कविता माझी

एक कविता मनाची.......

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
22 Nov 2015 - 10:40 am

एक कविता मनाची
एक कविता जनाची
मना वाटते, राजा मी व्हावे
जन म्हणती, तू रंकचि रहावे-

एक कविता स्वप्नाची
एक कविता सत्याची
स्वप्न म्हणे, गगनात विहरावे
सत्य म्हणे, कदर्मी तू कुजावे -

एक कविता नात्याची
एक कविता जातीची
नाते म्हणे, आमचाच हां स्वकीय
जात म्हणे, कोण हां परकीय-

एक कविता प्रश्नाची
एक कविता क्षणाची
प्रश्न म्हणे,मी कधी संपणार नाही
क्षण म्हणे, मी कधी थांबणार नाही-

ही कविता जीवनाची
ही कविता मरणाची
जीवन म्हणे, ना मी कुणाची मालमत्ता
मरण म्हणे, इथे तर आहे माझीच सत्ता -

कविता माझीमुक्तक

गॅलरी .....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
21 Nov 2015 - 11:07 pm

एक हात कठड्यावर ठेऊन,
अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन,
मी उभा आहे गॅलरीत!

तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर
मन रमून गेले फार!
इथेच बसून नाही का लावत
तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला!

नाही.....वेडा नव्हतोच कधी
समंजस होतो खूप म्हणून
गॅलरी नाही ओलांडत
आजही!

मला नाही जमत लिहायला,
तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला!
इतकं जग पाहूनही
प्रेमबीम पण नाही कळत मला!

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताविराणीसांत्वनाकरुणकवितामुक्तकदेशांतरस्थिरचित्र

मी तुझा

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
18 Nov 2015 - 9:14 pm

या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।

रंग हे तारांगणीचे रंगले नयनी तुझ्या
छंद माझे गंध होऊन दंगले स्वप्नी तुझ्या
तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।

अंतरीचे ते चिरंतर स्वप्न तु जे पाहीले
तेच माझ्या या मनाच्या अंतरीही रंगले
तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा
सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।   

कविता माझीकविताप्रेमकाव्य

शौ(चौ) र्यनिखारे

मोगा's picture
मोगा in जे न देखे रवी...
11 Nov 2015 - 10:02 am

पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.

कविता माझीकाहीच्या काही कविताभावकवितामुक्त कवितावाङ्मयशेतीभयानकहास्यवीररसअद्भुतरससंगीतधर्मइतिहासवाङ्मयकवितामुक्तकविडंबनभाषाविनोदसमाजजीवनमानभूगोलराजकारणमौजमजा

तिथली दिवाळी.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 7:18 pm

तिथली दिवाळी.....

तीरकामठा रंगीत कागद
चिखलमाती अर्धा किल्ला....
शिवाजीच्या मावळ्यांहाती,
परत फराळ ठेवशील का?

पहाट झोपेत हळूच उठवून
घमघमणारी आंघोळ घालून,
फुलबाजांची हजार फुले
परत हातात ठेवशील का?

रांगोळीतील हुकले ठिपके
रेषांमधील नाजूक वळणे,
तुळशीमाईचे लगीन लटके
परत दणक्यात लावशील का?

किणकिण बांगड्या काचेच्या
घिरघीर झालरी पोरींच्या!
सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या
परत उडवण्या येशील का?

कविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुणसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानदेशांतर

अस्तनीतले पत्रनिखारे

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
5 Nov 2015 - 8:48 pm

याकुबने माझे पेपर चोरले त्याच वेळी
कलामांना गाडले जात होते
बातम्यांच्या ढिगात
पुस्तकातल्या जॉर्ज बर्नार्ड शॉला मी विचारलं
यांच्या लेखी कोण मोठा?
म्हणाला, आमच्यावेळी पत्रकर्त्यांना
सायकल अपघात आणि संस्कृतीचा र्‍हास
यात फरक करता येत नसे
आता तर सगळंच बिघडलंय
अगदी तुमच्या दत्ताचीही बरखा झाली
आता बातम्याच्या महापुरातून
कलामांचं कलेवर शोधून त्याला
पहिल्या पानावर मोठ्या टाईपात बसवणार तरी कोण?
मधेच टायगर गुरगुरला
बदला घेईन याचा
आणि अंत्यदर्शनाला जमलेल्या पंधरा हजार
हिरव्या, गोल टोप्या म्हणाल्या

कविता माझीकविता

नवकविता - ट्रॅफिक जॅम

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
5 Nov 2015 - 12:58 pm

नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D
विडंबन वगैरे समजू नये.
मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे
त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे.
प्लीज रिस्पेक्ट दॅट. इट्स ओरिजिनल.

नवकविता - ट्रॅफिक जॅम

उशीराच तरीही पुन्हा मी निघतो
त्या भयाण प्रवासासाठी
जणू फरफटत नेतं मला माझं नशीब
नशिबाचं काय म्हणा

नशीब त्याचंही असतं जो
खच्चकन चाकूचा वार केल्यासारखा
जातो...
जातो मला कट मारून...
आणि त्या मन गोठवणा-या थंडीत
रागाचा ज्वालामुखी मला चटके देतो...
आतून

कविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितावाङ्मयशेतीबिभत्सरौद्ररसकवितामुक्तकगझल

भय इथले संपत नाही.....

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जे न देखे रवी...
3 Nov 2015 - 11:02 pm

कोरड्याठण्ण विहिरीच्या तळाशी-
गर्द वडाच्या पारंब्याना लोंबकळते-
पडक्या वाड्याच्या ची-याची-यांतून-
काळ्याकपारीमध्ये दडलेले-
काहीतरी......

जे आहे फार प्राचीन
जे आहेदुष्ट क्रूर
अन वखवखलेले
ज्याचा आहे स्पर्श दाहक
ज्याचा विचारही भिववणारा

इथला आसमंत भारलेला
इथे कशाचीतरी हुकुमत
इथली शांताताही असहय
इथले आवाज तसेच भयानक
इथल्या सावल्या हलतात
इथली झाडे कुजबुजतात
इथले खडकही शहारतात

सततचे नाट्य इथले थांबत नाही
भय.....भय इथले संपत नाही.....

कविता माझीभयानककविता

कवितेवर केलेली कविता

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जे न देखे रवी...
2 Nov 2015 - 7:05 pm

*****कविता*****
कविता म्हणजे कवीजीवनाचे पहिले पान
कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान
कविता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतिबींब
कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंंब
कविता म्हणजे हरवत जाणारी वाट
कविता म्हणजे सुविचारांची पहाट
कविता म्हणजे तृणातील इवले फूल
कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल
कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा
कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा...
- निलम बुचडे.

कविता माझीकविता

तुझ्याशिवाय...

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जे न देखे रवी...
1 Nov 2015 - 6:16 pm

**तुझ्याशिवाय **

तुझ्याशिवाय ,
मन वेडे होऊनी झुलते,
उगीच का भरकटते!
स्वप्न-कळ्यांच्या उमलण्याची,
वाट पाहत बसते!!
सागरतीरी एकाकी,
का उदास होऊनी बसते!
खळखळणार्या लाटांच्या,
नादामध्ये विरते!!
स्वप्न असो वा सत्य,
मन तुजपाशीच रमते!
त्या ईश्वरचरणी रात्रंदिनी,
तुझी कामना करते!!
- निलम बुचडे.

कविता माझीप्रेम कविताकविता