तेच ते

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
20 Jan 2016 - 4:36 pm

मागे सीट हे विडंबन लिहिले होते. रुढार्थाने हे विडंबन असले तरी विडंबन म्हणावे तसे नाही. आपण सुडंबन म्हणू या. ही कविता पण त्याच प्रकारातली. आयुष्याच्या उतार वयात एकटे पडलेल्या आजोबांचे दुःख.

(माझे आवडते कवी विंदा करंदीकर आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.)

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
वाढलेला रक्तदाब
सतावणारा संधीवात
त्याच मुंजी तीच लग्ने
तीच पोथी तेच पुराणे
सकाळपासून रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

उपचारही बदलून पाहिले
कारण वय बदलने शक्य नव्हते
डॉक्टरपेक्षा वैद्य जहाल,
पथ्थानेच हाल बेहाल
नकोत भजे, नको मसाला,
अन शिवू नको त्या मटनाला,
तीच ती शेपूची भाजी,
तेच ते कडू काढे
तीच गणिते तेच पाढे

आयुष्याच्या उतारावर स्वास्थाची मुक्ताफळे
चांदण्यात विहार अन संतुलित आहार
रात्र थोडी आणि सोंगे फार
टिव्हीवरच्या माकडचेष्टा;
खोटे प्रेम मूर्ख विनोद
कसली कथा कुठला बोध
त्याचा त्रागा तिचा रंग,
सारेच कसे बेढंग
एकटेपणाचे सारे भोग
अध्यात्माचे नुसते सोंग
तेच ‘मेल’ तीच ‘चॅट’
तेच डोळे तीच वाट
तेच ‘व्हॉट्स’ तेच ‘अॅप’
तेच ‘मेसेज’ अन तेच ‘स्नॅप’
तिच पावले तिच आस
सारे फक्त आभास

लिहिन म्हटले शोकांतिका
नटसम्राटाची शोकांतिका
एका आजोबाची शोकांतिका
शोकांतिकाही तीच ती
शोकही तोच तो
अंतही तोच तो
कारण सुखही तेच ते
आणि दुःखही तेच ते

मुळ कविता येथे ऐकता येइल.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

कविता माझीकवितामुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

20 Jan 2016 - 10:42 pm | पद्मावति

:(

पैसा's picture

22 Jan 2016 - 3:10 pm | पैसा

:(

पालीचा खंडोबा १'s picture

23 Jan 2016 - 10:37 pm | पालीचा खंडोबा १

मस्त