संस्कृती

"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
18 Jul 2013 - 1:26 am

डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
https://lh5.googleusercontent.com/-tkEOgsr5S-M/UOmt3DVjXiI/AAAAAAAAV9U/7WHZmVxHVx8/w702-h468-no/IMG_3695.JPG
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?

संस्कृतीकविता

वारी आणि मी...

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
17 Jul 2013 - 11:37 am

महाराष्ट्रात जन्माला येऊन आषाढीची वारी माहित नसणारा माणूस विरळाच. त्यातही मराठी माणसाला, विशेषत: माझ्यासारख्या सोलापूरकडे आजोळ असणा-या माणसाला वारीबद्दल आकर्षण नसणं म्हणजे सच्च्या क्रिकेटप्रेमीला सचिनची खेळी लाईव्ह पाहण्याबद्दल आकर्षण नसण्याइतकंच अशक्य. लहानपणी दोन तीनदा गावी वारी पाहिली, तेव्हापासूनच तिचा एक भाग होण्याची इच्छा मनात घर करून होती. ४ वर्षांपूर्वी या इच्छेला मूर्त स्वरूप मिळालं. कॉलेजमधल्या एका मित्राने वारीतल्या वैद्यकीय शिबीराला स्वयंसेवक म्हणून येण्याबद्दल विचारलं, आणि तेव्हापासून दरवर्षी वारीला जाण्यास सुरूवात झाली.

संस्कृतीविचार

सासर-पण-माहेर

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
16 Jul 2013 - 12:37 pm

आहे ग आई मी सुखी समाधानी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

पितॄतुल्य सासरे माझे मातृतुल्य सासू
येतील ग कसे माझ्या डोळ्यांमध्ये आसूं
प्रेमळ पती मला जपे फुलावाणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

नणंद माझी बहिणीसारखी भावासम दीर
आठवेल कसे आता मला ग माहेर
जाऊबाईची ती तिंगी आहे फार गुणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

बाहेरची कामे मला नाही ग सांगत
स्वंयपाकपाणी करते मी घरात्ल्याघरात
जीव लावतात मला सर्व मुलीवाणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

संस्कृतीकविता

माया ही पात्तळ-१"बेशर्त स्वीकृती"

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 Jul 2013 - 2:13 am

ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,,
पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे. तिचा बाकिच्यांनीही आस्वाद घ्यावा..असे मी सांगतो.

कॉकटेल रेसिपीहास्यसंस्कृतीधर्मविडंबनमौजमजा

दिंड्या, पताका..

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
12 Jul 2013 - 12:01 pm

आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो.

खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं...

संस्कृतीसमाजप्रकटनविचार

यांना कसलेही कौतुक

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in काथ्याकूट
24 Jun 2013 - 3:26 pm

या पुणेकरांचे काही सांगता येत नाही. ते कशाचेही कौतुक करतील. भले ती गोष्ट ताजमहालाएवढी मोठी नसेना का. या कौतुकात शनिवारवाडा, लालमहाल असलाच पाहिजे असे नाही. किंबहुना खरा पुणेकर शनिवारवाडा आतून पाहातच नाही. शनिवारवाडा ही पुण्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी मुद्दाम भेट देवून पाहण्याची गोष्ट आहे अशी पुणेकरांची पक्की धारणा आहे.

चारधामच्या निमित्ताने

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
23 Jun 2013 - 12:23 pm

चारधाम यात्रा करावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या भयानक आपत्तीमुळे चारधाम, विशेषतः केदारनाथ गाजते आहे. पण या लेखाचा विषय तो नाही. मी जेंव्हा चारधामांना भेट दिली त्याचे सचित्र प्रवासवर्णन करण्याचाही या लेखाचा हेतू नाही. तर एकंदरीतच, जे अनुभव आले त्यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, याविषयी हा लेख आहे.

संस्कृतीमुक्तकसमाजप्रवासप्रकटनअनुभव

(जंगलातला) आजोबा !!

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
16 Jun 2013 - 12:43 am

'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'!

आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे.

आजोबाला बघा आणि अनुभवा !

मांडणीवावरसंस्कृतीसमाजजीवनमानप्रवासचित्रपटप्रकटनविचारसमीक्षालेखअनुभव