ठोकत राहा
घडत जाईन
बोलत राहा
ऐकत जाईन
येऊन दे मनातले बाहेर सारे
कल्पनेला अनाहूत बळ मिळेल
शब्दपंखानी उडत जाईन
पोहोचेन सत्वर कवींच्या गावा
सुंदर कविता लिहीत जाईन
रांगतोय सध्यातरी असं वाटतेय
हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन
प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन
ठोकत राहा असेच
हळूहळू घडत जाईन
शोधत राहा स्वतःमध्ये मला
इथेच पुढे असेन तुमच्यासमोर
जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन
बनायचंय थंडगार बर्फ़ावानी
माया करा मजवर आपुल्या लेकरावानी
कल्पनेच्या जगात रमतो मी
गाठेन मना " उन्मनी "
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
प्रतिक्रिया
2 May 2018 - 3:13 pm | राजेंद्र मेहेंदळे
शीर्षकावरुन कायतरी चावटपणा असेल असे वाटले होते :) असो .
2 May 2018 - 4:05 pm | खिलजि
अहो हे उत्सुफुर्तपणे आलेले आहे . वाटलं, असं झालं कि आपण काहीतरी नक्कीच बनू पुढे . आणि काही चावट अतरंगी कविता असेल तर मी तुम्हाला नक्कीच व्यनि करेन . चालेल काय आपल्याला ? बादवे , धन्यवाद वाचन केल्याबद्दल .
सिद्धेश्वर विलास पाटणकर