असेच दिसते.

काय म्हणायचे याला?
पालथ्या घड्यावर पाणी.......................!!!!

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2014 - 12:56 pm | संजय क्षीरसागर

तरी म्हटलं तुम्ही ते ग्राफिकल प्रेझंटेशन (तुमच्या विचाराविरुद्ध असतांना) टाकलं कसं!

दादाश्री, आतापर्यंत असले छपन्न मॅनिफेस्टो पब्लिकवर फेकून बिजेपी आणि काँग्रेस सत्तेवर आलेत. निवडून आल्यावर काहीही होत नाही इतपत समज एव्हाना यायला हवी. खरा मुद्दा कुणाचा मॅनिफेस्टो किती सुरेख धूळफेक करतो हा नाही, धार्मिक मुद्दा कोण कसा रेटतो हा आहे. भाजपनं तो निर्लज्जपणा घोषणापत्रात खुलेआम केलायं आणि सोनियाजींनी इमामांचं समर्थन मिळवून केलायं इतकाच काय तो फरक!

कोण किती सुरेख धूळफेक करतो, हे कळले आहे सर्वांना, म्हणून गालात पडत असते दर दोन दिवसांनी.
आपणही राजघाटावर जाऊन,आपण चुकलो कुठे ह्याचे जरा चिंतन करावे हेच बरे होईल.
एवढेच म्हणतो.

जाहीरनाम्यातील एक ओळीचा राम मंदिराचा मुद्दा हाच खरा कळीचा मुद्दा आहे याची जाणीव विरोधकांना आहे आणि भाजपलादेखील. तुम्हाला ती जाणीव नाही हा तुमचा भोळेपणा आहे. त्या एका ओळीत भाजपने सांगितले आहे कि आम्ही तेच आहोत जे २० वर्षांपूर्वी होतो.

विकास's picture

11 Apr 2014 - 4:53 pm | विकास

राम जन्मभूमी, समान नागरी कायदा आणि ३७० कलम हे मुद्दे भाजपाच्या १३ दिवस, १३ महीने आणि ४.५ वर्षांच्या राजवटीच्या काळात देखील जाहीरनाम्यात होते. त्यात नवीन काहीच नाही.

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2014 - 8:06 pm | संजय क्षीरसागर

करेक्ट, भाजपची तीच धूळफेक चाललीये, जुने गडी थकल्यामुळे या वेळी फक्त नवा गडी घेतलायं!

धूळफेक का काय माहीत नाही... कारण अजून भाजपाचे म्हणून सरकार आलेले नाही. जे आले ते रालोआ चे आले होते. आत्ता देखील रालोआचेच आले तर येईल. भाजपाला २७२+ मिळतील असे कुणाला वाटत तरी नाही. त्यामुळे अशा सरकार मधे कॉमन मिनिमम प्रोग्रॅम राबवला जातो. तोच राबवला जाईल. चंद्राबाबूंनी तात्काळ रामजन्मभूमीवरून नाराजी व्यक्त केली आहेच... त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही.

तरी देखील धूळफेक असेल तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा की! का एकीकडे टिका पण करायची आणि दुसरीकडे मंदीर वही बनाएंगे म्हणायचे असा बेत आहे?

राममंदिरासारख्या छपरी मुद्यात मला काहीएक रस नाही कारण त्यानं देशाचं काडीमात्र भलं होणार नाही त्यामुळे तुमच्या प्रतिसादातला शेवटचा भाग व्यर्थ आहे.

तत्पूर्वी तुम्ही म्हटलंय :

त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही.

तेच तर माझ्या प्रत्येक पोस्ट आणि प्रतिसादातनं गेले कित्येक दिवस सांगतोयं! राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये.

विकास's picture

12 Apr 2014 - 1:59 pm | विकास

राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये.

परत तेच... जे कायम जाहीर केले आहे ते सुप्त कसे काय?

