आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.
ध्येय(Goals): एक भारत, श्रेष्ठ भारत, सुशासन, सर्वसमावेशक सर्वस्पर्शी व सर्वदेशी विकास
आव्हाने(Challenge): भ्रष्टाचार, महागाई, रोजगार, आर्थिक विषमता, देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास, वित्तीय नुकसान(CAD), रुपयाचे झालेले अवमूल्यन, परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था, देशातील अंतर्गत बाजारपेठेत चीन व इतर देशांनी काबीज केलेला मोठा वाटा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारतीय निर्यातीचा घटलेला वाटा.
मुख्य कार्यवाही केंद्र(Focus for Action): महिला सबलीकरण व संरक्षण, शेतकरी, कामगार, विद्ध्यार्थी, रोजगार निर्माण करणारे छोटे व्यावसायिक यांना हव्या त्या सुविधा स्वस्तात पुरविणे, लहान लहान खेड्यांपर्यंत रस्ते व मुलभूत साधनसुविधा उपलब्ध करणे, औद्योगिक उत्पादने, जल व उर्जा स्वतंत्रता, रस्ते-जहाज व नवीन गोदी बांधणी, शिक्षण, स्वास्थ्य व संशोधन यात अग्रेसर होणे, सिंचनाचे आधुनिक मार्ग अवलंबणे, नवीन मार्ग शोधणे व जरूर पडल्यास नदीजोड प्रकल्प उभरणे, पर्यटन व निर्यात यात मुलभूत सुधारणा, आर्थिक क्षेत्रासाठी व प्रामुख्याने NBFC साठी चांगले नियंत्रक उभे करणे व भारताला आर्थिक महासत्ता बनविणे.
काश्मीर व राममंदिरासारख्या मुद्द्याला भारतीय घटनेला अनुसरूनच कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-
- काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार. कठोर उपाययोजना करणार.
- कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार.
- विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
- ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि संपत्तीच्या वाढीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीची गरज आहे, तेथेच एफडीआयला परवानगी देणार.
- नाशवंत शेतीमालाचा इतर भागांमध्ये पुरवठा करण्यासाठी अॅग्री रेल नेटवर्क उभारणार.
- हायस्पिड ट्रेन नेटवर्कसाठी डायमंड क्वॉड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करणार.
- महागाई रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
- शिक्षण आणि उद्योगात अल्पसंख्याकांना अधिक संधी देणार.
- केंद्र आणि राज्य सरकार या मधील संबंध सुधारण्यावर भर देणार.
- ज्युडिशिअल रिफॉर्म, इलेक्ट्रोल रिफॉर्मला प्राथमिकता देणार.
- नवीन आरोग्य धोरण आणले जाईल.
- ग्रामीण भागात वाय-फाय झोन उभारणार.
- महिला सबलीकरणासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड.
- टॅक्स व्यवस्था आणि बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष भर.
- प्रत्येक राज्याच्या राजधानीत एम्स उभारले जाईल.
- नॅशनल ई-वाचनालय सुरू केले जाईल. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
- राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. उर्दू भाषेचे संरक्षण आणि प्रसार केला जाईल.
- एससी, एसटी प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक न्याय आणि सबलिकरण करण्यावर भर.
- शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी दूर करणार.
- प्रत्येक भारतीयाला पक्क्या घराचे आश्वासन.
सर्व वर्ग, प्रांतिय व धर्मियांना सुख, शांती, समाधान, सुरक्षा, विकास व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाची विक्रयमूल्य (ब्रांड व्हॅल्यू) वाढविण्यासाठी गुजराथचे सलग तीन वेळेला निवडून आलेले व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले “माननीय श्री नरेंद्र भाई मोदी” व “भारतीय जनता पक्ष व इतर मित्र पक्षांचे खासदार पदासाठीचे इतर अधिकृत उमेदवार” यांनाच निवडून आणावे, ही विनंती माननीय श्री लाल कृष्ण अडवाणी व श्री राजनाथ सिंग यांनी केलेला आहे.
प्रथमदर्शनी अशक्य भासणारे परंतु तितकेच महत्वाचे मुद्दे ऐकून माझे कान टवकारले गेले व हातातील कामे सोडून मी टीवीवर नजर खिळवून बसलो. देशहिताला प्रथम व पूर्ण प्राधान्य देवून भाजप व मित्र पक्षांनी निवडणूक जिंकल्यावर काय चांगले होवू शकते यावर केलेला विचार मनाला पूर्ण भावून गेला. निवडणुकीला सामोरे जातांनाच अगदी पहिल्या पायरीवरच या तऱ्हेने बारीकसारीक गोष्टींचा पूर्ण विचार करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे व पक्षाची देशाप्रती असणारी एकूण तळमळ (प्रतीबद्धता) या “संकल्प पत्रा” द्वारे व्यक्त केली गेली आहे असेच वाटले.
चांगला मुद्दा हाती नसल्यामुळे, अगदी निवडणूक सुरु होण्याच्या मुहूर्तावरच हे प्रकाशन झाले आहे, यावरच बऱ्याच पक्षांनी टीका केली आहे. इतर सर्व पक्षांनी निव्वळ कागदी प्रकाशनाची औपचारिकता दाखवून केवळ मतदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असेच वाटते. त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे. या आरक्षणामुळे फक्त वरवर लेप लावून खालची जखम तशीच भळभळत ठेवण्यासारखेच आहे, हे आजवर कोणाच्याही लक्षात कसे आलेले नाही?
नुसती खोटी प्रलोभने देत व मोठमोठे घोटाळ्यांचे विश्वविक्रम रचलेल्या कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात तर पुढच्या एका वर्षात १० लाख रोजगार निर्माण करू अशी पोकळ आश्वासने दिली आहेत, ज्यावर कोणा मतदाराचा विश्वास बसेल का?
गरिबांच्या रोजच्या खर्चावरचे चमत्कारिक व अवास्तव गणित करून कोंग्रेसच्या नियोजनमंत्र्यांनी त्यांच्या तोंडावर चपराक मारलेली आहे, हे कोणी विसरेल का?
विदेशी अर्थपुरवठ्याशिवाय विकास शक्य नाही असेच इतर सर्व विरोधी पक्षांना वाटत असतांना, आजपर्यंत असा आमुलाग्र बदल घडवण्याचा “१८०अंश विरुद्ध” विचार कोणत्याही पक्षाला करणे जमलेले नाही. पण काळाची हीच खरी गरज आहे, ज्यामुळे मरगळलेली भारतीय मने निश्चितच जागरूक होऊन भारत एक आर्थिक महासत्ता बनेल अशी खात्री वाटू लागते. व त्याचा परिणाम कि काय गेल्या १० वर्षात रुपयाचे मूल्य ४० वरून ६८रुपये प्रती डॉलर एवढे घसरलेले असतांना नुसते “मोदीच निवडून येतील असा मतदारांचा आशावाद” दोन महिन्यात ५९ रुपया प्रती डॉलर पर्यंत मूल्यवर्धन करू शकतो, याचा अर्थ मोदी निवडून येण्याबद्दल किती उत्सुकता व विश्वास आहे हेच दिसून येते.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!
एक आवाहन: मेरा देश लंगडा हो गया है|आप देशको उठाकर चला दिजीये|
प्रतिक्रिया
13 Apr 2014 - 6:47 pm | अर्धवटराव
पण नाड्या संघाच्या हातात नाहित. भाजपामधे एक मोठि लॉबी संघवर्तूळाच्या बाहेरची आहे. भाजपचे आर्थीक स्त्रोत देखील संघाच्या बाहेरचे आहेत. भाजपला फंडींग करणारी उद्योग घराणी व मोदिंची मैत्री जपलेली उद्योग घराणी तर संघाच्या जवळपास देखील नाहि.
नव्वदच्या दशकात अयोध्या मुद्दा तापायची कारणं फार वेगळी होती. सर्वात मुख्य असा जो जनसमुदाय त्याकाळी अयोध्या आंदोलनात ओढला गेला होता. आज त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती आहे. कमकुवत आणि छुपा पाठिंबा देणारं केंद्र, अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणावर अनेक दशकं नाराज असलेला हिंदु समाज ( तुष्टीकरण हा विवादास्पद विषय आहे. त्यानावानी नेमकं काय झालं हा वेगळा मुद्दा आहे), भाजपाकडे असलेला तो एकमेव कार्यक्रम, सर्व भाजपेतर पक्षांना त्या वादामुळे होणारा राजकीय फायदा... अशी अनेक पदरी गाठ होती ति. आज भाजपाचा मतदार मंदीर मुद्यावर मत देत नाहि. तो मुद्दा एका मर्यादेबाहेर ताणला तर भाजप २०० वरुन परत २ वर येईल हे भाजपला नक्की कळतं. हा जुगार भाजप खेळणं शक्य नाहि.
मंदीर मुद्दा भाजपसाठी महत्वाचा नक्कीच आहे. पण सरकारी फांदीवर बसुन तिच फांदी कापण्याचा शेखचिल्ली शहाणपणा भाजप करणार नाहि. भाजप, मोदि परत त्या ट्रॅपमधे अडकावे यासाठी देव पाण्यात घालुन बसलेले त्यांचे विरोधक मात्र हे टेन्शन परत वाढवायचा प्रयत्न हमखास करतील.
सेम फॉर अदर मंदीर मुद्दे.
आसिंधु सिंधु, हिंदुराष्ट्राबद्दल एव्हढच म्हणतो कि गाझा स्ट्रीप लेव्हलचा आगडोंब उसळ्ल्याशिवाय हे मुद्दे मेन बोर्डावर विचारात देखील घेतले जाणार नाहित....मग त्यावर कारवाई तर फार लांब राहिली.
13 Apr 2014 - 7:23 pm | संजय क्षीरसागर
भाजपानं सपोर्ट काढला तर मोदींना कुत्रं विचारणार नाही, मग भले अंबानी त्यांच्या पाठीशी असोत की अडानी. (आणि ते दोघंही हा जुगार खेळतायंत कारण बागडू एकदा पंतप्रधान झाला की मग यांचंच राज्य, हे देश लुटायला दोघं मोकळे!)
बिजेपीचा `हिंदुत्त्व' हा कोअर प्लॅन आहे, विकास वगैरे नंतर आणि मोदींचीही मूळ घडण तीच आहे. मोदींना स्वत्त्व वगैरे असतं तर विकासाचा इतका डंका पिटल्यावर त्यांनी राममंदिराचा मुद्दा येऊच दिला नसता. एखादा `फुल सर्किट' सुद्धा समजू शकतो की राममंदिराच्या मुद्यामुळे `विकासाचा देखावा' मार खातो आणि त्या दोन्हींचा एकमेकांशी दूरान्वयेही संबंध नाही.
पण सर्किटपेक्षा मोदी समजूतदार आहेत कारण एनकेनप्रकारेण त्यांना पंतप्रधानपदाच्या घोड्यावर बसायचंय. आता इतक्या उघड गोष्टीचा सर्किटला प्रकाश पडत नाही त्याला इलाज नाही.
13 Apr 2014 - 8:25 pm | अर्धवटराव
मग आपल्या विचारांसापेक्ष दुसरी बाजु देखील असु शकते हे बुद्धीला झेपतच नाहि. उरलं काय...तर द्या वैयक्तीक प्रतिसाद. मनाची तडफड बाकि काहि नाहि.
13 Apr 2014 - 8:33 pm | प्यारे१
सर्किट असताना मान्य न करता आपण फार महान आहोत असा भ्रम असणारांना काय समजणार दुसर्याचं बोलणं?
नशिबानं मिळालेली सत्ता सांभाळता न येऊन पळून जाणारे, जनतेच्या अपेक्षांचा चक्काचुर करणारे लोक म्हणजे तुमच्या दृष्टीनं आदर्श. असो!
आता मला काहीतरी नावं ठेवाल (जुनी नका ठेवू आता. नवं घ्या काही!) मुद्द्याचं बोला सर मुद्द्याचं.
13 Apr 2014 - 9:07 pm | आयुर्हित
संजय क्षीरसागरजी,आपण जरा जास्तच बोलत आहात असे नाही का वाटत आपल्याला? उठसुठ कर्तृत्ववान व्यक्तींना शिव्या द्यायची सवय बंद करा! आपल्या limit मध्ये रहा!
(स्वगत: तुझी लायकी तरी आहे काय मोदींबद्दल बोलायची? कोण किती प्रकाश पाडत आहे हे दिसतेच आहे. जर आपल्याला चांगल्या कर्तृत्ववान व्यक्तीं ओळखता येत नसतील तर तो आपल्या शिक्षणाचा व सडलेल्या मेंदूचा दोष आहे! पोहऱ्यात यायला मुळात आडात असले पाहीजे ना!)
