जगण शिकतोय मी आता.......!
जगण शिकतोय मी आता जुनी कात टाकून,
अंकुरापरी मातीतून पुन्हा उगवून
काही नवीन तारा जोडून
जगण्याची नवीन धून बनवून,
जुन्याच शब्दांना जराशी
वेगळी चाल देवून, जगण शिकतोय मी आता….
सुखानं सुखाशी थोड गुणून
दुखांना दुखाशी घेतलं भागून,
बाकी काही उरेल ना उरेल
आयुष्याच गणित पाहतोय पुन्हा सोडवून, जगण शिकतोय मी आता….
स्वप्नांना जरा पुन्हा जाग करून
तुटलेल्या वाटां सांकवाना जोडून,
निशब्द नात्यांना हळुवारपणे
पुन्हा पुन्हा हसवून, जगण शिकतोय मी आता….