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2014 - 2:29 pm | संजय क्षीरसागर

राममंदिर हा जर मॅनिफेस्टोचा जाहीर भाग आहे तर इतके दिवस मी एकच गोष्ट सांगतोयं ती आपसूक सिद्ध झाली!

केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).

विकास's picture

12 Apr 2014 - 8:00 pm | विकास

सर्वप्रथम मॅनिफेस्टो नावाचे एक डॉक्यूमेंट असते हे तुम्हाला आता एकदाचे मान्य झाल्याचे पाहून आनंद झाला. :)

केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).

केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे. भारतीय सामान्य जनता ही भारतातील तथाकथीत बुद्धीवाद्यांसारखी नसल्याने ती फार त्यांच्या मागे जाईल असे वाटत नाही. तसे देखील म्हणूनच आता केजरीवालांनी दिल्लीत (पडलो तरी नाक वर स्टाईलमधे, पण) मुख्यमंत्रीपद सोडून चूक केली असे मान्य केले आहे.

मोदींचा हेतू अंतस्थ नाही कारण जे कायमच जाहीर केलेले आहे ते अंतस्थ कसे? बरं हिंदूत्व आणि विकास एकत्र नसते असे कोणी सांगितले? हिंदूत्वचा अर्थ देखील माहीत आहे का?

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2014 - 8:51 pm | संजय क्षीरसागर

राममंदिर बांधणे हा उघड हेतू आहे हे तुम्हाला मान्य आहे त्यामुळे तो विषय संपला.

तुमचे सगळे दिग्गज पाडापाडी आणि बांधकाम यात गुंतलेले आहेत हे Liberhan Commission रिपोर्टमधे उघड झालंय

On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal.

त्या प्रकरणात ओलरेडी २,००० लोक मृत्यूमुखी पडलेत. आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आणि सुप्रिम कोर्टाचा स्टेटस क्वो यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे. हे धर्मांध हिंदुत्ववादी मॅनिफेस्टोमधे पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करतायंत आणि आपल्यासारखे विद्वान त्यांची भलामण करतायंत.

किमान बुद्धी असलेली कोणतीही व्यक्ती, राममंदिर बांधून देशाचं काहीही भलं होणार नाही हे समजू शकते.

बाकी केजरीवालांवरचे तुमचे आरोप निव्वळ काल्पनिक आहेत.

अर्धवटराव's picture

12 Apr 2014 - 9:04 pm | अर्धवटराव

केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे.

आय डाऊट. केजरीवाल बहुतेक एक नवीनच बेसलेस संप्रदाय तयार करण्याच्या उद्योगात आहेत. तुम्ही म्हणताय तसा तो जास्त डावीकडे झुकला तर त्यांचा अंतस्थ हेतु कागदावर उतरण्यापुर्वी कोलमडुन पडेल.

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2014 - 10:24 pm | संजय क्षीरसागर

.

येडी तू पिंक!

अर्धवटराव's picture

13 Apr 2014 - 3:21 am | अर्धवटराव

मुद्दा मांडता येत नसेल तर वैयक्तीक प्रतिसाद द्यायचं हि तुमची नेहमीची सवय. आलात आपल्या मुळपदावर. चालायचच.

आयुर्हित's picture

13 Apr 2014 - 12:28 am | आयुर्हित

संजय क्षीरसागरजी, राममंदिराच्या मुद्द्यावर अद्वातद्वा बोलायची गरज नाही.
आपण अधिक न बोलाल तर बरे होईल! इंगजी कळत असेल तर Mind your language.

आणि हो, देशाचं भलं कसे होईल यासाठी आमचे सुज्ञ राजकीय नेते नक्कीच काम करत आहेत, यापुढेही करत राहणारही आहेत, मध्यातून पळून न जाता!

संपत's picture

12 Apr 2014 - 12:37 pm | संपत

त्यात नवीन काहीच नाही.