14 Apr 2014 - 12:13 pm | क्लिंटन
इतकी वर्षे भाजपमध्ये कोणा एका व्यक्तीचे महत्व नव्हते पण मोदी स्वतःचे स्तोम वाढवून पक्षाचा घात करत आहेत अशी टिका खुद्द भाजपमध्ये होत आहे. असे असताना भाजपानं सपोर्ट काढला तर मोदींना कुत्र विचारणार नाही अशी उलटी गंगा कशी वाहायला लागली? मोदींमुळे भाजपचा परंपरागत मतदार--उच्चवर्णीय, बनिया, यादवेतर ओबीसी (जो मधल्या काळात पक्षापासून दुरावला होता) तो परत आला आहे असे चित्र आहे आणि त्याबरोबरच मोदींमुळे भाजपला अन्यथा मत देऊ शकले नसते असे अनेक मतदार पक्षाकडे आकृष्ट झाले आहेत असे चित्र आहे.अडवाणींनी पक्षासाठी खूप काही केले आहे हे कोणी अमान्य करूच शकणार नाही.तरीही अडवाणी मोदींवर नाराज झालेले असतानाही पक्षाचे कार्यकर्ते मोदींच्याच मागे उभे होते हे चित्र होते. तेव्हा मोदी आज पक्षातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा मोठे झाले आहेत असे आजचे चित्र आहे. तेव्हा जर भाजपने पाठिंबा काढला तर मोदींना कुत्र विचारणार नाही याच्या अगदी उलटी परिस्थिती आहे--जर मोदींनी पाठिंबा काढला (भाजपमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला) तर भाजपला कुत्र विचारणार नाही.यातूनच काँग्रेसप्रमाणे भाजपमध्येही व्यक्तिपूजेचे स्तोम वाढत आहे ही नक्कीच वाईट परिस्थिती आहे.
13 Apr 2014 - 10:21 pm | संपत
मागील एक महिन्यातील मोदींच्या वाराणशीमधून उभे राहण्यापासून राम मंदिराचा समावेश शेवटच्या क्षणी जाहीरनाम्यात करण्यापर्यंतच्या घटना पाहिल्या तर हे स्पष्ट होते कि नाड्या संघाच्याच हातात आहेत. इथे आर्थिक मदतीपासून कार्यकर्त्यांच्या फौजांसकट संघाच्या संस्कारांपर्यंत अनेक घटक येतात. आर्थिक हे महत्वाचे कारण सध्या नाही हे मान्य. (२०-२२ वर्षांपूर्वी तेही महत्वाचे होते. )अर्थात संक्षिनी म्हटल्याप्रमाणे अंबानी व तत्सम उद्योगपती हे फक्त भाजपचे आर्थिक पाठीराखे नाहीत, त्यामुळे फार विश्वासू नाहीत.
14 Apr 2014 - 2:37 am | अर्धवटराव
ज्या दिवशी मोदि पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणुन सिरीयसली कन्सीडर केल्या गेले तेंव्हापासुनच लखनौ, वाराणसी, एक सीट मध्यप्रदेशातली व एक गुजरतमधली असे ऑप्शन्स भाजपने तपासले. पैकी युपी आणि गुजरातमधुन मोदिंना निवडणुक लढवावीच लागणार हे पुर्वीच लक्षात आलं भाजपच्या.
राममंदीर मुद्दा शेवटच्या क्षणी जाहिरनाम्यात आला हे ही बरोबर नाहि. हा मुद्दा जाहिरनाम्यातुन वगळायची चुक भाजप करणार नाहि.
प्रश्न उरतो कि आज ज्या भुमीकेत भाजप पोचला आहे त्या लेव्हलला जाऊन एक राजकीय पक्ष म्हणुन भाजपसमोर राममंदीराबाबत ऑप्शन काय आहेत. कुठल्याही बळाचा वापर करुन हा प्रश्न तडीस लावणं म्हणजे आत्महत्या आहे भाजपसाठी. संघपरिवार देखील हे जाणुन आहे. राममंदीर प्रश्नी कुठलाही राजकीय तोटा सहन करण्याची मानसीकता ना भाजपची आहे ना संघपरिवाराची. आज भाजप व संघपरिवारासमोर मुख्य आव्हान सत्ता प्राप्ती व ति प्राप्त झालीच तर ति टिकवण्याची आहे. या डीलमधे राममंदीर मुद्दा बसतच नाहि. झालच तर मोदि या सर्व विवादावर एखादा सर्वमान्य तोडगा काढुन आपलं नाव अजरामर करण्याचा प्रयत्न करतील...पण राड्याकरता काहि स्कोपच नाहि.
राहिला मुद्दा विरोधकांचा. तर विरोधकांना देखील या मुद्यावर काहि तात्वीक मतभेद वगैरे असायचं कारण नाहि, व ते नाहिच. बाबरीकांड घडलं तेंव्हा झाडुन सार्या सो कॉल्ड सेक्युलर पक्षांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. त्यांच्या पुढील अनेक निवडणुकांची बेगमी झाली या इश्युमुळे. आज केजरीवाल देखील तेच तुप आपल्या पोळीवर ओढायला आतुर आहेत. पण त्यातुन सध्यातरी फारसं काहि होणार नाहिए.
14 Apr 2014 - 12:20 pm | संपत
मोदिनी वाराणशीच का निवडली ह्याचे तुम्ही स्वतः, क्लिंटन, श्रीगुरुजी यांनी ( आणि मीदेखील) केलेले विश्लेषण पुन्हा वाचावे.
राम मंदिराच्या मुद्द्यामुळेच भाजपचा जाहीरनामा इतक्या उशिरा (मतदान चालू झाल्यावर) आला हे त्यावेळच्या बातम्या वाचल्यात तर स्पष्ट होईल.
14 Apr 2014 - 12:29 pm | संपत
बाकी राम मंदिर वगळणे ही तुम्हाला चूक वाटते हे वाचून काही गैरसमज दूर झाले.
14 Apr 2014 - 7:10 pm | अर्धवटराव
अजुन तरी मी केवळ एखादा मुद्दा सरकारच्या एक्झीक्युशन लिस्टवर येण्याचे चान्सेस किती यावरच मतप्रदर्शन केलय...मुद्दा चांगला कि वाईट याबद्दल फारसं बोलणं झालच नाहिए. असो.
14 Apr 2014 - 10:46 pm | संपत
तुमचा प्रतिसाद पुन्हा वाचला. माझा गैरसमज झाला होता त्याबद्दल क्षमस्व.
14 Apr 2014 - 12:21 am | कवितानागेश
शी बै अर्धवटराव. असा आभ्यास करुन नै बै प्रतिसाद लिहायचा?
गरळ ओकायची असते गरळ!!!
जाउ दे. नै जमायचं..
तुम्ही हिब्रु शिकायला येणार का?
14 Apr 2014 - 10:16 am | क्लिंटन
एका विशिष्ट धर्मियांविरूध्द लोकांच्या मनात भिती निर्माण करायची, आपण 'त्यांच्याविरूध्द' काही केले नाही तर ते आपल्याला कापतील असे लोकांना वाटायला लागेल असे वातावरण निर्माण करायचे आणि स्वतःला 'त्यांच्याविरूध्द' 'आपला' तारणहार म्हणून प्रोजेक्ट करायचे आणि त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची अशी टिका संघ परिवारावर होत आलेली आहे. त्याचप्रमाणे मोदी सत्तेत आले तर यादवी होईल वगैरे वक्तव्ये करून तुम्ही तरी त्यापेक्षा वेगळे काय करत आहात? असे काहीतरी होईल म्हणून मोदींविरूध्द लोकांच्या मनात भिती निर्माण करायची, आपणच काय ते त्यापासून संरक्षण करू अशा प्रकारचा प्रचार करायचा आणि त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची हा प्रकार काँग्रेस, कम्युनिस्ट आणि आआप करत आहेतच.संघ परिवारावर ज्या पध्दतीची टिका होते नेमकी तीच गोष्ट हे विचारवंत करत आहेत आणि त्यात तुमच्यासारखे लोक हातभार लावत आहेत.
मोदी सत्तेत आले तर यादवी होईल या बोलण्याला नक्की काय आधार आहे?गुजरातमध्ये गेली १२ वर्षे यादवी चालू आहे का? की उगीच आपलं लिखाणाला भारदस्तपणा वाटावा म्हणून काहीतरी लिहायचे?
14 Apr 2014 - 12:14 pm | संपत
१९९२ -९३ साली राम मंदिर प्रकरण चिघळले असते तर यादवी होण्याचा धोका तुम्हाला वाटला नाही का? नसेल तर आपल्या विचारसरणीत आणि राष्ट्रहिताच्या कल्पनेत बराच फरक आहे. आताही राम मंदिराचा मुद्दा आप किंवा कोन्ग्रेसने भाजपला जाहीरनाम्यात टाकायला लावला असे तुमचे म्हणणे आहे काय?
14 Apr 2014 - 12:57 pm | क्लिंटन
आता असा बुशबाबासारखा 'एकतर आमच्याबरोबर नाहीतर आमच्या विरोधात' असा दृष्टीकोन असेल तर फार काही बोलून उपयोग नाही.तरीही काही गोष्टी लिहाव्याशा जरूर वाटतात.
रथयात्रेसाठी आणि अयोध्या प्रकरणावरून वातावरण गढूळ केल्याबद्दल अडवाणींना दोष दिलाच पाहिजे.पण त्यात राजीव गांधींचा काहीच दोष नाही?राजीव सरकारने अयोध्येत राम जन्मभूमीचे १९४९ पासून असलेले कुलूप उघडले. यावर कोणी म्हणेल की राजीव सरकारने फैजाबाद जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.पण तो आदेश आल्यापासून ४० मिनिटात कुलूप उघडले जाणे आणि तिथे दूरदर्शनचे कॅमेरे आधीपासून हजर असणे यावरूनच काहीतरी ’फिक्सिंग’ त्यात होते असे म्हटले तर काय चुकले? दुसरे म्हणजे न्यायालयाचा निर्णय आला तरी तो ताबडतोब अंमलात आणावा अशी न्यायालयाचीही अपेक्षा नसते.त्यासाठी ८-१५ दिवसांचा वेळ दिला जातो.दरम्यान सरकार तो निर्णय मान्य नसेल तर वरच्या कोर्टात अपील करते आणि जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळवते.तसे राजीव सरकारने का केले नाही? पुढे राजीव सरकारनेच शीलान्यासाला परवानगी दिली.१९८९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सुरवात राजीव गांधींनी फैजाबादपासून केली.आता कोणी म्हणेल की कुठून तरी सुरवात करायची ती फैजाबादपासून केली (संस्कृतमधला अशोकवनिकान्याय). पण या सगळ्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींनी नेमकी फैजाबादपासूनच प्रचाराला सुरवात करणे नक्की काय दर्शविते? वातावरण तापविल्याबद्दल संघ परिवार जितका दोषी आहे त्यापेक्षा जास्त तशी पार्श्वभूमी बनायला पंतप्रधान असताना मदत केल्याबद्दल राजीव गांधी जबाबदार आहेत असे म्हटले तर?
तरीही इतकी वर्षे काँग्रेस सत्तेत असूनही तुम्हाला कधी यादवीचा धोका वाटला नाही. मोदी 'पहले शौचालय बादमे देवालय' हे पण म्हणाले होते याकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करता. भाजपच्या जाहिरनाम्यात इतके मुद्दे आहेत त्यातील राममंदिर हा एक मुद्दा आहे.तरीही वातावरण असे उभे करता की जणू काही राममंदिराशिवाय जाहिरनाम्यात दुसरे काही नाही. जाहिरनाम्यात मदरशांच्या आधुनिकीकरणाचाही मुद्दा आहे त्याकडे दुर्लक्ष का?मुस्लिम युवकांना कुराण पाहिजे असेल तर जरूर मिळेल पण त्यांच्या हातात कॉम्प्युटरही असला पाहिजे हे पण मोदीच म्हणाले त्याकडेही दुर्लक्ष का? यातूनच तुमचा पूर्वग्रह पूर्णपणे स्पष्ट होतो.
काश्मीरात सैन्य असावे की नाही यावर सार्वमत घ्यावे असे बरळणारा तो प्रशांत भूषण तुम्हीच समर्थन करत असलेल्या आआपचा. आणि त्यावर चर्चा झाल्यावर अगदी मिपावरही काश्मीर भारतात असणे हा कसा अन्याय आहे, भारताची काश्मीरात लोकस स्टॅन्डाय कशी नाही वगैरे विचारवंती बडबड करणार्या जातकुळीतल्या किती माणसांनी अयोध्येत बाबरी सोडा असे मुस्लिमांना उपदेशाचे डोस पाजले हे ऐकायला आवडेल.
दुसरे म्हणजे राममंदिराचा मुद्दा जाहिरनाम्यात नसेल तरी तुम्ही उलट्या बोंबा मारणार, असला तरी उलटी टिका करणार. तेव्हा तुमच्यासारखे लोक काहीही झाले तरी टिका करणारच आहेत तेव्हा अशा टिकाकारांना का सिरियसली घ्यावे?
