मलई!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
5 Sep 2014 - 5:00 pm

.........................आत्मूज जिल्बी भांडार.........................
जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =))
(*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्‍या एका मित्राच्या ग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..)

सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे. हा विक्रेता नवेपणात असताना ग्राहकाला खरोखर हिताचा सल्ला देऊन विक्री करायला जात असतो.पण काहि ग्राहक..ही अशी एक अजब चीज असतात,की त्यांना तोंडांनी सत्य हा शब्द उच्चारायचा असतो,आणि व्यवहारात सर्व असत्य स्वतःच्या पदरी पाडून घेऊन पवित्र व्हायचं असतं. आमच्या मते अश्या ग्राहकांना जे हवं असतं , ते सत्य/असत्य नसून फक्त त्यांना-हवं..तेच असतं! मग एरवी ते काहिही का असेना?
व्यावसाइकाला/विक्रेत्याला हीच गिर्‍हाइकं , अर्थशास्त्राचा एक वेगळा आयाम शिकवत असतात. आणि मग मूळचा कोणी कित्तीही का प्रामाणिक असेना,त्याला ह्या ग्राहकांसाठी..त्यांच्यापुरतं का होइ ना, दंभाची शाल अंगावर पांघरून हुबं र्‍हावं लागतं..थोडक्यात आपण खानावळ चालवत असू,तर अश्या ग्राहकांच्या दृष्टीनी आपण अन्नदानाचं पवित्र कार्य करत आहोत,असा (त्यांचा) लाडका ग्रह (ते जेवेपर्यंत!) मनाशी घट्ट बाळगावा लागतो. कारण अश्या ग्राहकांना,आपण अन्नविक्रेते आहोत हे पटतच नसतं.(म्हणूनच तर ते "अन्नदान" असा पवित्र शब्द वापरतात.) त्यांच्या मते आपण अन्नविक्रेते नसून,फक्त अन्न बनवायची मजुरी(त्यांना वाटते ती! :-/ ) घेतली पाहिजे... शेवटी अश्यांकडूनंही मजुरीचं मोल त्यांच्याच पवित्र भाषेत बोलूनच वसूल करावं लागत असतं. असो!

आता तांब्यात अजुन पिठ न भरत बसता..तो जड जाहलेला आहे तोवरच ही जिल्बी तळायला घेतो...कशी लागली जरूर सांगा. :)
===========

मलई!

आधी धंदा असतो चिवडा
नंतर त्याची होते भेळ
तेंव्हा मिळायची करवंटी
आता....मलई खायची वेळ!

सुरवातीचे दिवस ते
गिर्‍हाईकांची..हां जी! हां जी!
नंतर केवळ जीं..हां! जीं..हां!
"कोणती देऊ भाजी..ताजी!???"

दोन काळ..एक बदल
कोणता खरा म्हणायचा खेळ!?
कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे
हिलाच म्हणावं लागतं भेळ!

विक्रेत्याला सत्य नेहमी
अर्ध(च) सांगायला शिकवतात ग्राहक.
त्याला हवं- ते..दिलं!
तरच तुंम्ही सेवा वाहक!

अर्थशास्त्राचा शास्त्रीय अर्थ
मनःस्थितीला असतो धरून.
पिंप तेच-भाव वेगळा!
हवा द्या..अगर,पाणी भरून!

चला.....लै प्रवचन दिलं
जातो आता सरळ सरळ...!
परत थोडी मलाई खायचीये
वाट बघतोय-पुढचा नारळ! =))
https://lh4.googleusercontent.com/-rzEbHMMMBzs/VAmcdjFq1jI/AAAAAAAAGWs/AFCWHT-a9ng/w531-h581-no/my%2Bfone%2B302.jpg
===========
अत्रुप्त

काहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीभयानकसंस्कृतीकवितासमाजमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Sep 2014 - 5:06 pm | प्रचेतस

=))

अत्ता मी पयला =))

पैसा's picture

5 Sep 2014 - 5:31 pm | पैसा

कुरकुरीत जिल्बी! कवितेच्या नावात मलई वाचून आशेने धावत आले होते, साय आणि वहिनी वगैरे कवितेचा सीक्वेल आहे का काय म्हणून!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2014 - 5:37 pm | अत्रुप्त आत्मा

@ साय आणि वहिनी वगैरे कवितेचा सीक्वेल आहे का काय म्हणून!>>> =)) हा लिल्या मंजे ना! =))

साय आणि मलईचे कॉपीराईट घेतलंनीतशे दिसतात दोन्ही भावांनी मिळून !!