मीही तेच म्हणतोय. त्या एका ओळीत भाजप आपल्या पारंपारिक मतदारांना ठासून सांगते आहे कि विकासांच्या गप्पांमुळे आमचा मूळ धार्मिकतेचा अजेंडा आम्ही विसरलेलो नाही. आम्ही तेच आहोत.
त्यामुळे विरोधकांचे भाजपच्या जाहीरनाम्याचे आकलन योग्यच आहे.

विकास's picture

12 Apr 2014 - 2:03 pm | विकास

निधार्मिकतेच्या गप्पा मारत काँग्रेस मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांना भेटते, केजरीवाल मधेच थांबतात, कुमार विश्वास ९/११ ने अमेरीकेची कशी जिरली हे मुसलमानांच्या सभेत बोलतो, सप बद्दल तर बोलायलाच नको. असे अजून बरेच सांगता येईल. त्यामुळे जे काही आहोते ते प्रामाणिकपणे सांगितलेले चांगले का नाटकीपणाने सेक्यूलॅरीझम म्हणणे चांगले?

अर्धवटराव's picture

12 Apr 2014 - 8:57 pm | अर्धवटराव

आपले राजकारणी सद्भावी नाहित तर शहाणे आहेत. अफाट पैसा, प्रगतीच्या अमाप संधी, 'आहे रे' आणि युवा वर्गाचं वाढत्या मागणीचं प्रेशर, पक्षांतर्गत सर्वोच्च पातळीवर आर्थीक आणि जागतीक जाणिवेचं भान, जागतीक सत्तास्पर्धेत नव्यानं वठवायच्या भुमीकेची जबरदस्ती...अशा असंख्य गोष्टी आहेत कि ज्यामुळे राममंदीर वगैरे मुद्दे कुठल्याच पक्षाचं मुख्य धोरण बनुच शकत नाहि. सत्ताकारणात प्रत्येक मुद्याचं एक लाइफ असतं. राममंदीराचा रोल इज डॉर्मंट नाऊ. तो मुद्दा परत तसाच तापायला जी भट्टी लागेल तशी भट्टी परत तयार होण्याचे चान्सेस एक दशकभर तरी नाहित. जर ति तापलीच तर भाजपा, काँग्रेस त्याचा फायदा घेतीलच, पण ते लोणि खाण्याची सर्वात केवीलवाणि धडपड आआप करेल.

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2014 - 10:29 pm | संजय क्षीरसागर

लोणी काय, भट्टी काय, विषय काय आणि प्रतिसाद काय! सगळीच केविलवाणी धडपड.

अर्धवटराव's picture

13 Apr 2014 - 3:24 am | अर्धवटराव

तुम्हाला प्रत्येक गोष्ट उमगलीच पाहिजे अशी अपेक्षा देखील नाहि.

संपत's picture

13 Apr 2014 - 1:22 am | संपत

राम मंदिर (आणि एकूणच हिंदुत्व) हा पक्षाचा मुख्य मुद्दा नसून संघाचा मुख्य मुद्दा आहे. पूर्ण बहुमत आलेच तर ह्या मुद्द्यांचे दडपण मोदींवर नक्कीच येणार. मोदींनी पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवावे ही अपेक्षा(म्हणजेच आदेश) नक्कीच असणार. म्हणजे सगळे मोदींच्या तारतम्यावर अवलंबून.
बाकी ही भट्टी प्रमाणाबाहेर पेटली तर कोण लोणी खातोय यापेक्षा देश भस्मसात होईल का ही चिंता मला जास्त आहे. यादवीमुळे उध्वस्त झालेल्या अनेक देशांची उदाहरणे उपलब्ध आहेत.

अर्धवटराव's picture

13 Apr 2014 - 3:47 am | अर्धवटराव

माझा अंदाज असा कि मोदि इतरांना सत्तेकडे घेऊन चालले आहेत, संघ नाहि. आणि जिथवर माझा संघाबद्दल अभ्यास आहे, त्यानुसार संघ कुणा पंडे वा बडव्यांची संघटना नाहि. राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत. पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं.