14 Apr 2014 - 1:32 pm | संपत
मला वाटले होते कि तुमचा मोदींना विकासाच्या मुद्द्यांवर पाठींबा आहे. राम मंदिर आणि हिंदुत्व हे योग्य मुद्दे आहेत असे मानणाऱ्या लोकांबरोबर चर्चा करून काहीच निष्पन्न होत नाही, उगीच कटुता वाढते असा अनुभव अनेकदा आलेला आहे. त्यामुळे मी इथेच थांबतो.
14 Apr 2014 - 1:48 pm | प्यारे१
संपतराव,
तुमच्या घराचा एक कोपरा मला रहायला द्या, कायमस्वरुपी.
तुम्ही नाही दिलात तर मी बळंच घेणार.
आजपासून तुमच्या घरातल्या कोपर्यावर माझा हक्क.
नंतर तुमची मुलं नातवंडं माझ्या मुलानातवंडांबरोबर काय करायचं ते करु दे.
14 Apr 2014 - 2:06 pm | संपत
जाऊ द्या न आवले साहेब. ह्या विषयावर कितीही बोललो तरी आपले 'मै क्या बोल रहा हुं, तुम क्या बोल रहे हो' असेच होणार. त्यामुळे सोडुन द्या.
14 Apr 2014 - 2:13 pm | प्यारे१
तुमच्या घराचा एक कोपरा तुम्ही जौ द्या म्हणालात तरी माझाच असणार आहे. असो.
राममंदिराचा मुद्दा आणला कुणी हो चर्चेमध्ये. थांबा आपण त्याचं घरच उन्हात बांधू. अटलबिहारींनी कॉ मि प्रो सोडून आता सत्तेवर आलो आहोत तर चला राममंदिर बां धूच असं म्हटलं नाही. मोदी सुद्धा असं म्हणण्याची शक्यता अत्यंत नगण्य दिसत आहे.
बाकी क्लिंटनच्या प्रतिसादातलं तुम्हाला सोयिस्कर तुम्ही उचलून त्यावरच भाष्य केलंत हे देखील अपेक्षितच म्हणावं काय? तसंही भाजपनं राममंदिराचा मुद्दा उचलून पी व्ही नरसिंहराव साहेबांना आर्थिक उदारीकरणासाठी आवश्यक रस्ता मोकळा करुन दिल्याचं मिपावरच कुठंतरी (ह्याच चर्चेत आहे काय?) वाचलं. तसंही असू शकेल. जनतेचा नुस्ता वापर. नेहमीप्रमाणंच.
14 Apr 2014 - 4:01 pm | संपत
धागा भाजपच्या जाहीरनाम्यावर आहे. राम मंदिर जाहीरनाम्यात असल्याने 'चर्चा तर होणारच' .
त्यांनी राजीव गांधीचे जे उदाहरण दिले तेही अत्यंत टिपिकल आहे. कॉंग्रेसच्या मुस्लीमधार्जिणेपणामुळे भाजपचे हिंदुत्व न्याय्य ठरते अशी मीमांसा. त्यांना ही विचारसरणी असण्याचा हक्क असला तरी त्यावर वाद घालण्यात मला इंटरेस्ट नाही एवढेच. बाकी क्लिंटन ह्यांच्या लिखाणाविषयी आदर मी आधीही व्यक्त केला आहे.
मी माझ्या प्रतिसादात स्पष्ट म्हटले आहे कि भाजप पूर्ण बहुमतात आलेच तर तो धोका आहे. भाजपला याआधी पूर्ण बहुमत नव्हते.
तुम्ही खालील एका प्रतिसादात म्हटले आहे कि भाजपच्या एका मतदाराला संतुष्ट करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा घातला आहे. मग हाच मतदार पुढील निवडणुकीत टिकवण्यासाठी राम मंदिराची कार्यवाही भाजपला आवश्यक ठरेल नाहीतर तो दूर जाईल.
14 Apr 2014 - 4:10 pm | प्यारे१
बर्याच राज्यांमध्ये भाजपचं सरकार बहुमतामध्ये आहे. तिथं सांप्रदायिक दंगे जाणीवपूर्वक झालेत असं दिसत नाही. गोध्रा हत्याकांड सोडा. टेप जुनी झालीये वाजून वाजून. इतर ठिकाणी!
केन्द्रामध्ये सरकार असलं तरच भाजपला दंगे घालता येतील अथवा आपला अजेन्डा राबवता येईल असं काही लॉजिक आहे का? राज्यांच्या अखत्यारीमध्ये सुद्धा बरंच काही करता येऊ शकतं पण तसं घडताना दिसत नाही. बागुलबुवा नाही वाटत का?
बाकी भारतात सगळं आलबेल असताना फक्त भाजप आपल्या गोबेल्स नीतीद्वारे लोकांमध्ये हिंसा भडकावू शकतो ह्या समजावर नि 'राममंदिर' ह्या मुद्द्यावर आपलं लक्ष केन्द्रित असेल तर चालू द्याच. :)
14 Apr 2014 - 4:51 pm | संपत
दुधाने पोळलेला ताकदेखील फुंकून पितो. इथे तर पुन्हा गरम दूधच मेनूत आहे. :)
14 Apr 2014 - 5:18 pm | प्यारे१
दुसर्या हॉटेलचा मेनू बघा मग! बाकी मुळात नुसतं 'मेनूकार्डच' आहे की एखादा पदार्थ खरंच बनवतात तेही बघा. हॉटेल नवं असलं तरी हरकत नाही. हॉटेलचा मालक नेमकं काय करतोय ते बघितलं पाहिजे.
उगा मी लोकांना पोट भरुन जेवण २ रुपयात देणार आहे, माझं हॉटेल हायजेनिक असणार आहे इ.इ. चा दीड तासाचा व्हिडीओ नको.
15 Apr 2014 - 9:59 pm | विकास
दुधाने पोळलेला ताकदेखील फुंकून पितो. इथे तर पुन्हा गरम दूधच मेनूत आहे.
गरम दुध हे काँग्रेसच्या राज्यात दिसले आहे... कम्युनिस्टांच्या राज्यात आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या हिंसाचारी नक्षलवादास पाठींबा देणार्या आपच्या विचारसरणीत दिसत आहे... मोदींबद्दल गेले बारा वर्षे प्रयत्न करून देखील काही घडले नाही. इतर कुठल्याही पक्षाचा विशेष करून काँंग्रेस आणि कम्युनिस्टांचा मुख्यमंत्री दाखवा जो त्याच्या राज्यात झालेल्या हिंसाचाराला मुख्यमंत्री म्हणून (जसे मोदींच्या बाबतीत धरले गेले तसे) जबाबदार धरला गेला आहे आणि चौकशीस सामोरे गेला आहे.
बाकी रामजन्मभूमीच्या संदर्भात जो पर्यंत कोर्ट निर्णय घेत नाही आणि जो पर्यंत हिंदू-मुस्लीम धार्मिक नेत्यांमधे समझौता होत नाही तो पर्यंत काही होणार नाही. एक शक्यता नक्की आहे: इतर पक्षांना या प्रश्नाचा बागुलबोवा करून चिघळत ठेवून त्यावर पोळी भाजायची आहे. तसे करण्याऐवजी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावणे बहुमत असल्यास (जे असणार नाही, चिंता नको!) भाजपा करेल.
14 Apr 2014 - 1:50 pm | क्लिंटन
ठिक आहे. मला स्वतःला देवळाबिवळांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मी सश्रध्द असलो तरी देवळांमध्ये मी फारसा कधी जातही नाही.तेव्हा अयोध्या मुद्दा माझ्यासाठी तितकासा महत्वाचा नाही. तरीही स्वयंघोषित विचारवंत मऊ लागले म्हणून कोपरापासून खणणे हा प्रकार हिंदूंबाबत करतात तो ही मला मान्य नाही.शेवटी देशाचे भवितव्य चांगले बनावे यासाठी मोदींना मत देणार आहे आणि ती क्षमता मोदींमध्ये आहे असा विश्वासही मला वाटतो. सरकार चालवायचे सोडून मोदी टेंपल कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करणार असे चित्र इथली काही मंडळी उभी करत आहेत तसे काही होईल असे मला तरी अजिबात वाटत नाही. असो.
12 Apr 2014 - 12:37 pm | संपत
मीही तेच म्हणतोय. त्या एका ओळीत भाजप आपल्या पारंपारिक मतदारांना ठासून सांगते आहे कि विकासांच्या गप्पांमुळे आमचा मूळ धार्मिकतेचा अजेंडा आम्ही विसरलेलो नाही. आम्ही तेच आहोत.
त्यामुळे विरोधकांचे भाजपच्या जाहीरनाम्याचे आकलन योग्यच आहे.
13 Apr 2014 - 12:03 am | विजुभाऊ
हा हा हा सोयीस्कर ग्राफ. हे ग्राफ कोणत्या डेटावरुन काढले हो?
एक शंका : ज्या सम्जय गांधीना मृत्युनंतरही शिव्या दिल्या जातात त्यांच्या मुलाला मात्र भाजप त्यांचा स्टार कँपेनर बनवले जाते. हा भाजपचा वैचारीक गोंधळ आहे असे वाटत नाही का?
13 Apr 2014 - 9:34 am | विश्वनाथ मेहेंदळे
म्हणजे बाप वाईट असेल तर मुलगा पण वाईट असे समीकरण आहे का ??
11 Apr 2014 - 2:08 pm | आयुर्हित
वाशिंगटन : अमेरिकी समाचार पत्र ‘द वॉशिंगटन पोस्ट’ ने बीजेपी के पीएम पद के उम्मीदवार नरेंद्र मोदी की नीतियों की प्रशंसा करते हुए मोदी को सलाह दी है कि भारत को बेशक उनकी नीति पर चलने की जरूरत है लेकिन उन्हें पूर्वाग्रह वाले बड़बोलेपन की बजाय अपनी सफलता पर ध्यान केन्द्रित करना होगा. साथ ही अखबार ने कहा कि अब मोदी ने मुस्लिम-विरोधी बड़बोलापन छोड़ दिया है.
मोदी के सरकार बनाने पर लोकतांत्रिक संस्थाओं के विनाश और धार्मिक उन्माद बढ़ने की आशंकाओं से इंकार करते हुए अखबार ने कहा कि भारत की राजनीतिक संस्कृति ऐसे उग्रतावाद को हावी होने से रोकने में सक्षम है. अखबार ने कहा कि मोदी को लेकर आशंकाएं नई नहीं हैं. वर्ष 1998 में जब बीजेपी ने सत्ता संभाली थी तब भी ऐसी ही आशंकाएं व्यक्त की गई थीं.
अखबार ने ओबामा प्रशासन द्वारा मोदी की ओर दोस्ती का हाथ बढ़ाने को सकरात्मक कदम बताते हुए कहा कि यह सोचना सही है कि मोदी सांप्रदायिक भेदभाव को बढ़ाने की बजाय अर्थव्यवस्था को आगे बढ़ाने के वायदे पर काम करेंगे. गौरतलब है कि मोदी को लेकर अंतररष्ट्रीय समुदाय का नजरिया बदला है और मोदी को सभी जगह स्वीकार किया जा रहा है.
श्री न्यूज: भारत के लिए 'मोदी' नीति जरूरी : वॉशिंगटन पोस्ट
11 Apr 2014 - 4:05 pm | संजय क्षीरसागर
तुम्हाला इंग्रजी येत असेल तर Washington Post च्या तुम्ही (न) दिलेल्या लिंकमधे (ज्यावरनं तुमच्या मोदीभक्त वर्तमानपत्रानं अर्धवट अर्थ काढून, तुम्ही वर उधृत केलेली स्तुतीसुमनं उधळलीयेत) शेवटी काय म्हटलंय ते वाचा :
आणि तो राइट-अप तिथे संपतो!
तुम्ही उधृत केलेल्या या घंटू ओळी :
Washington Post मधे कुठेही नाहीत!
तुमच्या वर्तमानपत्रानी त्या स्वतःच घुसडल्या आहेत आणि तुम्ही तितक्याच बुद्धीचातुर्यानं त्या कॉपी-पेस्ट केल्या आहेत.
12 Apr 2014 - 2:39 am | आयुर्हित
२००२ च्या दंग्यांतल्या सहभागासाठी मोदींविरूद्धं लंडनमधून चळवळ चालवणारे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणारे झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले याची हकीकत
सरेशवाला म्हणतात, सौदी अरेबियातून सुमारे २५० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या सुन्नी बोहरा समाजातील मी एक. अत्यंत कर्मठ मुसलमान असूनही आम्ही शिक्षण व उद्योगांत मोठी प्रगती केली आहे. २००२च्या दंगली उगाळत बसणारे लोकं विसरतात की १९६९ साली अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलीत ५०००हून अधिक मुसलमान मारले गेले होते. कॉंग्रेसचे हितेंद्रभाई देसाई मुख्यमंत्री आणि स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
दोषींना शिक्षा होणं दूर, पोलिसांकडून साधं एक आरोपपत्रंही ठेवलं गेलं नव्हतं. १९८५ ते २००२ सालापर्यंत, जवळपास दर २-३ महिन्यांनी दंगे व्हायचे. कर्फ्यू लागायचे. कॉंग्रेस राजवटीत झालेल्या या दंग्यांमध्ये अनेकदा आमचं घर, ऑफिस किंवा फॅक्टरी जाळली गेली. विमा काढला असूनही त्याचे पूर्ण पैसे मिळायचे नाहीत. कदाचित २००२ च्या दंगली २४x७ टीव्ही आणि इंटरनेट युगात झाल्यामुळे त्या इतरांपेक्षा उठून दिसतात.
