संस्कृती
गावाकडचा मराठी भाषा गौरव दिन २०१३.
शुक्रवार दि. २२-०२-२०१३ रोजी संध्याकाळी पांचसाडेपांच वाजतां माझा भ्रमणध्वनी वाजला. मालवण नगरवाचनालयातून ग्रंथपाल शिंदेसाहेब.
“नमस्कार! शिंदे बोलतोय, नगरवाचन मंदिरातून.”
“नमस्कार! बोला साहेब, कशी काय आठवण केलीत?”
पुढल्या आठवड्यात मराठी भाषा गौरव दिन आहे. २७ तारखेला. त्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे जरूर या. फोटो काढा, अहवाल बनवा.”
“हो, नक्की! किती वाजता आहे?
“सकाळी दहा वाजता.”
“हरकत नाही, येईन. आणि काय विशेष?”
“हेच विशेष. बाकी काही नाही, नंतर बोलूच, नमस्कार!”
“नमस्कार.”
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.
मस्त पतंग उडवा, तीळ्गूळ वाटा.
बोला गणपती बाप्पा मोरया.
आणि फटाके उडावताना काळजी घ्या.
.
धुळवड साजरी करा, रंग खेळा, पण पाण्यानं नको फार; ऑर्गॅनिकच बरे.
आणि तुमचा केक कापून झाला की मस्त भांगेची कॉकटेल घेउन पडले रहा मस्त मी सध्या पडलोय तसा.
.
दिवाळीतील होळीच्या पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा . :)
.
बोला कॉकटेलच्या बैलालाsssss
(एका sms वरुन साभार, पण समयोचित वाटलं.)
--मनोबा
आणखी एक टायटॅनिक-2
वाड्यातील भांडणे-भाग १
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी ) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन ;)
चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥
मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'
बर्याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते. त्याची नव्याने मांडणी करते.
पण त्यापूर्वी...
या नाटकातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाची भाषा.
सध्या मराठीमधे ग्रामीणच्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी काहीच्या बाही मारलं जातंय.
ग्रामीण चित्रपटात शहरी कलाकार 'ग्रामीण'च्या नावाखाली चित्रविचित्र हेल काढून बोलत राहतात .
सगळी सोंगं आणता येतात पण भाषेचं सोंग नाही आणता येत त्यामुळे जी भाषा आपली नाही
ती बोलायच्या फंदात पडा कशाला ?
व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.
प्रेम - भक्ती
प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टीत नेहमीच गल्लत केली जाते. या दोन गोष्टी नेहमीच भिन्न मानल्या गेल्या आहेत. पण गोष्टी भिन्न असल्या म्हणजे त्यांमध्ये नातं, संदर्भ यांचा अभाव असतो असं नाही. प्रेम आणि भक्ती या अशाच गोष्टी आहेत, की ज्या भिन्न असूनही संबंधित आहेत.
संतांनी केलेली भक्ती ही आदर्श भक्ती मानली जाते. याचं कारण की ती भक्तीच्या हद्दीबाहेरची भक्ती होती. परम भक्ती होती. ती भक्ती प्रेमरूप भक्ती होती. मीरेने केलेलं प्रेम हे आदर्श प्रेम मानलं जातं. मीरेचं प्रेम हे अत्युच्च प्रतीचं प्रेम होतं. निर्मळतेचा कळस गाठलेलं प्रेम होतं. मीरेचं प्रेम हे भक्तीरूप प्रेम होतं.
करंट मस्त...दत्त दत्त...!!!
शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार.
वर्तुळ-कोन सिद्धांत
"