सस्नेह's picture

5 Sep 2014 - 10:34 pm | सस्नेह

अगदी ताक आणि भान्ड्यासहित.

प्यारे१'s picture

5 Sep 2014 - 10:41 pm | प्यारे१

मलई, साय, ताक,
काही शब्द मिस्सींग का आहेत बरे?

दूध, साय/मलई, विरजण, दही, ताक, भांडं, लोणी, तूप, बेरी असा क्रम हवा ना?

जेपी's picture

5 Sep 2014 - 5:53 pm | जेपी

आधी ताक आन भांड,
नंतर साय,
आता मलई.

दुदु राहिल की.
=))

दुदु आहेच की. फक्त त्यानंतर अगोबा येतो ;)

दु.दु. अगोबा =))

कवितानागेश's picture

5 Sep 2014 - 7:48 pm | कवितानागेश

=))

सूड's picture

5 Sep 2014 - 8:15 pm | सूड

=))))

विवेकपटाईत's picture

5 Sep 2014 - 8:12 pm | विवेकपटाईत

कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे
हिलाच म्हणावं लागतं भेळ!
मजा आली, तसं फोटूतिल मलाई जास्त आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2014 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

पहिला प्रति साद! ;-)
धन्यवाद हो पटाईत काका! :)

खटपट्या's picture

5 Sep 2014 - 10:59 pm | खटपट्या

खूप आर्थपूर्ण, सामाजिक, व्यावसायिक कविथा हाये ही,
अही अही अही

बॅटमॅन's picture

6 Sep 2014 - 1:50 am | बॅटमॅन

ही आमची कविथा...
आमचा हिच्यावर फार जीव?

कविथा प्रेमी इ.इ.इ.

खटपट्या's picture

6 Sep 2014 - 2:28 am | खटपट्या

:)

श्रीरंग_जोशी's picture

5 Sep 2014 - 11:18 pm | श्रीरंग_जोशी

वा वा वा, फारच खुसखुशीत, चुरमुरीत व लज्जतदार कविता. खूप आवडली.

तसा मी कविता वाचणे टाळतो पण अ.आ. यांची कविता नक्की वाचतो.

सुहास झेले's picture

5 Sep 2014 - 11:35 pm | सुहास झेले

लैच :)

रेवती's picture

5 Sep 2014 - 11:48 pm | रेवती

कायच कळ्ळं नै की ओ!

वल्लीला विचारा, तो बुवांच्या कवितांचा फ्यान आहे. त्याला समजलं असेल. त्याच्यादृष्टीने ग्रेसनंतर गूढ आणि गहन काव्य करणारे म्हणजे अत्रुप्त'जी आत्माच'जी..;)

मुक्त विहारि's picture

6 Sep 2014 - 12:14 am | मुक्त विहारि

आजकाल , भेळेत चुरमुरे जास्त अन फरसाण कमी, ही गोष्ट लक्षांत आणून दिल्याबद्दल बुवांना एक अम्रुततुल्य लागू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2014 - 12:52 am | डॉ सुहास म्हात्रे

"काव्यरस:" मध्ये भूछत्री असूनही कवितेत आणि फटूत मलईचाच बोलबाला असल्याने भूछत्रीने जोर्दार णिषेध कळवायला सांगितला आहे ! =))

जेपी's picture

6 Sep 2014 - 7:08 am | जेपी

अगोबा sss दुदुबाsss ...
अगोबा sss दुदुबा sss...
काढतो कळ...
वल्लिदा आत्मुचा करतो छळ...
..
..हायला आमलाबी जमायल की हळुहळु

स्पंदना's picture

6 Sep 2014 - 4:24 pm | स्पंदना

फक्कड कविता आत्मुस.
हिला जिल्बी म्हणनं मला तरी नाही जमणार.
मस्त लिहिलयं तुम्ही

पोटे's picture

8 Sep 2014 - 11:36 am | पोटे

:(

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Sep 2014 - 2:59 pm | माम्लेदारचा पन्खा

वाट बघतोय नारळवाला....