गावाकडचा मराठी भाषा गौरव दिन २०१३.

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
25 Mar 2013 - 7:47 pm

शुक्रवार दि. २२-०२-२०१३ रोजी संध्याकाळी पांचसाडेपांच वाजतां माझा भ्रमणध्वनी वाजला. मालवण नगरवाचनालयातून ग्रंथपाल शिंदेसाहेब.
“नमस्कार! शिंदे बोलतोय, नगरवाचन मंदिरातून.”
“नमस्कार! बोला साहेब, कशी काय आठवण केलीत?”
पुढल्या आठवड्यात मराठी भाषा गौरव दिन आहे. २७ तारखेला. त्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे जरूर या. फोटो काढा, अहवाल बनवा.”
“हो, नक्की! किती वाजता आहे?
“सकाळी दहा वाजता.”
“हरकत नाही, येईन. आणि काय विशेष?”
“हेच विशेष. बाकी काही नाही, नंतर बोलूच, नमस्कार!”
“नमस्कार.”

आमचे कांदळगांवचे स्नेही श्री. शरद कदम यांना कळवले. ठरल्याप्रमाणे मी आणि श्री. शरद कदम गेलो. मुळात या ग्रंथालयातले वातावरण छान आहे. नगरवाचन मंदीर हे नाव तसे सार्थच आहे. मंदिराची शुचिता आणि प्रसन्नता या वास्तूतच जाणवते. डाव्या बाजूला मध्यभागी सरस्वती आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमा मांडल्या होत्या.

सरस्वती आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमा

बाजूला तबकात हार ठेवलेले होते

तबकातले हार

पुस्तके छान मांडली होती.

मांडलेली पुस्तके

मांडलेली पुस्तके

मांडलेली पुस्तके

मांडलेली पुस्तके

मांडलेली पुस्तके

प्रसन्नतेत भर पडली. सध्याच्या समाजातल्या इतर सोहळ्यात आणि या सोहळ्यात एक मोठा फरक होता. कर्णकटु संगीताचा पार्श्वगोंगाट पार अनुपस्थित. त्यामुळे बकालपणा आला नाही आणि बरे वाटले. समारंभाचे मान्यवर उद्घाटक उपाध्यक्ष दादासाहेब ऊर्फ उदय मोरे अकराला येणार होते. शिंदेसाहेबांशी जरा गप्पा मारत बसलो.

शरद कदम नाट्यप्रेमी. शिंदेसाहेबही नाट्यप्रेमी. काही वेळाने आणखी एक नाट्यप्रेमी श्री. प्रकाश कुशे देखील गप्पाष्टकात सामील झाले. मला नाटकात फारसा रस नाही. पण खूप रंजक माहिती मिळाली. मामा वरेरकर मालवणचे. त्यांचे मालवणातले घर देखील अजून आहे. म. वा. धोंड पण मालवणचेच. साठसत्तरच्या दशकातल्या नाट्यभारल्या काळात मालवणला अनेक नाटके झाली. त्या स्मृतीरंजनात तिघेही रमले. १९६९ साली मी मे महिन्यात मालवणला गेलो होतो. तेव्हा मी देखील नाट्यसंपदाचे अश्रूंची झाली फुले पाहिले होते. त्या रम्य स्मृतींना माझ्या मनांतच उजाळा मिळाला. प्रभाकर पणशीकर, काशिनाथ घाणेकर आणि चित्तरंजन कोल्हटकर यांच्या भूमिका अजूनही माझ्या स्मरणात आहेत.

नंतर चर्चा छबिलदासवर आणि पीडीए वर वळली. छबिलदासची नाटके मात्र मी बरीच पाहिली आहेत. आतां माझी कळी खुलली. म. वा. धोंडांवरून माधव मनोहर इत्यादींच्या आठवणी निघाल्या. दादरच्या अमर हिंद मंडळातल्या वसंत व्याख्यानमालेत धोंडांची विद्वत्ताप्रचुर, अभिनिवेशपूर्ण, जिवंत व्याख्याने नेहमीच असत. दुटांगी धोतर आणि गडद रंगाचा कोट घातलेले माधव मनोहर ओठात न पेटवलेली सिगरेट ठेवून शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर तशाच प्रकारच्या वेषातल्या त्यांच्या मित्रांच्या कोंडाळ्यात बसलेले असत ते आठवले. डोळ्यांसमोरून असा स्मृतीपट सरकत असतांनाच उद्घाटक आले. दीप प्रज्वलन करून आणि सरस्वतीच्या प्रतिमेला आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ग्रंथप्रदर्शनाचे औपचारिक उदघाटन केले.

दीप प्रज्वलन करतांना मा. दादासाहेब मोरे

दीप प्रज्वलन करतांना श्री. प्रकाश कुशे

एक वाचक महिला

एक वाचक महिला

ग्रंथसेविका दीप्ती

ग्रंथसेविका श्रीमती मसूरकर

ग्रंथपाल श्री. शिंदे

मा. दादासाहेब मोरे

पुष्पहार अर्पण करतांना मा. दादासाहेब मोरे

मा. दादासाहेब मोरे

क्षणचित्रे

क्षणचित्रे

मग उपस्थितांचे मान्यवरांसोबत चहापान झाले आणि एक साधासुधा, कोणताही बडेजाव, भपका नसलेला पण शिस्तबद्ध, नीटनेटका, सुसंस्कृत असा आनंददायी सोहळा संपन्न झाला.