२००२च्या दंगलींच्या वेळेस मी इंग्लंडमध्ये असलो तरी त्यात आमच्या कुटुंबाच्या व्यवसायाची वाताहत झाली. इंग्लंडला माझ्या आजूबाजूला रहाणारे ३ मुस्लिम रहिवासी या काळात गुजरातमध्ये गेले असता दंगलींत मारले गेले. आम्ही एकत्र येऊन मोदींना आणि गुजरात सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले. तत्कालिन गृहमंत्री लाल कृष्ण आडवाणींना अटक होण्याच्या भीतीने आपला इंग्लंड दौरा रद्द करावा लागला.
एका रात्रीत मी "हिरो" ठरलो पण आपण यातून काय साध्य केलं या विचाराने मी अस्वस्थ होतो. इग्लंडमध्ये असताना जगभरातील मुसलमानांची स्थिती मी जवळून पाहिली. मुस्लिम जगात सर्वत्रं युद्धं, दहशतवाद आणि यादवीमुळे करोडो लोकं देशोधडीला लागले असून स्वतःच्या किंवा दुसऱ्या देशांत निर्वासितांसारखे जगत आहेत.
त्यांच्या दुःखाचं भांडवल करणारे; त्यांना वाटाघाटींपासून परावृत्त करून संघर्ष चालू ठेवायला भाग पाडणारे लोकं, स्वतः मात्र दुसऱ्या देशांमध्ये रहातात. आलिशान ऑफिसं थाटून त्यातून इमेल पाठवणे किंवा मिडियात आंदोलनं करून लाखो डॉलरच्या देणग्या आणि सात आकडी पगार मिळवतात.
मुस्लिम सर्व एक आहेत असा माझा तोपर्यंत समज होता. गुजरात दंगलग्रस्तांसाठी मदत गोळा करताना तो दूर झाला. अरब हे अरब आहेत आणि पाकिस्तानी हे पाकिस्तानी आहेत. भारतातही लखनौचे मुस्लिम हे गुजरातच्या मुसलमानांपेक्षा वेगळे आणि सुरतचे मुस्लिम हे अहमदाबादच्या मुसलमानांपेक्षा वेगळे असून गरज पडल्यास कोणी कोणासाठी धावून जात नसल्याचा प्रत्यय आला.
त्यावेळेस इस्रायल आणि पॅलेस्टिनी लोकांच्यात भयंकर संहार सुरू असूनही त्यांनी शांतता वाटाघाटींना सुरूवात केली. जर गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून लढणारे हे लोकं एकमेकांशी बोलू शकतात तर आपण का नाही? पण बोलणार तर कोणाशी? थेट मोदींशीच बोलायचे का? का नको? मोदी काही कोणी परके नाहीत. अहमदाबादच्या बाजूच्या आणि मुस्लिम वस्ती असलेल्या वडनगरमध्ये ते मोठे झाले. दोन तृतियांश मताधिक्याने ते पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते.
त्यांना आणि गुजरात सरकारला वाळीत टाकले तर सर्वाधिक नुकसान गुजराती मुसलमानांचेच होणार होते. आम्हालाही शाळा, दवाखाने, मदरसे चालवायला प्रशासनाची मदत लागतेच. म्हणून मी याबाबत अनेक मौलवींशी चर्चा केली. कुराण आणि हदीथचे दाखले देत त्यांनी सांगितले की, जर तुमचा हेतु स्वच्छ असेल तर शांतता आणि सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी अगदी शत्रूशीही बोलणी करण्यास इस्लामची मान्यता आहे.
पण मोदी आमच्याशी बोलतील का? गेली दोन वर्षं आम्ही त्यांच्याविरूद्धं आग ओकत होतो. हिटलर आणि अन्य क्रूरकर्म्यांशी आम्ही त्यांची तुलना करत होतो. तेव्हा मी माझे मित्र सिनेनिर्माते महेश भट यांचा सल्ला घेतला. त्यांनी आपले पत्रकार मित्र रजत शर्मांच्या माध्यमातून मोदींशी आमची भेट घडवून आणण्याची व्यवस्था केली. ऑगस्ट २००३ मध्ये पहिल्या "व्हायब्रंट गुजरात" परिषदेच्या प्रसारासाठी मोदी इंग्लंडला येणार होते.
वेंब्लीच्या कुठल्यातरी हॉलमध्ये भेटायला त्यांनी सांगितले पण आम्ही एकांतातील भेटीसाठी आडून बसलो तेव्हा मोदींनी ते रहात असलेल्या जेम्स कोर्ट येथे भेटायला बोलावले. मी मोदींना भेटणार आहे हे कळताच तोपर्यंत स्तुतीवर्षाव करणारे लोकं माझ्यावर तुटून पडले. माझा धिक्कार करणाऱ्या ११०० इ-मेल मला आल्या. तरीही मी मागे हटलो नाही. मी म्हटलं की, हाच माझा जिहाद आहे.
आमचे स्वागत करायला मोदी स्वतः लिफ्टपर्यंत आले होते. "या मित्रांनो" असं म्हणत अत्यंत आदबीनं त्यांनी अमचं स्वागत केले. आम्ही थेट मुद्द्यालाच हात घातला. तुम्ही ५ कोटी गुजरातींची भाषा करता, त्यात ६० लाख मुसलमान समाविष्ट आहेत का नाही? तुम्ही इथे व्हायब्रंट गुजरातच्या नावाखाली आर्थिक विकासाची गोष्टं करता पण सामाजिक न्यायाचं काय? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता कशी नांदेल. हा प्रश्नं फक्त दंगलींची झळ बसलेल्या मुसलमानांचा नाही तर हिंदूंचाही आहे.
त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका बड्या उद्योगपतीने घड्याळाकडे बघालया सुरूवात केली असता मोदींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, आजची संध्याकाळ मी या लोकांबरोबर घालवणार असून माझे बाकीचे सर्व कार्यक्रम रद्द करा. माझ्याबरोबर आलेल्या मौलवी इसा मन्सूरींनी तर मोदींना धारेवरच धरलं. तब्बल दीड तास त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आम्ही त्यांना सुनावले की, या दंगलीत जे झाले त्याची जबाबदारी शेवटी मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर येते.
मोदींनी आम्हाला शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की, गुजरातच्या हिंदूंप्रमाणेच मुसलमानही माझेच आहेत. जेव्हा मी नर्मदेचं पाणी साबरमतीत आणलं तेव्हा त्याचा फायदा मुसलमानांनाही तेवढाच झाला. दंगलींबाबत करण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी अतिशय मुद्देसूद उत्तरं दिली. तथ्यहीन व अतिशयोक्तीपूर्ण आरोप त्यांनी पुरावे आणि आकडेवारीनिशी खोडून काढले. जिथे प्रशासनाच्या तृटी राहिल्या त्या त्यांनी खुलेपणाने मान्य केल्या.
गुजरात दंगलींपूर्वी केवळ ४ महिने आधी ते मुख्यमंत्री झाले होते आणि केवळ ३ दिवस आधी राजकोट विधानसभेच्या पोटनिवडणूकीत ते विजयी झाले होते. त्यापूर्वी ना कधी ते आमदार होते ना सरकारात त्यांनी कोणती जबाबदारी पार पाडली होती. मुख्यमंत्री व्हायच्या आधीची ६ वर्षं ते राष्ट्रीय राजकारणात असल्याने गुजरातबाहेरच राहिले होते.
या त्यांच्या मुद्यांमध्ये तथ्य असल्याचं आम्हाला पटलं. "हा कलंक माझ्या कारकिर्दीत लागला असून मलाच तो धुवावा लागणार आहे" अशा शब्दांत त्यांनी दंगलींची जबाबदारी स्वतःकडे घेतली. नरेंद्र मोदी दंगलींबद्दल माफी मागत नाहीत असा अनेकांचा आक्षेप असतो. पण आपली न्यायव्यवस्थाही "सॉरी" म्हटलं म्हणून कोणाचे गुन्हे माफ करत नाही. मी दोषी असेल्याचं सिद्धं झाल्यास मला भर चौकात फाशी द्या असं मोदी सांगतात.
यापूर्वी गुजरातमध्ये एवढ्या दंगली झाल्या पण कॉंग्रेसच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमचे म्हणणे मांडायला संधी दिली नाही. १९९२च्या दंगलींनंतर पंतप्रधान नरसिंहा राव यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात माझे काका होते. त्यांना ४ दिवस ताटकळत ठेऊन पंतप्रधानांनी शेवटी भेट दिलीच नाही असं सरेशवाला सांगतात. या भेटीपासून सुरू झालेल्या मोदींसोबतच्या मैत्रीबाबत बोलताना ते कशाप्रकारे गेल्या १० वर्षांमध्ये गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही, आधी गुजरातमध्ये मुस्लिम शाळा काढणे दूरास्पद होते ते आता किती सहजशक्य झाले आहे आणि गुजरातच्या मुसलमानांनी कशा प्रकारे आर्थिक प्रगती केली आहे याचे अनेक दाखले देतात.
दुसरीकडे मोदीविरोधी ब्रिगेडमधील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कशा प्रकारे दंगलींची केवळ एकच बाजू दाखवतात, दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी असलेल्या कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या सहभागाबद्दल मूग गिळून गप्प बसतात, स्वतः मुंबईत राहून गुजरातच्या मुसलमानांबद्दल नक्राश्रू ढाळतात आणि कशा प्रकारे दंगलग्रस्तांच्या जखमा भळभळत राहतील यासाठी प्रयत्नं करतात याबद्दलही ते भरभरून बोलतात.
आजवर मोदींची एवढी स्तुती ऐकायची सवय नसल्याने मधु किश्वर यांनी यातील शक्य तेवढ्या संवादांचे व्हिडिओ चित्रिकरण केले असून सरेशवालांच्या कहाणीची महेश भट आणि रजत शर्मांकडून खातरजमा केली आहे. पुस्तकाचा भर गुजरात दंगली, नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्यासाठी कॉंग्रेस तसेच मिडिया आणि सामाजिक संस्थांच्या एका गटाने गेली १२ वर्षं अविरतपणे चालवलेली मोहिम आणि गुजरातमधील मुसलमानांचा विकास या विषयांवर असला तरी ते कोणत्या पार्श्वभूमीवर मोदींची गुजरातमध्ये थेट मुख्यमंत्री म्हणून पाठवणी करण्यात आली, मोदींच्या नियुक्तीवर नाराज असलेल्या भाजपाच्या विविध गटांनी त्यांना कशा प्रकारे त्रास दिला, मोदींनी अल्पावधीतच कशा प्रकारे प्रशासन व्यवस्थेवर पकड मिळवली आणि भ्रष्टाचारमुक्त, कार्यक्षम आणि संवेदनशील व्यवस्था कशाप्रकारे निर्माण केली यावरही प्रकाश टाकते.
२६ जानेवारी २००१ला कच्छला देशातील सर्वात मोठा भूकंप झाला. त्यानंतर ९ महिन्यांनी मोदींची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. तोपर्यंत भूकंपग्रस्तांचे हाल कुत्रं खात नव्हतं. ते न पाहवल्याने कच्छमध्ये तळ ठोकून सामान्य माणसांच्या दुःखात सहभागी होणारे; त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह जेवणारे, त्यांचे आश्रू पुसणारे मोदी या पुस्तकातून आपल्या समोर येतात तेव्हा रांगडी आणि पोलादी प्रतिमा उभी केलेल्या मोदींचे मन किती संवेदनशील आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो.
देशातल्या सर्वात मागास जिल्ह्यांत समावेश असलेल्या कच्छला नरेंद्र मोदींनी कशा प्रकार देशातील सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पोहचवले (यावर गेल्या वर्षी मी कच्छला भेट देऊन आल्यानंतर "जेव्हा कासव धावू लागते http://goo.gl/iBPQNd हा लेख लिहिला होता) याची कहाणीही रोचक आहे.
मोदींवर काय वाट्टेल ती टीका करणारे असंख्य लोकं आहेत आणि त्यात समाजातील अनेक मान्यवरांचाही समावेश आहे. दुसरीकडे "मोदींसाठी काय पण" असाही एक वर्ग आपल्याला इंटरनेट आणि सोशल मिडियावर हमखास भेटतो. त्यामुळे कुंपणावरच्या माणसांची स्थिती गोंधळल्यासारखी होते. मधु किश्वर यांनी स्वतः २००२ च्या दंगलींनंतर मोदींवर टीका करणारे अनेक लेख लिहिले होते.
