मुका मार अनवरत झेलुनी

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 May 2018 - 6:54 pm

काव्यतडागी जलपर्णीसम
प्रतिभा पसरत असते
पाहू न शकतो रवी, सकल ते
कवीस दावुनी जाते

कवी लेखणी सरसावून मग
मांडी ठोकुनी बसतो
इथे मोडुनी तिथे जोडुनी
कविता पाडुनी जातो

पामर रसिकांच्या तोंडावर
कविता मग आदळते
मुका मार अनवरत झेलुनी
इथे तिथे हुळहुळते

काव्यदेवते- एक विनंती
ऐक जरा रसिकांचे
काव्यप्रपाती बुडवू नको गे
आवर कढ प्रतिभेचे

कविताइशारा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

5 May 2018 - 7:43 pm | प्राची अश्विनी

छान.:)

अनन्त्_यात्री's picture

6 May 2018 - 6:28 am | अनन्त्_यात्री

धन्यवाद!
बघतो, काव्यदेवतेस केलेली विनंती ती मनावर घेते की नाही ते!

श्वेता२४'s picture

7 May 2018 - 12:52 pm | श्वेता२४

मिपावरच्या कोणा कवीस उद्देशून ही कविता केलीत की काय. बाकी कविता मस्त जमलीय

अनन्त्_यात्री's picture

7 May 2018 - 3:28 pm | अनन्त्_यात्री

हे स्वगत समजा.
प्रतिसादाबद्दल आभार.