मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव
मिपा नोड क्र. 28707 अन्वये समीरसूर यांचा मंदिर काढा.. एका प्रस्तावावर चर्चा चालू आहे. धार्मीकस्थानांच्या मर्यादांबद्दल त्या चर्चेत उमटणार्या सूरांपेक्षा माझा सूर काही निराळा असतो असे नाही. पण त्याचवेळी चुकत माकत का असेना भारतीय मंदिरांनी स्थानिक संस्कृतींच्या वैवीध्यपूर्ण जोपासनेत मोलाचा हातभार लावला आहे. अर्थात भारतात नवीन मंदिरे बनवण्यात फारसे काही नवीन साधेल असे नाही.