पांढरा दिवस
बशीतून चहा पिताना फार बरे वाटते
हातात घेतलेल्या कपाला मग बाजूला ठेवावे लागते
नाष्ट्याला पोहे असल्यास तोंडाला पाणी सुटते
चटणीवर दही घेऊन मग लोणचं खाऊ वाटते
बुट घालून झाल्यावर गाडीला किक बसते
कितीही हॉर्न वाजवला तरी एखादी कार मध्येच घुसते
दिवस डोक्यावर येतो सुर्यनारायणाची भट्टी तापते
वेगळ्या अँगल मधून पाहिल्यास दुपारची काशी होते
घरी आल्यावर मला माझी कविता म्हणते
मालक बशी फुटली, तसं कपातून चहा पितानाही फार बरे वाटते