२०१३ साली स्वतः केलेल्या अभ्यास दौऱ्यानंतर त्यांचे मनःपरिवर्तन झाले. या पुस्तकात अनेक लोकांच्या मुलाखती त्यांच्या शब्दात मांडल्या असल्याने काही गोष्टी आणि उल्लेख पुन्हा पुन्हा येतात. तेवढा भाग सोडला तर हे पुस्तक मनाचा ठाव घेते. या निवडणूकींत मतदान करण्यापूर्वी शक्य झाल्यास हे पुस्तक वाचा असं सुचवायला मला आवडेल.
http://www.amazon.in/Modi-Muslims-Media-Voices-Narendra/dp/8192935205
मोदी आणि मुसलमान : दुसरी बाजू
12 Apr 2014 - 12:02 pm | संजय क्षीरसागर
विषय बिजेपी मॅनिफेस्टोतल्या राममंदिराचा आहे. त्यामुळे तुम्ही वर दिलेला प्रदीर्घ प्रतिसाद गैरलागू आहे.
13 Apr 2014 - 12:00 am | विजुभाऊ
बीजेपी ला त्यांच्या ह्यातीत राममंदीर पुन्ह अबांधणे जमणार नाही.
मुळात त्यान अबाबरी मशीद पाडायचीच नव्हती. तो मुद्दा तसाच पेटवत ठेवायचा होता. तेथे जमलेल्या कारसेवकांवर नियन्त्रण ठेवता आले नाही म्हणून ती मशीद पडली. ( मी इथे मुद्दामच स्वयंसेवकानी असे म्हंटले आहे. कारण सोयीस्कररित्या त्यांचा संबन्ध कशाशीच नसतो)
भाजप हा जेवढा गोंधळलेला पक्ष आहे तितकाच त्याम्चा जाहीरनामासुद्धा
13 Apr 2014 - 12:47 am | आयुर्हित
संजय क्षीरसागरजी, उठा, उठा, जागे व्हा! आपली अवस्था तर संसदेत झोप काढणाऱ्या देवेगौडांसारखीच आहे.
झोपायच्या आधी आपला प्रश्न होता:
गौरतलब है कि मोदी को लेकर अंतररष्ट्रीय समुदाय का नजरिया बदला है और मोदी को सभी जगह स्वीकार किया जा रहा है. Washington Post मधे कुठेही नाहीत!
ह्या प्रश्नावर मी माझा प्रतिसाद देतो न देतो तेवढ्यात आपण झोपलात, अगदी खर्राटे मारायला लागलात.
आता आपल्याला जाग आली तर म्हणतात : विषय बिजेपी मॅनिफेस्टोतल्या राममंदिराचा आहे. त्यामुळे तुम्ही वर दिलेला प्रदीर्घ प्रतिसाद गैरलागू आहे.
काहीही म्हणा, आपल्या पक्षाप्रमाणे आपलीही Entertainment value अगदी overflow व्हायला लागली आहे हे नक्कीच.
13 Apr 2014 - 12:02 pm | संजय क्षीरसागर
कारण ते त्या संपादकाचं मत आहे, Wasington Post चं नाही.
तिथे म्हटलंय
याचा अर्थ मोदी जातीय दंगली सोडून (ते म्हणतायंत त्या) विकासाकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.
जफ़र सरेशवालांबद्दल तुम्ही जे लिहीलंय त्याला संपतनी व्यवस्थित प्रतिसाद दिलायं आणि त्या मागे काय अर्थकारण आहे त्याचा उलगडा केलायं पण तो बहुदा झोप शांत न लागल्यानं दृष्टीआड झालेला दिसतोयं.
14 Apr 2014 - 10:58 am | सुहास..
असं का म्हणु नये की निवडणुकांपुरता बदल आहे ते , आठवा ..
गोध्राकांड घडल्यावर " ती घटना केवळ प्रतिक्रिया होती " हे सर्वात आधी कोण म्हणाले होते ..
धन्यवाद !!
12 Apr 2014 - 1:15 pm | संपत
सरेशवाला ह्यांच्यावर मोदींना विरोध करण्याचे आणि समर्थन देण्याचे कारण आर्थिक असल्याचे आरोप झाले आहेत. हा पहा त्यांच्यावरील लेख.
सरेशवालांसोबत असलेल्या मौलाना मन्सुरी ह्यांनी ते नाकारले आहे.
मला खरे खोटे करायचे नाही पण ह्या प्रकरणाला दुसरी बाजूही असू शकते हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
गुजरातमध्ये अनेक छोट्या दंगली आणि बडोद्याची दंगल २००२ नंतर झाली आहे ज्यात ६ ते ८ माणसे मारली गेली.
12 Apr 2014 - 2:19 pm | संजय क्षीरसागर
जफ़र सरेशवालांबद्दल मी ही ऐकून होतो. पण त्याला आर्थिक अँगल असेल ही उघड गोष्ट लक्षात आली नव्हती. या लिंक्सबद्दल धन्यवाद!
11 Apr 2014 - 2:49 pm | नाखु
नेटाने आणि अभ्यासू प्रतिसाद "कसाब"सा वाच्ला आणि पाकिस्तानला आपण उगीच त्रास देतो हे पाहून हळवा झालो.
बोला भारत-पाक भाई भाई!!
भले भारतीयाचा जीव जाई !!!
12 Apr 2014 - 10:59 pm | पैसा
मला हिब्रु आणि तमिळ शिकायची आहे.
14 Apr 2014 - 12:13 am | कवितानागेश
मलापण. :)
13 Apr 2014 - 8:21 pm | आयुर्हित
अनिर्णयामुळेच महाराष्ट्राला दर वर्षी ४०० कोटी रुपयांचा फटका!
13 Apr 2014 - 8:28 pm | आयुर्हित
१२एप्रिल२०१४ रोजीचे मोदींचे पुण्यातील भाषणाची लिंक
http://www.youtube.com/watch?v=rKfl7VU9cxk&list=UU1NF71EwP41VdjAU1iXdLkw
13 Apr 2014 - 8:57 pm | NiluMP
निवडणूकी दरम्यान प्रत्येक पक्ष आपले जाहीरनामा, वचननामा वा वचकनामा सादर करतो पण जनतेतील कुणीही त्यांना हे विचारत नाही हे जे काही नामे जाहीर करता ते पुर्ण कसे करणार कोणत्या टप्प्यात पुर्ण करणार त्यासाठी काही ठोस धोरण त्यांच्याकडे आहे का आणि ते पुर्ण न केल्यास पुन्हा निवडणूक लढणार नाही एवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे का की पुन्हा यांनी कामे केली नाही म्हणून पुढच्या वेळी आपण दुस-या पक्षास निवडूण दयावे असा मटका आम्ही खेळत राहायचा.
निवडणूकी प्रचारा दरम्यान नेते ज्या जोमाने देश, राज्य पिंजून काढत आहे त्याच जोमाने जर सत्तेत आल्यावर एक वर्षभर त्यांनी देश आणि राज्य िपंजून काढले तर देश, राज्यातील ब-याच समस्या सुटतील पण अशा रितीने सर्व समस्या सोडवल्या तर पुढची निवडणूक कोणत्या मुदयावर लढवणार हे न कळेल ऐवढे नेते मुर्ख नाहीत मग मुर्ख कोण हे सुजाणास सांगणे न लागे.
14 Apr 2014 - 2:01 am | संजय क्षीरसागर
एकजण म्हणतायंत लिमीटमधे राहा. लिमीटमधे राहायला मी काय संघाच्या हातातला मोदी आहे?
संपतनी मस्त विश्लेषण केलंय, कुठून निवडणूक लढवणार (आणि तिथे हारतील म्हणून पुन्हा बडोद्यातून अर्ज भरलायं!) इथपासून ते मॅनिफेस्टोत राममंदिर असायलाच हवं इथपर्यंत मोदी लाचार आहेत.
आज तर मुरली मनोहर जोशींनी खरी परिस्थिती कथन करुन मोदींना पुन्हा त्यांची जागा दाखवून दिली! ते म्हणाले, हवा मोदींची नाही, बिजेपीची आहे! आणि पुढे तर जोडाच हाणला, म्हणाले गुजराथ मॉडेल सगळ्या राज्यात चालणार नाही!
आता काय राहिली मोदींची `विकास-पुरुष' प्रतिमा? जिथे पक्षाच्या मॅनिफेस्टो लिहीणार्यालाच तुमच्या प्लॅन्सवर विश्वास नाही तिथे तुम्ही काय घंटा प्लॅन राबवणार देशाच्या विकासाचे?
पण मोदी काय बोलणार? गप ऐकून घ्यावं लागतंय. त्यांना वाटत होतं २७२ (आता तर ३०० म्हणायला लागले होते) जागा ते `स्व-बळावर' निवडून आणणारेत (म्हणजे त्यांच्या `विकासाच्या' कल्पनेवर!) जरा लाईनीतनं हालले तर ते आणि अंबानी विथ अडानी, करत बसा गुजराथचा विकास! हो आणि जसोदाबेनचा भात खायचा राहून जाईल तो मात्र कायमचा!
तर असे हे घंटीचंद समर्थक (त्यांना आता नवं नांव हवंय) आणि त्यांचे सर्किटेश्वर दोस्त काय तर म्हणे राममंदिर बांधतांना मोदी देशाच्या अर्थकारणाला धक्का न लागू देता ते एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवतील!
यांना राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध वाटतोयं आणि कसली आलीये स्युडो स्टेट? इथे यांचीच `स्टेट' तपासायला झालीये (आणि त्यांना माझ्या मेंदूची पडलीये!)
14 Apr 2014 - 1:13 pm | प्यारे१
मुद्दा काय आपण बोलतो काय? रेटून बोलणं एवढंच शिकला का रे त्या केजरीवाल नि कुमार विश्वासकडून?
मंद म्हणून मंद व्यक्तीचा अपमान नको. असो!
जगातील सगळी अक्कल तुला एकट्यालाच बा संजया! नाही का?
तो अर्धवटराव काय बोलतोय ते नीट वाचलं का एकदा? ते नीट वाच नि नंतर बोल.
उताणं पडतंय धा वेळा तरी माझंच नाक वर म्हणे. अर्थात तुझ्याकडून दुसरी अपेक्षा नाहीच्च रे.
भाजपचा एक मतदार कट्टर हिंदुत्ववादी आहे नि रामजन्मभूमीच्या ठिकाणी राममंदिर असावं ही त्याची इच्छा आहे. भाजपनं राममंदिर हा मुद्दा आपल्या जाहिरनाम्यामध्ये ठेवला म्हणून काय बिघडतंय? प्राधान्यक्रम खालचा आहे, ठीक आहे.
राममंदिर मुद्दा ठेवला तर प्रतिगामी नि नाही ठेवला तर दुटप्पी असं का म्हणे?
माग च्या अटलजींच्या टर्मला कुठला विकास थांबला होता ते कळेल का? तेव्हा राममंदिराचा मुद्दा भाजपकडून होताच की. आज देखील भाजपनंच आपला जाहिरनामा दिलाय, एन डी ए नं नाही.
तुझ्या केजरीवालचा खोकला कसा आहे सध्या? :)
14 Apr 2014 - 1:21 pm | गब्रिएल
लईच भारी. संक्शिसाय्ब, तुमी आसच कायतरी बर्ळत र्हा. त्ये तुम्चे इरोदी लोकं तुमाला लैच इशेशण लाव्त्याय. पन तुमी ल्हानपनापास्न ग्रेट हात. तुमि म्हंता त्येनला कायला तरास द्येचा, आसच येडंबगाडं लिवून इरोदकांचा शबूद खर्रा कर्न्याची तुम्ची आयड्या आमाला कळ्ळी, बर्का.
तुमि बास आम्च आसच लय मणोरण्जण कर्त र्हा. त्येच्याबद्दल लईच धन्वाद (आमाला म्हाय्ती हाय तुमाला गप बस्ता येनार न्हाय आनि माम्चि आशि कर्मनुक चालू र्हाइलच).
लाजिकचा खातमा कर्नार्या 'आम'च्या 'संक्शि'प्त साय्बांचा लई म्हंजे लईच इजय असोsssssssssssssssssss
14 Apr 2014 - 6:28 pm | विटेकर
वास्तविक काहीही लिहिणार नव्हतो , हे तुमचे नेहमीचेच आहे , भलते तर्क / कुतर्क / वितर्क करुन अफाट विधाने आणि अशक्य आणि अगम्य भाषेत विषय भरकटवणे नवीन नाही! तेव्हा लिहिणार नव्हतोच , पण अति झाले , तुम्ही वारंवार राम मंदिराचा विषय काढला म्हणून लिहावे लागते !
