गुजरान
गुजरान
माझी होईल कशी गुजरान,कंठाशी आला प्राण
कोण देईल आम्हाला दान,वणव्यात अडकल रान
डोक्यावर कसले भार,कोणी देईना जीवा आधार
फक्त उरल्या घटका चार,लांबला प्रवास फार
चार घासांचे हे दुखणे,पोटात तिडिक उठणे
काट्यावर सदैव निजणे,अश्रुंनी रातभर भिजणे
धीर करुनी पसरीला हात,केविलवाणे बोल तोंडात
लाज सुटली होती आघात,भीक मागतो माणसात
कटोऱ्यात पडती नाणे,मुखात देवाजीचे गाणे
असे जीवन लाजिरवाणे,श्वानापरी काय राहाणे
पोटाला मिळे भाकर,साऱ्या जगाचा मी चाकर
झोप नसते रात्रभर,श्वास माझे तुमचे आभार