माझ्या जिवनी कसला हा लपंडाव
कधी सुख सारे कधी दु:खाचे हे डाव
तुझे असणे नसणे ही वेड लावी मनाला
तुझ्या नसण्यात ही तुझे भास जिवाला
हे असले कसले धुके दाटले या मनी
सरले दिवस सारे उरल्या आठवणी
सारे असुन ही सलतो प्रीये तुझा अभाव
असा माझ्या जिवनी कसला हा लपंडाव..
श्वास जरी हा माझा त्यात मी न कधी दिसलेला
जीव हा माझा सारा फक्त तुझ्यातच गुंतलेला
मन फिरते तुझ्याच मागे कसे सांगांवे कुणाला
विसरून जावे म्हणता कसे आवरावे मनाला
धडपडते अन् सावरते साराच तुझा प्रभाव
असा माझ्या जिवनी कसला हा लपंडाव..
प्रतिक्रिया
5 Dec 2015 - 11:48 pm | एक एकटा एकटाच
छान आहे.
6 Dec 2015 - 7:48 pm | शार्दुल_हातोळकर
मस्त आहे !!