मी अधीर
मी बधीर
मी रूधिर
सबंध विश्वाचे
मी स्तन्य
मी चैतन्य
चिवचिवाट अनन्य
घरट्यातल्या चिमण्यांचा
मी नागीन
मी जोगीण
मी वाघीण
जगातल्या क्रांतीयूद्धाची
मी स्वच्छंद
मी अनिर्बंध
मी मुक्तगंध
अपत्य निसर्गाचे
मी मोहिनी
मी रोहिणी
वंश वाहिनी
प्रचंड जगपसार्याची
मी सौदर्य
मी माधूर्य
मी चातूर्य
घराचे घरपण
मी जगत
मी अप्रगत
मी स्वगत
आतापर्यंतच्या आकांताचे
मी पूष्पवेली
मी मूरगळली
मी रडवेली
कन्या मानव्याची
मी पंख फैलवावे
मी बंध सैलवावे
मी दीप पेटवावे
वंशाचे बापाच्या
मी चिंब व्हावे
मी वार्यात न्हावे
मी घूंगट झूगारावे
कारण मी अनंत
कारण मी स्वतंत्र
क्रांतीचा महामंत्र
आत्मशोध (काव्यसंग्रह)