डॉलर

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
23 Jan 2016 - 11:37 pm

ईच्छा माझी ,लिहावे नवे शब्द
न वाचलेले ,लिहावे नवे काव्य
मनाला उसवनाऱ्या ,लिहाव्या नव्या पंक्ती
न भासणाऱ्या नको ,त्याच त्या व्यक्ती

शिकवले मला ,जेव्हा होईल मी मोठा ,
दुख: माझी होतील लहान
पण आज मला भीती ,लोकांची ,समाजाची
कोण महान अन कोण लहान ?

वाटते पुन्हा ह्यावे लहान ,
झोपताना ऐकावी आईची अंगाई ,
कधीकधी जातो मी जुन्या दिवसात
जिथं असते झोपेबरोबर रजाई

वाटत पुन्हा ,जावं भावाबरोबर ,
एकसारखी,एकारंगाची ,कपडे घालून
भटकावं गावभर , चिंचा बोऱ
अन वाऱ्यावर भिरभिरणारा पतंग

बनवावे किल्ले अन जहाज
तेव्हा ह्यायचे होत मोठ लवकर
अन आज मी मलाच म्हणतो ,
ऊठ…कमवायचेत तुला खूप सारे 'डॉलर'

(sorry for typing mistakes)

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

मीटर बरोबर बसलं नाही!

मीटर बरोबर बसलं नाही!