तृप्ती
कंच हिरव्या ओल्या गाली
मधुमती फुलांचा बहर फुलवि
मोहक धरती आर्जवि हसती
घननिळा बरस..मी एक प्यासी
क्षितिजावर मग तो ही झुकला
शामल देहि कवळुनि तिजला
चुंबुन म्हणे त्या गौरीला
तुज ओटी माझा अंकुर रुजला
नव यौवना ती धरा बहरली
अंग अंग कांतिही भरली
पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी
नव जन्माने तृप्त जाहली