राम आणि कृष्ण हे आम्हा भारतीयांचे राष्ट्रपुरुष आहेत , हो आहेत आणि राहतील. मर्यादापुरुषोत्तम श्रीराम हा आमचा आदर्श आहे , आमची अस्मिता आहे. तुमच्यासारख्या पुचाटांनां त्याची किंमत कळली नाही म्हणून शष्प देखील फरक पडत नाही !! मी जेव्हा भारतीय म्हणतो तेव्हा त्यात मुसलमान देखील आले. कारण ज्या बाबराने राममंदिराची मशीद बनविली , तो बाबर एत्त्देशीय मुस्लिमांसाठीही परकीयच होता!त्याने केवळ हिंदु धर्मावर आघात केला नाही तर आमच्या राष्ट्रीयत्वावर आघात केला. त्याला या देशाचा सांस्कृतिक कणा मोडायचा होता. एकदा लोकांची मने मरगळली की त्यांना काबूत ठेवणे आणि त्यावर राज्य करण हे सोपे होते म्हणून त्याने हा हल्ला केला आणि विध्वंस केला. शिवाय त्याच्या उपासना पद्दतीतच ते सांगितले होते. इंग्रजांनी त्याचीच री ओढली , मेक्याले शिक्षण्पद्धतीत तयार झालेली पुळ्चट माणसे ही तुमच्यासारखाच मूर्ख विचार करु लागली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही "मेली" मने पुन्हा जिवंत व्हावीत आणि या राष्ट्रात पुन्हा चैतन्य निर्माण व्हावे असा स्वाभाविक प्रयत्न होणे आवष्यक होते. तसा प्रयत्न सोरटी सोमनाथाच्या सरकारी जीर्णोद्धाराने झाला देखील! सुरुवात झाली होती पण कमअस्सल नेहरुंच्या कॉग्रेसी तुष्टीकरणाच्या धोरणामुळे ते इतरत्र घडले नाही हे आमचे दुर्दैव !
भारत एक बलवत्तर राष्ट्र म्हणून उभे करायचे असेल तर त्याच्या विजिगिषु सास्कृतिक वारसा पुन्हा जगासमोर मांडणे अत्यावशयक आहे. बाबरीचा ध्वंस ही एक अशीच असामान्य घटना होती , त्यातून समाज तावून सुलाखून निघाला. हिंदू समाजाने आपल्या नाकर्तेपणाची किंमत मोजली. हे होणे आवश्यकच होते.
हा सांस्कृतिक स्वाभिमान जागवला नाही तर मेल्या मनाचे माणसे अर्थिक विकास कसा करु शकतील ? "राष्ट्रप्रेम" हे राष्ट्र माझे आहे ही भावना जर जागृत झाली नाही तर समाजाच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने कर्तृत्वाचा र्हास होणारच ! याउलट अशी अस्मिता जेथे जिवंत होती तिथे देश राखेतून वरती आले ..( जर्मनी , जपान ,इस्त्रायल ) तसे झाले नाही , राष्ट्रियता हे तत्व मानले नाही तर माणसाची उमेद हरवते , माणसे यंत्रवत काम करतात आणि परिस्थिती शरण होऊन अगतिक होतात , असे देश भौतिक पातळीवर कितीही पुढारले तरी त्यांचे अस्तित्व फार काळ राहू शकत नाही हे सत्य आहे ( कम्यनिस्ट रशिया )
तेव्हा हा असला भंपक पणा सोडा आणि मोठे व्हा !
यदी राम नही है श्वासों में | तो जीवन का घट रीता है !
14 Apr 2014 - 6:39 pm | आजानुकर्ण
प्रतिसादातील मुद्द्यांची सुसंगती लागली नाही. सोरटी सोमनाथ उभारणीमुळे सांस्कृतिक स्वाभिमान जागवून भारताची नक्की काय प्रगती झाली आहे? गुजरातेतील 'प्रगती'साठी सोरटी सोमनाथ जबाबदार आहेत काय?
नेहरुंच्या कमअस्सल तुष्टीकरणाच्या धोरणामुळे मंदिरे वगैरे बांधण्याच्या भानगडीत न पडता शिक्षणसंस्था व भेलसारख्या कंपन्या उभारणीत सरकारने लक्ष घातल्यामुळे प्रगती झाली असे वाटते आहे.
15 Apr 2014 - 6:32 pm | असंका
सोरटी सोमनाथ उभारणीमुळे सांस्कृतिक स्वाभिमान जागवून भारताची नक्की काय प्रगती झाली आहे?
आपण खरेच असे मानता की "भारताची नक्की काय प्रगती झाली आहे" हे सांगता आले नाही, तर सोरटी सोमनाथ मंदिर उभारणी वाया गेली? आणि ते मंदिर कोणी उभारले तेही आपणास माहिती असावे. तिथे समोरच त्या व्यक्तीचा एक भव्य पुतळा उभा आहे. सरदार वल्लभभाई पटेल.
14 Apr 2014 - 10:08 pm | सुहास..
राम आणि कृष्ण हे आम्हा भारतीयांचे राष्ट्रपुरुष आहेत , हो आहेत आणि राहतील. मर्यादापुरुषोत्तम श्रीराम हा आमचा आदर्श आहे , आमची अस्मिता आहे. तुमच्यासारख्या पुचाटांनां त्याची किंमत कळली नाही म्हणून शष्प देखील फरक पडत नाही !! >>>
असा स्पष्टपणा ठेवावा राट्रीय अजेंडामध्ये ..म्हणजे शष्प दलीत आणि मुस्लीम मते मिळतील ........
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला ! मत्त हत्ती मारला !!
14 Apr 2014 - 2:48 pm | दिनेश सायगल
काही मंडळींच्या प्रतिक्रिया वाचून अजब वाटले. मोदींचा एवढा तिरस्कार आणि दुस्वास तर जसोदाबेन मोदी पण करत नाईत.
14 Apr 2014 - 5:23 pm | Dhananjay Borgaonkar
च्यामारी, मोदी विरोधकांच्याकडे काहीच मुद्दे नाहीत म्हणुन फक्त बिचारे एकाच मुद्द्यावर वाद घालत बसले आहेत.
आहे आमच्या अजेंड्यामधे राम मंदिर.कुणाच्या बापाचे काय गेले?नसेल मान्य नका देऊ मत.कोण विचारते तुम्हाला?
आपल्याला लै आनंद झाला राम मंदिराचा सुद्धा मुद्दा आहे.आहे ते रोख ठोख, उगा सहिश्णुतेचा आव आणुन नंतर मुसलमानांक्डे भिक मागण्या पेक्षा चांगलं नाही का?
ते येडं केजरी आता रेडीओवर बोंबलतय लाल बहाद्दुर शास्त्रींनी सुद्धा राजीनामा दिला, मी दिला तर बिघडलं कुठे.
असो, १६ मे ला कळेलच.
14 Apr 2014 - 6:14 pm | संपत
कडक प्रतिक्रिया. ह्याला म्हणतात खरा समर्थक. अहो पण तुम्ही आमच्याशी कशाला भांडताय? त्यांच्याशी भांडा न जे म्हणताहेत कि भाजपने राम मंदिर फक्त तुम्हा लोकांना उल्लू बनवण्यासाठी जाहीरनाम्यात टाकले आहे. सत्ता आली तरी ते काही राम मंदिर बांधणार वगैरे नाहीत...
14 Apr 2014 - 10:33 pm | विकास
एनडीटिव्हीच्या आज जाहीर झालेल्या आणि या निवडणुकीसाठीच्या शेवटच्या जनमत चाचणी नुसार भाजपाला २२६ तर भाजपसहीत एनडीए ला ३७५ जागा मिळणार आहेत. दिल्लीत भाजपाला ६, एके४९ ला १ जागा मिळणार आहे तर दिल्लीत काँग्रेसला (जाहीरनाम्यात नसूनही) "अरे रामा" असे म्हणावे लागणार आहे.
14 Apr 2014 - 10:41 pm | क्लिंटन
तुम्हाला एन.डी.ए ला २७५ जागा मिळणार असे म्हणायचे आहे असे गृहित धरतो. मी लाईव्ह जनमत चाचणी बघितली नव्हती.आता एन.डी.टी.व्ही च्या वेबसाईटवर बघत आहे.
असे प्रत्यक्षात झाले तर मात्र परमसंतोष होईल :) आआपला ती एक जागा मिळत आहे ती पण मिळाली नाही आणि पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही तर त्याहून मोठा परमसंतोष होईल :)
14 Apr 2014 - 10:53 pm | विकास
म्हणूनच आज एके४९ ने नवीन आक्रस्ताळेपणा सुरू केला आहे. म्हणे आधी नुसतीच शाई उडवली, कानाखाली वाजवले नंतर त्यांच्या (आआपा) विरोधात हिंसाचार होईल. त्यांनी एक स्पष्ट केले नाही की कदाचीत शेवटचा रिक्षावाला सोडल्यास बाकीचे आआपाचे होते. रीक्षावाला पण भाजापा अथवा काँग्रेसचा नव्हता. तरी एक बरे, मुख्यमंत्री असताना देखील रस्त्यावर झोपायची प्रॅक्टीस केली होती... ;)
जर ह्या चाचणीतले निष्कर्ष खरे असले तर मला उत्सुकता आहे की कितीजण आआपा मधे निकालानंतर राहतील.
15 Apr 2014 - 1:09 am | अर्धवटराव
काँग्रेसची स्थिती ओव्हरऑल सुधरली असावी एव्हाना. भाजपला बर्यापैकी सीट मिळतील, अगदी सुरुवातीच्या अंदाजांपेक्षा फार काहि फ्लचुएशन होणार नाहि. या संभाव्य विजयात आपल्याला काहि मिळावं म्हणुन जोशिंसारखे बुजुर्ग हातपाय मारत आहेत आता. पण त्यामुळे काहि विपरीत घडलं तर सगळं मुसळ केरात जाईल. आआप ला एखादा अनपेक्षीत विजय मिळेल असा कयास आहे. सुरुवातीला वाटलं कि नागपुरला काहि कि नागपुरला काहि चमत्कार घडेल. पण तो समज लवकरच दुर झाला...अंजली मॅडमचा काहि खास प्रभाव जाणवत नाहि. मग कदाचीत पाटकर बाई?? दिल्लीत जर आआपचं पानिपत झालं तर त्यांना पुनःश्च हरिओम् करायला लागणार. अल्टीमेटली झालाच फायदा तर तो सर्वात जास्त मोदि आणि राहुल गांधी या दोन व्यक्तींचा असेल.
14 Apr 2014 - 11:44 pm | संजय क्षीरसागर
मोदींना स्वतःला वाराणसीच्या सीटची खात्री नाही म्हणून त्यांनी बडोद्यातून दुसरा फॉर्म भरलायं. मुख्तार अन्सारी गुंड आहे त्यामुळे त्याच्याविषयी बोलण्यात अर्थ नाही पण त्यानं उमेदवारी मागे घेतल्यानं तिथे समिकरण बदललं आहे.
मोदींना पक्षांतर्गत विरोध वाढतोयं हे कालच्या मुरली मनोहर जोशींच्या वक्तव्यावरुन स्पष्ट आहे. एकतर ते जोशींची जागा बळकावून वाराणसीतून उभे आहेत (भले तो पक्षाचा निर्णय असेल पण) त्यामुळे जोशी आधीच खवळून आहेत. आडवानींना स्वतःचे गुरु आणि भारताचे भावी पंतप्रधान मानणार्या मोदींनी खुद्द आडवानींनाच हॉर्सपॉवर दाखवलीये त्यामुळे ते फक्त संधीची वाट बघतायंत. मोदींनी बिजेपीला फाट्यावर मारल्यागत `अबकी बार `मोदी' सरकार' अशी घोषणाबाजी लावून, जणू काही तेच देशाचे (आणि पक्षाचे) सर्वेसर्वा आहेत अशी नादानगी चालवली आहे. त्यांना बहुदा ही कल्पना नाही की प्रत्येक खासदार मनातल्या मनात पंतप्रधान व्ह्यायची (आणि आमदार सीएम व्ह्यायची) स्वप्नं पाहात असतो भले त्याची लायकी असो वा नसो. केवळ चान्स मिळेपर्यंत त्याला पक्षानं लादलेल्या नेतृत्वाची हांजीहांजी करणं क्रमप्राप्त असतं. पण मोदींना असा भ्रम झालायं की त्यांच्यामुळे बिजेपीची लाट आली आहे. वर (मिपाच्या) तोतया प्रेसिडेंटनी हीच गोष्ट वेगळ्या शब्दात मांडली आहे (मोदींनी पक्ष सोडला तर बिजेपीला कुत्रं विचारणार नाही!). थोडक्यात मोदींचा वरचष्मा पक्षात असंतोष जनक ठरतोयं. तस्मात मोदींना धोबीपछाड मारायला खुद्द त्यांचे गुरु आणि मुरलीभाई जोशी टपलेले दिसत असले तरी इतरांच्या मनातही तशीच भावना असणार कारण बाकीचे सगळे ओवर शॅडो झाले आहेत.
त्यात मोदींनी संजय बारूंच्या नुकत्याच आलेल्या पुस्तकावरून ('Accidential Prime Minister ) काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे PM ऑफिस, मोदी आणि तत्कालीन पंतप्रधानांच्या दरम्यान गुजराथ दंगलीनंतर झालेला पत्रव्यवहार (उर्वरित मतदान संपन्न होण्यापूर्वी) उघड करण्याच्या मागे आहे. ते टायमिंग जमलं तर मोदींची वाट लागणार हे निश्चित.
15 Apr 2014 - 12:27 am | आयुर्हित
संजय क्षीरसागर, एक म्हण नेहमी लक्षात ठेवत चला: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते!
15 Apr 2014 - 9:53 am | संजय क्षीरसागर
पण आता मुद्दाच नाही म्हटल्यावर चालायचंच.
15 Apr 2014 - 10:29 am | क्लिंटन
मी जे काही लिहिले आहे त्यावरून मोदींना आपल्यामुळे भाजपची लाट आली असे असा भ्रम झाला आहे असे मला म्हणायचे आहे असा तुमचा भ्रम झालेला दिसतो. मोदींनी पक्ष सोडला तर भाजपला कुत्रं विचारणार नाही याचाच अर्थ मला जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे भाजपची नाही असेच म्हणायचे आहे. मधल्या काळात भाजपचे जे पारंपारिक मतदार दुरावले होते ते मोदींमुळे परत आले आहेत असे आताचे चित्र आहे (हे पारंपारिक मतदार अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशींमुळे परत आले असतील असे तुम्हाला म्हणायचे आहे की नाही याची कल्पना नाही. पण तसे तुम्हाला म्हणायचे असल्यास तुमच्या कल्पनाशक्तीच्या उत्युंग झेपेबद्दल तुमचे कौतुकच करावेसे वाटेल). आणि ज्या मतदारांना भाजपविषयी फार आस्था नाही पण मोदी एक चांगले काम करणारे सरकार देऊ शकतील असा विश्वास वाटतो असे मतदारही युपीए-२ मध्ये चालू असलेल्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर मोदींमुळे भाजपकडे आकर्षित झाले आहेत. ते अडवाणी-मुरली मनोहर जोशींमुळे पक्षाकडे आकर्षित झाले असे तुम्हाला म्हणायचे असेल तर परत एकदा हार्दिक अभिनंदन.
मुरली मनोहर जोशींच्या नावावर लोक मते देतात? ऐकून आश्चर्य वाटले. खुद्द भाजपचे केडरसुध्दा मोदींनाच पाठिंबा देत आहेत. अडवाणींनी तीन वेळा थयथयाट केला तरी त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे सुध्दा केडरने दुर्लक्षच केले. अडवाणींच्या घरासमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने होतात यावरूनच अडवाणींची पकड किती ढिली झाली आहे हे लक्षात येईल. असो.
15 Apr 2014 - 12:19 pm | संजय क्षीरसागर
भाजपची नाही असेच म्हणायचे आहे.
तुम्हाला जे म्हणायचंय ते मला कळलंय पण माझं म्हणणं तुम्हाला कळत नाहीये!
मुरलीभाईंनी आज पल्टी मारलीये पण काल ते क्लिअर म्हणाले होते की लाट बिजेपीची आहे मोदींची नाही. पुढे मला काय म्हणायचंय याच्या तुम्हीच स्व-बळावर कल्पना लढवल्या आहेत. मला फक्त एकच म्हणायचंय की मोदींनी बिजेपीत एकाधिकारशाही आणलीये आणि त्यामुळे त्यांना पंक्षांतर्गत विरोध आहे कारण इतर दिग्गजांचे मनसुबेही असणारच. आणि प्रत्येकाला स्वतःची राजकीय कारकिर्द आहेच.
तुम्ही प्रचंड कल्पनाविलास केलायं, मुरलीभाईंच्या नांवावर लोक बिजेपीला मतं देतील असं मी कुठेही म्हटलेलं नाही. जोशी आणि अडवानी मोदींना केंव्हा धोबीपछाड मारतील याचा नेम नाही असं मी म्हटलंय कारण दोघंही दुखावलेत.
डॉ भालचंद्र मुणगेकरांचा आजच्या मटातला (पान १० वरचा) `खरा अजेंडा हिंदुत्त्व हाच!' या शीर्षकाचा लेख अत्यंत वाचनीय आहे. रास्व संघाच्या विचारप्रणालीखाली तयार झालेल्या मोदींची खरी प्रतिमा त्यांनी उघडी केलीये.
15 Apr 2014 - 12:55 pm | क्लिंटन
हू केअर्स? मुळात मुरली मनोहर जोशींना जनाधार कधीच नव्हता. पूर्वी अडवाणींना नक्कीच जनाधार होता पण आता त्यांची पकड खूप ढिली झाली आहे. त्यामुळे असले कोणी धोबीपछाड दिले तरी त्याचा फार परिणाम होणार नाही. कारण आज पक्षाला मते मिळत आहेत ती मोदींच्या नावावर. ती अडवाणी-मुरली मनोहर जोशींच्या नावावर नाही. त्यामुळे ही मंडळी कितीही दुखावली गेली असली तरी त्याचा फार परिणाम होणार नाही. जसवंतसिंगांप्रमाणे ते अलगद दूर होतील आणि आठवड्याभरानंतर लोक त्यांना विसरूनही जातील. आणि जर का त्यांना खरोखरच राजकीय महत्वाकांक्षा असतील तर फार तक्रार न करता मोदींबरोबरच राहण्यातच त्यांचे हित आहे हे त्यांना समजायला हवे. जसवंतसिंगांनी थयथयाट केला नसता तर त्यांना नंतर राज्यसभेत घेऊन एखादे चांगले मंत्रीपदही मोदींनी दिले असते ही शक्यता अगदी शून्य नाही.पण आता आपला जनाधार किती हे लक्षात न घेता थयथयाट केल्यामुळे गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं अशी त्यांची अवस्था झाली आहे.ते उदाहरणही समोरच आहे. यावरून अडवाणी-जोशींनी धडा घेतला तर ठिक.
15 Apr 2014 - 1:38 pm | संजय क्षीरसागर
मोदींना (तुमच्यासारखंच) वाटतंय की ते देशाचे एकमेव तारणहार आहेत. मुरलीभाई जर इतके (तुमच्या मते) कस्पटासमान आहेत तर पक्षानं त्यांच्यावर जाहिरनाम्यासारखी महत्त्वाची जवाबदारी सोपवलीच नसती आणि राममंदिराच्या मुद्यावर मोदींना माघार घ्यायला लागली नसती.
पक्षादेशामुळे मोदींना झक मारत वाराणसीतून फॉर्म भरायला लागला आणि मग तिथे निवडून येण्याची खात्री नसल्यानं पुन्हा बडोद्यातून फॉर्म भरला.
जेंव्हा तत्त्वापेक्षा व्यक्तीची सत्तालालसा मोठी होते तेंव्हा पक्षाची वाट लागायला लागते. सद्य परिस्थितीत बिजेपीला निर्णायक बहुमत मिळणार नाही हे उघड आहे. पण मोदींच्या या मनमानीमुळे जर दुखावलेले लोक पक्ष सोडून जायला लागले तर बिजेपी संपयला वेळ लागणार नाही. तुम्ही म्हणतायं `हु केअर्स?' पण लोकशाही म्हणजे मोदी करत असलेली मनमानी नाही.
15 Apr 2014 - 2:03 pm | क्लिंटन
मान्य.पण असे कोण लोक सोडून गेले तर पक्षाचे नुकसान होईल? ज्या नेत्यांना स्वतःचा बेस आणि जनाधार आहे असे नेते. उदाहरणार्थ शिवराजसिंग चौहान, वसुंधरा राजे इत्यादी. ज्यांना स्वतःचा फारसा जनाधार नाही आणि स्वतः निवडून यायलाही इतरांची मदत लागते अशी मंडळी सोडून गेली तरी पक्षावर त्याचा परिणाम होणार नाही.
कमाल आहे.मोदीच आमचे नेते पाहिजेत असा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मूड होता त्यामुळे राजनाथ सिंगांपुढे मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहिर करण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही.ती लोकशाही नाही आणि अडवाणी "मी पक्षाला पहिल्या दिवसापासून मोठा केले आहे त्यामुळे मी म्हणतो म्हणून मोदींना नेता करायचे नाही" असे एखाद्या टिपीकल भारतीय घरातील असुरक्षित सासूसारखे हटून बसले ती मोठी लोकशाही वाटतं?
म्हणजे मुरली मनोहर जोशींनी पक्षाची सगळी धोरणे बनविली असे म्हणायचे आहे का तुम्हाला? कमाल आहे. भाजपची दरवर्षी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते त्यात विविध ठराव (आर्थिक, राजकीय इत्यादी) पास केले जातात ते आणि अन्यवेळी पक्षाच्या व्यासपीठावरून विविध नेत्यांनी मांडलेले मुद्दे सोडून जाहिरनाम्यात नवे काय आहे? मुरली मनोहर जोशी ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी पक्षासाठी भरपूर काम केले आहे हे मान्य.पण या (किंवा अन्य कोणत्याही निवडणुकीसाठीच्या) जाहिरनाम्याचे काम एखाद्या नेत्याने केले याचा अर्थ पक्षाची सगळी धोरणे त्या व्यक्तीने बनविली असा नक्कीच होत नाही.त्यामुळे "जाहिरनाम्यासारखे महत्वाचे" काम हा मुद्दा मला तरी अजिबात मान्य नाही.
15 Apr 2014 - 3:00 pm | संजय क्षीरसागर
नेते (तुमच्या मते) बिजेपीत आहेत?
लोक जेंव्हा उमेदवाराला मत देतात तेंव्हा पक्षाला मत देतात असा सार्वत्रिक अनुभव आहे. अपवादात्मक स्थितीत उमेदवाराचं वैयक्तिक कर्तृत्त्व पाहिलं जातं (पण तिथे सुद्धा पक्ष सत्तेत आला नाही तर मत वाया गेलं अशीच जनधारणा आहे.)
बिजेपीची प्रतिमा इतक्या मोठ्याप्रमाणावर हिंदुत्त्ववादी कडून विकासवादी करण्याचा प्रयत्न करणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे पक्षाचा जाहीरनामा महत्त्वाचा होता. आणि तुम्ही म्हणतायं :"जाहिरनाम्यासारखे महत्वाचे" काम हा मुद्दा मला तरी अजिबात मान्य नाही.' शिवाय मोदींना तो (राममंदिरासकट) मान्य करायला लागला यातच मुरलीभाईंच्या वजनाची प्रचिती आहे.
मोदींना (त्यांच्या इच्छेविरुद्ध) वाराणसीतून अर्ज भरायला लावणं हा सुद्धा पक्षाचा वरचष्मा आहे आणि मुरलीभाईंची त्यासाठी किती मिन्नत करावी लागली हे जगजाहीर आहे.
तुम्हाला (मोदींसारखंच) वाटतंय की बिजेपी विदाऊट मोदी इज नथींग आणि परिस्थिती नेमकी उलटी आहे! मोदींना वाटतंय की आपण (स्व-बळावर!) २७२ जागा (आणि आता तर ३००!) मिळवून पंतप्रधान होणार (झालेच आहोत!). एकदा का त्यांचं हे स्वप्न भंगलं की बिजेपी आणि बाकीचे दिग्गज मोदींना फुल फाट्यावर मारणार!
15 Apr 2014 - 4:03 pm | संपत
मला वाटते अडवाणी जोशीना जनाधार आहे कि नाही यापेक्षा महत्वाचा मुद्दा त्यांचे संघातील स्थान आहे. अनेक निर्णय जे मोदीना त्रासाचे ठरतील आणि मोदींच्या मनाविरुद्ध होते ते संघाकडून त्यांनी मोदींना मान्य करायला लावले. अर्थात ह्यात त्यानाही तडजोड करावी लागलीच. अडवाणी ग्रुपची व्यूहरचना अशीच दिसतेय कि भाजपला यश मिळावे पण मर्यादित, जेणेकरून त्यांना सेक्युलर पक्षांची मदत लागेल आणि मोदींना उपपंतप्रधान पदावर समाधान मानावे लागेल जसे अडवानींना लागले. अडवाणीना असणारा इतर पक्षांचा विरोध कमी करण्यात त्यांना यश मिळाले तरी मतपेटीने साथ दिली नाही. पाहू ह्या वेळी कसे फासे पडताहेत.
15 Apr 2014 - 6:47 pm | अर्धवटराव
पक्षांतर्गत विरोधक त्यांना सुखासुखी सत्तेचा घास पचवु देणार नाहिच. जर मोदि केंद्रात स्थिर झाले तर इतके वर्ष दिल्ली गाजवणार्या पुढार्यांच्या पोटावर पाय पडेल ना. पण अशी पक्षांतर्गत स्पर्धा राजकारणात नवीन आहे काय? किंबहुना ते व्यवच्छेदक लक्षण आहे राजकारणाचं. भाजपमधे हि साठमारी उघड दिसते तर इतरत्र ति दबलेली असते. काँगेस पासुन तर अगदी आआप पर्यंत सगळीकडे हायकमांड नावाचा दट्ट्या चालतो. पक्षांतर्गत प्रवाह असतातच व ते एकमेकांना छेदतात देखील. जो बलिष्ठ व योग्य टायमींग साधणारा असतो तो पुढे जातो. तसच मोदिंचं देखील होणार. त्यांना पक्षांतर्गत स्पर्धेत हरवणारा कोणि भेटला तर मोदिंचा पत्ता देखील कट होणार. राहुल गांधिंविरुद्ध प्रियंकाला पुढे आणण्याचे क्षीण प्रयत्न काँग्रेसमधे झालेच. बीग डील... ??
15 Apr 2014 - 7:03 pm | संपत
मान्य. मुद्दा हा होता कि जनाधार / पक्षाधार नसला तरी संघामार्फत मोदींना झुकवता येते. अर्थात हे शस्त्र मोदिदेखील वापरत आहेत ह्यात शंका नाही.
15 Apr 2014 - 8:44 pm | आयुर्हित
संक्षी, (नासलेल्या)अकलेचे तारे तोडू नका! थोडी फार आपल्या राखून ठेवा,स्वत:साठी कामास येईल.
15 Apr 2014 - 9:26 pm | विकास
पक्षादेशामुळे मोदींना झक मारत वाराणसीतून फॉर्म भरायला लागला आणि मग तिथे निवडून येण्याची खात्री नसल्यानं पुन्हा बडोद्यातून फॉर्म भरला.
वॉव! तुम्हाला अंतस्थ बातम्या कळतात वाटतं! फक्त एकच प्रश्न पडला. जर पक्ष वाराणसीतून निवडणूक लढव असा आदेश देत असला तर मग त्याच पक्षाने वडोदर्यातून लढवू नको असा आदेश का दिला नाही? आणि मग जर पक्षाच्या आदेशाप्रमाणे हे झाले असले तर मग तुम्ही लगेच पुढच्या वाक्यात जी मोदींची मनमानी आहे म्हणतात ती कशी काय शक्य आहे? अर्थात तुम्ही म्हणता म्हणजे शक्य असेल कदाचीत...
पण लोकशाही म्हणजे मोदी करत असलेली मनमानी नाही.
पण मग, केवळ मिपावरचे आपल्यासारखे विचारवंतच नाही तर असे अजून भरपूर विचारवंत, राजकीय पक्ष सातत्याने विरोधात बोलत असताना, मोदी आणि भाजपाला गुजरातेत सातत्याने यश कसे मिळाले असेल? का निवडणूक घोटाळा होता असे म्हणायचे आहे?
अर्थात एक आहे, त्यांनी एस एम एस कौल घेऊन, "मी मुख्यमंत्री होऊ?" असे जनतेला विचारले नाही, इतका सगळा विरोध होत असताना, राज्यपालांनी काही वेळेस सहकार्य दिले नसताना, थयथयाट केला नाही, रस्त्यावर झोपले नाहीत की राजीनामा देऊन पळून गेले नाहीत. कदाचीत असे सगळे वागणे (थयथयाट्+पळून जाणे वगैरे) म्हणजे लोकशाही असावी कदाचीत, नाही का?
15 Apr 2014 - 10:21 pm | संजय क्षीरसागर
बडोद्यातून निवडणूक लढवणं ही मोदींसाठी अपरिहार्यता आहे आणि ते पक्षानं सांगितलं की त्यांनी ठरवलं दुय्य्यम आहे. एक गोष्ट मात्र नक्की वाराणसीतून निवडून येण्याची त्यांना आणि पक्षाला दोघांनाही खात्री नाही. हा मुद्दा चवथीतल्या विद्यार्थ्याला देखिल मान्य होईल.
मोदी मनमानी करतायंत आणि बिजेपी म्हणजे (फक्त) मोदी असं समीकरण झालंय हे कळायला `अबकी बार मोदी सरकार' किंवा `हम मोदीजीको लानेवाले है' या घोषणा ऐकायची सुद्धा गरज नाही. रोजचं वर्तमानपत्र वाचलं तरी ते लक्षात येण्यासारखं आहे.
तुम्हाला मुद्दा कळत नसावा हे पटत नाही पण विषय गुजराथमधे निवडून येणयाचा नाही, सध्या दिसणार्या भाजपाच्या चेहर्याचा आहे इतपत कळायला अडचण नसावी.
15 Apr 2014 - 10:25 pm | विकास
तरी पण तुमच्या प्रतिसादात पहील्या वाक्यात पक्षाचा आदेश मोदींच्या डोक्यावर आणि नंतरच्या वाक्यात पक्षाच्या संदर्भात मोदींची मनमानी... काही जमत नाही असे वाटते हो! बघा जरा विचार करून!
15 Apr 2014 - 10:33 pm | विकास
औरंगजेबाला आजारी आहे म्हणत फसवणे अथवा त्या आधी अफझलखानाकडे जाताना चिलखत-वाघनखे वगैरे घालून जाण्यात शिवाजीची पण अपरीहार्यताच होती. अर्थात येथे मी शिवाजीच्या पंगतीत मोदींना बसवत नसून जेंव्हा त्याकाळातले सशस्त्र अथवा आत्ताच्या काळातले लोकशाहीतले मतदानाच्या मार्गाने युद्ध असते, तेंव्हा ते लढणारा जिंकण्यासाठीच लढत असतो आणि तसे जर लढायचे असेल तर त्याला ज्याकाही (आत्ताच्या काळात) घटनात्मक आडाखे करावे लागतात ते करायला तयार असतो. केजरीवालना केवळ स्वतः उत्तर भारतीय आहेत म्हणून उत्तर प्रदेशातून लढण्याचा धोका पत्करत आहेत. आणि हो, धोकाच आहे कारण ते स्वतः (एके४९) जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे... पण त्यांची वडोदर्यातून लढण्याची हिंमत झाली नाही कारण तेथे ते (एके४९) फक्त हरणारच नाहीत तर डिपॉझीट देखील जप्त होईल याची भिती आहे. थोडक्यात उरलेसुरले ब्रम्हचर्य वाचवण्यासाठी वडोदरा नको रे बाबा, असे म्हणले असणार!
15 Apr 2014 - 11:19 pm | संजय क्षीरसागर
केजरीवालांनी नाही. केजरीवाल हरण्याचा धोका पत्करत होते ते जिंकण्याची शक्यता फारच कमी होती तर मोदींना घाबरायचं कारण काय? तुम्ही केजरीवालांच्या कथित प्रश्नोत्तरांची लिंक द्याल तर खरी परिस्थिती (ते नक्की काय म्हणाले) पडताळून पाहता येईल.
आणि हो, पुन्हा कसलाही संबंध कुठेही जोडला आहे. लढणारा जिंकण्यासाठीच लढतो हे उघड आहे पण शिवाजीनं चिलखत घालणं आणि मोदींनी दुसरा फॉर्म भरणं यांचा मेळ घालणं म्हणजे शिवाजीला औरंगजेबाची भीती वाटत होती असा निर्बुद्ध युक्तीवाद करणं आहे.
15 Apr 2014 - 1:55 pm | गब्रिएल
ब्ररोब्र हाय तुमचं संक्षीसाय्ब !
तुमाला कोणल्ला काय म्हनाय्च ते अदुगर्पासून्च म्हाय्त हाय. ती लोकं काय म्हन्न्नार तेच्या अदुगरच संक्षीबाबान्ला म्हय्त अस्तया. आता ह्ये त्या गावंडळ मान्साना नाय कळ्त ना. सोडुन द्या साय्ब, तेन्ला कळ्त न्हाय ते काय म्हन्तात ते. (हाय की नाय यकदम इतिहासीक डायलाक?)
(पन तुमी काय म्हंता ते कोनालाच काय तुमालाबी कळ्त न्हाय त्येचं काय? ही ही ही...
15 Apr 2014 - 2:01 pm | सुहास..
ई-सकाळ मध्ये आंध्रात १५ फुटी कोब्रा सापडल्याच्या बातमीवर ही खालील प्रतिक्रिया होती, आहे अजुन ............हास्यास्पद !!
sac - मंगळवार, 15 एप्रिल 2014 - 01:13 PM IST
......किंग कोब्राचा एकच फुत्कार ......अब कि बार मोदी सरकार...
15 Apr 2014 - 4:22 pm | संपत
:))
15 Apr 2014 - 10:12 pm | विकास
आयबीएनवर गुगल हँगआऊट मध्ये एकाने केजरीवालना प्रश्न विचारला की तुम्हाला जर असे म्हणायचे असले की मोदींची लाट नाही आणि मी मोदींना हरवणार तर मग वाराणसीप्रमाणे तुम्ही वडोदर्यातून देखील त्यांच्या विरोधात का उभे राहीला नाहीत? त्यांचे तोंड बघण्यासारखे आहे का माहीत नाही पण तरी तसे ते झाले. मग ते म्हणाले, की मला माहीतच नव्हते की ते वडोदर्यातून देखील निवडणूक लढवणार म्हणून! म्हणजे जणू काही मोदींनी वडोदर्यातून निवडणूक लढवणार हे अगदी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या मिनिटालाच जणू काही सांगितले!
15 Apr 2014 - 10:28 pm | संजय क्षीरसागर
इतका भक्कम पक्ष पाठीशी असून देखिल पराभवाच्या भीतीनं मोदींनी बडोद्याहून फॉर्म भरलायं इतपत समज नसेल तर कठीण आहे. केजरीवालांनी त्यांना सरळ आव्हान दिलं होतं पण मोदी सत्ताव्याकूळ आहेत. मोदींच्या प्रत्येक फॉर्ममागे केजरीवालांनी फॉर्म भरावा ही अपेक्षा अत्यंत बालीश मनसिकता दर्शवते.
15 Apr 2014 - 10:37 pm | विकास
अहो ती अपेक्षा मी देखील केली नाही अथवा मोदी पण करत नसतील. एके४९ कुठे कातडं पांघरून डरकाळ्या फोडण्याची अॅक्टींग करू शकतील याच्या मर्यादा माहीत आहेत. पण तुम्ही जे उत्तर दिले, "मोदींच्या प्रत्येक फॉर्ममागे केजरीवालांनी फॉर्म भरावा ही अपेक्षा अत्यंत बालीश मनसिकता दर्शवते", असे स्पष्ट उत्तर न देता, "मला माहीतच नव्हते..." असले उत्तर देणे बालीश नाही का? उद्या हा माणूस चुकून जरी पंतप्रधान झाला तर म्हणायला मोकळा, मला माहीतच नव्हते की चीनचे / पाकीस्तानचे सैन्य आपल्या सीमांच्या आत घुसत होते म्हणून. थोडक्यात कसला बालीश आहे हा माणूस असे नाही वाटत? का याला सगळे ऐकणारे बालीश वाटतात?
15 Apr 2014 - 10:47 pm | आयुर्हित
संक्षी, यालाच म्हणतात: चोराच्या उलट्या बोंबा!
आता किती उर बडवणार हो, काही मर्यादा? जिभेला काही हाड?
अजून काय वाईट बोलायचे ते बोलून घ्या एकदाचे. सुखाचा मोक्ष मिळेल आपल्याला व आपल्या पक्ष नेत्यांनाही!
15 Apr 2014 - 11:23 pm | संजय क्षीरसागर
शांत व्हा, तुम्हाला विषय झेपत नाहीये.
15 Apr 2014 - 1:19 pm | लोटीया_पठाण
मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ?? हे जर सांगाल का ??
आपडे मत मिळवण्यासाठी मुस्लिमांच्या वळचणीला जातंय खरे… पण कधी ते लोक तुमच्या पेकाटात लाथ घालतील सांगता येत नाही.
15 Apr 2014 - 1:49 pm | संजय क्षीरसागर
तो एक अत्यंत सेंसिटीव इश्यू होऊन देशात पुन्हा धार्मिक दंगली उसळतील.
एकतर अल्ला ही जशी कल्पना आहे तशीच राम सुद्धा कल्पनाच (फार तर कथा) आहे. धर्म मग तो कोणताही असो व्यक्तिगत हवा. भारतासारख्या सर्व धर्मीय देशात राष्ट्रीय एकसंधत्त्वासाठी राजकारण निधर्मी आणि इश्यू बेस्डच व्हायला हवं. काँग्रेस मुस्लीमांचा आणि बिजेपी हिंदुंचा अनुनय करतायंत. आपण सारे भारतीय एक आहोत, भले कुणीही कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो ही भावना सर्वोच्च असायला हवी. त्यातच देशाच हित आणि प्रगतीची संभावना आहे.
15 Apr 2014 - 4:27 pm | संपत
+१
15 Apr 2014 - 4:49 pm | मोहन
कालच स्टार माझावर गडकरींनी ह्यावर मुलाखतीत स्प्ष्टीकरण दिले. राममंदिर बांधण्याचे तीन पर्याय सांगितले.
१. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची वाट पाहणे
२. लोकसभेत पुरेसे संख्याबळ जमल्यास कायदा करून
३. मुस्लीम समाजाशी सामोपचाराने वाटाघाटी करून.
मला तरी ह्यात काही गैर वाटत नाही.
ह्या उलट धार्मिक दंगली वगैरेची भाषा धमकावू वाटते.
15 Apr 2014 - 5:01 pm | संपत
हे तुम्हाला गैर वाटत नाही?