संजय क्षीरसागर's picture

13 Apr 2014 - 11:43 am | संजय क्षीरसागर

अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.

On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad

विटा उचलायला वाजपेयी, अडवानी, उमा भारती, मनोहर जोशी अशी दिग्गज मंडळी होती. वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता. अलाहाबाद हायकोर्टानं अत्यंत व्यापक संशोधनाअंती सर्वसमावेशक निर्णय दिलाय त्यामुळे सध्या तो विषय मागे पडलायं. आणि यांचा प्रगल्भ विचार काय तर : "राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत."

इथे अर्थकारणाचा दूरान्वये ही संबंध नाही!

आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीये, काय तर म्हणे : "पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं."

धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.

अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.

बोलणं भविष्यात अयोध्या प्रश्न काय वळण घेईल यावद्दल सुरु आहे.

वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता.

हा प्रश्न निर्माण करण्यात केंद्राचा देखील हात आहे.

आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीय

जळजळ पोचली. वेगळी अपेक्षादेखील नाहि.

धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.

पुन्हा पुन्हा वाचा. कदाचीत उमगेल देखील.

पण भाजपच्या नाड्या संघाच्याच हातात आहे. संघाच्या आदेशाच्या बाहेर जाण्याची भाजपची प्राज्ञा नाही. राम मंदिराचा प्रश्न संपला असे मला वाटत असतानाच ह्या जाहीरनाम्यात तो संघाने टाकायला लावला. दुर्दैवाने भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तर नक्कीच मोदीना त्याबाबतीत पावले उचलावीच लागतील. देशाच्या सुदैवाने अडवाणी संधीसाधू असले तरी कचखोर होते. मोदी हे चांगल्या आणि वाईट अर्थाने कणखर आहेत. आणि राम मंदिर हे प्रतिक आहे, ते शांततेने झालेच (जे अशक्य वाटते)तर नंतर काशी, मथुरा,हिंदुराष्ट्र, आसिंधुसिंधू भारतवर्ष हे सगळ येईलच.

५ % आर्थिक वाढ आणि यादवी ह्यामध्ये ५ % आर्थिक वाढ परवडेल.

करेक्ट! खरं तर हिंम्मतच नाही!

मोदींना वाटायला लागलं होतं की ते आता `विकास पुरुष' झाले (आणि पुढे `पंतप्रधान' होणार!) म्हणून राममंदिराचा मुद्दा ते शेवटपर्यंत बाजूला सारायचा प्रयत्न करत होते (कारण साला आधीचा झेंगट काय कमीये!). पण मुरली मनोहर जोशींनी त्यांना त्यांची (खरी) जागा दाखवून दिली (...अबे बागडू तेरे को बिजेपीने इसलीये प्रायमिनिस्टरियल कँडिडेट बनाया के तू राममंदिर बनायेगा और तू पल्टी मार रहा है? अडवानीको इसलीये नीचे बिठाया की अब उनकी उम्र बीत गयी. लेकीन तुम अगर लाईन बदलोगे तो पार्टी तुम्हारा बाजा बजा देगी!)

There was speculation that Modi had reservations over the document drafted by Joshi and that the pet themes of Sangh parivar may not figure in it in view of Modi's stress on development in the current campaign.

Asked about the reported differences within the party over inclusion of the Ram Temple issue, Joshi said "whatever is there is there in the manifesto. If you want to write something on the basis of your own perceptions, you are free to do".

आणि पुढे तर मुरलीभाईंनी कहर केला :

Asked if the party was trying to confuse voters by including Ram Temple and whether this could be called raking up Hindutva, Joshi said, "this has nothing to do with Hindutva or athva (otherwise). This is only a promise of development programme."

आयला, राममंदिर हा त्यांचा `डिवेलपमंट प्रोग्राम' आहे म्हणे!