(साहेब असेच) ठोकत राहा

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
2 May 2018 - 1:20 pm

ठोकत राहा

घडत जाईन

बोलत राहा

ऐकत जाईन

येऊन दे मनातले बाहेर सारे

कल्पनेला अनाहूत बळ मिळेल

शब्दपंखानी उडत जाईन

पोहोचेन सत्वर कवींच्या गावा

सुंदर कविता लिहीत जाईन

रांगतोय सध्यातरी असं वाटतेय

हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन

प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन

ठोकत राहा असेच

हळूहळू घडत जाईन

शोधत राहा स्वतःमध्ये मला

इथेच पुढे असेन तुमच्यासमोर

जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन

बनायचंय थंडगार बर्फ़ावानी

माया करा मजवर आपुल्या लेकरावानी

कल्पनेच्या जगात रमतो मी

गाठेन मना " उन्मनी "

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

अविश्वसनीयइशाराकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताधोरणमांडणीमुक्तकसमाजजीवनमानआईस्क्रीमऔषधी पाककृतीऔषधोपचाररेखाटन

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 May 2018 - 3:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

शीर्षकावरुन कायतरी चावटपणा असेल असे वाटले होते :) असो .

अहो हे उत्सुफुर्तपणे आलेले आहे . वाटलं, असं झालं कि आपण काहीतरी नक्कीच बनू पुढे . आणि काही चावट अतरंगी कविता असेल तर मी तुम्हाला नक्कीच व्यनि करेन . चालेल काय आपल्याला ? बादवे , धन्यवाद वाचन केल्याबद्दल .

सिद्धेश्वर विलास पाटणकर