गरिबाला विचार
प्रत्येकाला वाटतं , संघर्ष म्हणजे माझंच जीवन
मान-अपमानाने जळतं , ते फक्त माझंच मन
कष्टाची भाकर काय ती फक्त मीच कमावतो
आणि कमावलेला पैसाही मीच फक्त गमावतो
निदान दोन वेळचं जेवण तुला मिळतं
गरिबाला विचार , भुकेविन पोट कसं जळतं ?
दुःखाचा डोंगर सतत माझ्याच पाठीवर असतो
तरी सुद्धा दोन क्षण मी कसा हसतो
देव नेहमी संकटे माझ्याच पदरात टाकतो
काही न देता , नुसतं माझ्याकडूनच मागतो
हे असं वाटत असेल , तर गरिबाला विचार सुखाचं घर कसं मोडतं ?
नुसते डोळेच नाही , तर त्यासोबत मन कसं रडतं ?