घरी निघालो. वाटेवर डावीकडे साने गुरुजी वाचनालय होते. शरदराव म्हणाले तिथे काय आहे पाहूयात. मला एका महत्त्वाच्या कामामुळे परतायची घाई होती. म्हटले धावती भेट देऊयात कां? चालेल म्हणाले. गेलो. तिथे पण अतिशय साधेपणाने पण नीटनेटके ग्रंथप्रदर्शन मांडले होते. त्यांच्या अनुमतीने काढली प्रकाशचित्रे.

साने गुरुजी वाचन मंदीर

साने गुरुजी वाचन मंदीर

साने गुरुजी वाचन मंदीर

आता वेध लागले होते आमच्या गावीं, कांदळगांवांत भरलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे. पण महत्त्वाच्या कामामुळे तिथे दुपारनंतरच जाणे होणार. मी दिवसभर महत्त्वाच्या कामांत गुंतलेला. शरदरावांना विनंती केली की तीननंतर ग्रंथप्रदर्शन चालू असेल तर मला दूरध्वनी करा.

तीनसव्वातीनला भ्रमणध्वनीने पांचजन्य केला. शरदराव होते. ग्रंथप्रदर्शन सुरू आहे म्हणाले. दुचाकीला कळ दाबून प्रेरणा दिली आणि निघालो. हल्ली लाथ न मारता सुरू होणार्याप दुचाक्या आहेत हे बरेच आहे. गेलो.

आश्चर्याचा गोड धक्का बसला. जुन्या पडघाईला आलेल्या इमारतीला ग्रंथप्रेमींच्या उत्साहाने आनंदमेळा भरला होता. इथेही कर्णकटु संगीताचा उपद्रव नव्हता. आबालवृद्ध, सर्व वयोगटातील स्त्रीपुरुष, सर्व ग्रंथप्रेमींनी उपस्थिती नोंदवली होती. मसुर्‍यासारख्या आठदहा किमी. दूरवरच्या गावातून देखील ग्रंथप्रेमी आले होते. मी इवल्याशा गावातल्या या ग्रंथालयाचा अभ्यागत होतो ८४ क्रमांकाचा. कांदळगांवकरांचा विजय असो. माझ्या उत्साहाचा वारू आता वेगाने दौडायला लागला. प्रतिमाग्राहक सरसावून उगारला आणि सव्यसाची धनुर्धराच्या आवेशात सटासट कळ दाबत सुटलो.

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

उत्साहाने भारलेले ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. पारकर
उत्साहाने भारलेले ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. पारकर

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव
मागे उभ्या डावीकडून पहिल्या आहेत ग्रंथपाल सौ. पारकर तर सर्वात उजवीकडे आहेत उत्साहाने उपस्थित राहिलेले ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. पारकर आणि त्यांच्या शेजारी उभे आहेत श्री. शरद कदम.

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव
सर्वात डावीकडे आहेत ग्रंथसेवक श्री. महेश साळकर. एवढ्या तुटपुंज्या जागेत मांडणी उठावदार केली होती.

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

बहोत बेइन्साफी
बाहेरच्या रणरणत्या उन्हामुळे शरद कदम यांना मुखपृष्ठावरचे शहाळे आवडले असेल कां? ऊन खरे पण शहाळे मात्र चित्रातले! बहोत बेइन्साफी है. अन्याय! अन्याय!! अन्याय!!! अन्यायाचा निषेध असो.!

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

वाघिणीचे दूध

वाघिणीचे दूधही होते

रामेश्वर सार्वजनिक वाचनालय, कांदळगांव

ग्रंथप्रेमींच्या उत्साहाला दाद देतच प्रसन्नचित्ताने बाहेर पडलो.

- X - X - X -

संस्कृती

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

25 Mar 2013 - 7:54 pm | बॅटमॅन

उत्साह मस्त आहे बॉ मालवणकरांचा. हे प्रकर्ण आवडल्या गेले आहे एकदम :) पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा!

मालवणच्या नाथ पै सेवांगणाचे उपक्रम नेहेमी विधायक असतात. आमच्याकडून शुभेच्छा!

आतिवास's picture

25 Mar 2013 - 10:13 pm | आतिवास

उपक्रम चांगला वाटला. पुस्तकांच्या विषयांत चांगलं वैविध्य दिसतं आहे. विशेषतः बालसाहित्य आणि वैज्ञानिक पुस्तकंही दिसताहेत - ते पाहून बरं वाटलं. प्रदर्शनाच्या जोडीने अन्य काही उपक्रम/कार्यक्रम झाले का हे मात्र कळलं नाही - उदाहरणार्थ: आवडलेल्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करुन देणं - अशा प्रकारचे कार्यक्रम.
माहितीबद्दल आभार.

सुधीर कांदळकर's picture

26 Mar 2013 - 7:37 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2013 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रंथप्रेमींचा उत्साह आणि तितक्याच उत्साहानं लिहिलेला नीटनेटका वृत्तांतही आवडला.
कांदळगांवकरांचं आणि कांदळकरांचं कौतुकच आहे.

-दिलीप बिरुटे

कलंत्री's picture

26 Mar 2013 - 8:31 pm | कलंत्री

सर्वच वृतांत प्रेरणादायक वाटला. पुढच्या वर्षी छोट्याश्या प्रमाणात साजरा करावा असे मनात धाटत आहे.

शिल्पा ब's picture

26 Mar 2013 - 9:40 pm | शिल्पा ब

आवडलं.

सुधीर कांदळकर's picture

27 Mar 2013 - 8:33 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद.

प्यारे१'s picture

27 Mar 2013 - 9:40 pm | प्यारे१

सुंदर उपक्रम.

नाना चेंगट's picture

27 Mar 2013 - 11:20 pm | नाना चेंगट

उत्तम !!

सुधीर कांदळकर's picture

28 Mar 2013 - 6:21 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद.