मुका मार अनवरत झेलुनी
काव्यतडागी जलपर्णीसम
प्रतिभा पसरत असते
पाहू न शकतो रवी, सकल ते
कवीस दावुनी जाते
कवी लेखणी सरसावून मग
मांडी ठोकुनी बसतो
इथे मोडुनी तिथे जोडुनी
कविता पाडुनी जातो
पामर रसिकांच्या तोंडावर
कविता मग आदळते
मुका मार अनवरत झेलुनी
इथे तिथे हुळहुळते
काव्यदेवते- एक विनंती
ऐक जरा रसिकांचे
काव्यप्रपाती बुडवू नको गे
आवर कढ प्रतिभेचे