मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी चर्चा मालिका: भाग १- भाग २
१) कार्टोग्राफर
मान्यताप्राप्त नकाशांतज्ञच्या बाबतीत म्हणजे कार्टोग्राफरच्या बाबतीत खरेतर अनुपस्थित मराठी म्हणण्या पेक्षा आंतरजालावर अनुपस्थित भारतीय म्हणणे या धाग्याकरता अधिक उचीत ठरते. शासकीय यंत्रणे कडून जे काही (चुभूदेघे) कॉपीराईट नकाशे आंतरजालावर आहेत ते टेक्नीकली कॉपीराईटेड आहेत. मान्यताप्राप्त तज्ञ नसलेल्या इतरांनी बनवलेले नकाशे अचूकतेचा विश्वास देऊ शकत नाहीत. केवळ भारताच्या उत्तरेतील सीमाच नाही तर दक्षीणेतील राज्यांच्या समुद्री सीमा दाखवण्यात सुद्धा चूक होणे खरेतर अभिप्रेत नसावे. मान्यताप्राप्त नकाशांतज्ञच्या (कार्टोग्राफर) च्या आंतरजालावरील नावांमध्ये मला मराठी नावे कधी आढळली नाहीत. काही अमराठी नकाशांतज्ञचे इमेल पत्ते कसे बसे शोधून साहाय्य विनंतीची इमेल्स पाठवण्याचाही एखाद प्रयत्नही केल्याचे आठवते पण कधी रिस्पॉन्स आला नाही. उद्देश या बाबतीत शासन अथवा नकाशातज्ञांवर टिका करण्यापेक्षा त्यांचा सहभागाच्या गरजेचा आहे असे वाटते.
२) कॉपीराईट कायदेतज्ञांचा अभाव
कॉपीराईट बाबत सर्वसामान्य जनतेत अनभिज्ञता आणि उदासिनता आहेच. एकतर बहुतांश चर्चात कॉपीराईट कशाला लागत नाही ते नमके सांगण्यापेक्षा कशाला लागतो या बद्दल अधिक चर्चा होते. एक सर्व सामान्य म्हणून मला एखादी गोष्ट (अर्थातच मोफत) वापरायची आहे ती वापरू की नको हे सांगणार्या मराठी वकीलांच्या सरळ मार्गदर्शनाचीच गरज असते खरे म्हणजे सोनाराने कान टोचल्या शिवाय लोकही विषय गांभीर्याने घेत नाहीत. दुसरा भाग काही बाबतीत अॅडव्हान्स क्वेरीजही असू शकतात. वकील मंडळी आम्ही मोफत का कराव म्हणू शकतातच पण विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्यास हरकत नसावी.
फेसबुकवरील मराठी वकील मंडळींना; विधी महाविद्यालयातील प्राचार्यांना आवाहन/संपर्क करून पाहीला अद्याप तरी यश आलेले नाही.
धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद
प्रतिक्रिया
5 Apr 2014 - 4:28 pm | आत्मशून्य
मी मनोरंजनक्षेत्रामधे स्वतःचे एक प्रोडक्ट जागतीक पातळीवर लाँच करत आहे. योगायोगाने त्याचे नाव ब्रिटनमधील मनोरंजन उद्योगातील एका दुसर्या प्रकारातील प्रोडक्टला (ज्या प्रकारात माझे प्रॉडक्ट मोडत नाही) आधीच वापरले गेल्याचे मला व्हिसी कडून निदर्शनास आणुन दिले गेले. आम्ही आमच्या वकिलासोबत याबाबत चर्चा करत आहोतच परंतु कतर बहुतांश चर्चात कॉपीराईट कशाला लागत नाही यावर लोकांची मते जाणून घ्यायला आवडेल.
5 Apr 2014 - 6:09 pm | कंजूस
तुम्हाला हा प्रश्न का पडला ? केवळ चर्चा तीसुध्दा या क्षेत्राशी संबंधित नसलेल्या माझ्यासारख्यांनी करून काहीच उजेड पडणार नाही .आत्मशुन्य यांना प्रत्यक्ष अनुभव आहे .असे कितीजण लिहितील ही शंकाच आहे .
6 Apr 2014 - 5:23 am | माहितगार
कंजूसजी, समस्या आहेत त्या सर्वांनाच आहेत जाणीव कमी जणांना असणे हा सजगतेचा प्रश्न झाला. चटके बसत नाहीत तो पर्यंत दाह कमी असतो गांभीर्य कमी असते. कायद्यांच्या बाबतीत चटके बसण्याची प्रक्रीया क्वचीत आधी सांगूनही होते पण बर्याचदा न सांगताही होते. अद्याप चटका बसला नाही काळजी का करावी ह्या करता मराठीतली म्हण 'सुपातले हसतात, जात्यातले ...' लागू पडते.
मिपावर प्रश्न आत्ता का मांडतो आहे?, या मालिकेत कदाचित जरा उशीराने मांडला असता, श्रीकांत मोघे आणि सुधीर मोघे या बंधूद्वयांमध्ये नेमके मोठे कोण हा मराठी विकिपीडियावर चर्चेला आलेला साधा प्रश्न इकडे विचारण्या करता घेणार होतो त्यांच्या पैकी एकाचे कॉपीराइट साशंकीत असलेले छायाचित्र मराठी विकिपीडियावर कुणीतरी चढवले आहे, विकिपीडियावर लिहिणारे बर्याचदा शैक्षणिक उपयोगी येईल म्हणून लिहितात त्यांचा कॉपीराईट कायद्याच्या फेअर युज या तत्वाखाली आपल्याला माफ होईल असा सर्वसाधारण समज असतो पण कॉपीराइट कायद्याच माझ जिथपर्यंत ज्ञान आहे फेअर यूज हे तत्व इतर मराठी संकेतस्थळांप्रमाणेच मराठी विकिपीडियास सुद्धा लागू होत नाही असा माझा कयास आहे. या संबंधाने खात्री करून हवी आहे. मराठी विकिपीडियावर
वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे येथे या बद्दल अधिक उहापोह केला आहे. हे झाल धागा काढण्याच तात्कालीक निमीत्त.
मराठी संकेतस्थळांवर आणि मराठी विकिपीडियावर बरेच जण मराठी भाषेच्या प्रेमातून काही काम करत असतात, त्यांना अनभिज्ञतेच्या गर्तेत गाठीला एक पैशाच उत्पन्न न मिळता 'खाया पिया कुठनही गिलास फोडा बारा आना' असा प्रसंग येऊ नये या करता जरासा यत्न.
कॉलेजात प्रत्यक्ष प्राचार्यांशी संपर्क करून, फेसबुक माध्यमातून संपर्क करून न होणारी गोष्ट मिपा वर धागा काढल्याने होईला का ? आपली शंका रास्तच आहे. कुणाला रस्ता सापडत नसेल तेव्हा आपण इतर चार चौघांना विचारण्याचा प्रयास करून पाहतो. समस्या जिथे आहे तेथील लोकांना जाणीव असण्याची अधिक शक्यता असू शकते. या धागा मालिकेला अपेक्षीत प्रमाणात रिस्पॉन्स नाही पण धागा काही पळून जात नाही. प्रश्न पुर्वी गांभीर्याने घेतला गेला नाही तर नंतर घेणारच नाहीत असे नाही आपण सकारात्मक होप धरून चालायचे एवढेच.
माझ्या प्रतिसादाच्या लांबी बद्दल क्षमस्व. आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.