स्वप्नातल्या फुलांची स्वप्नात भेट झाली,
हलकेच पापणीला हळूवार जाग आली.
रातराणीचा गंध वेडावून गेला
मना जीवनाला नवा रंग आला
खुलावल्या कळ्यांना आशा नवी मिळाली
अन्
हलकेच पापणीला हळूवार जाग आली.
धुके हे अनामिक मनी साठलेले
स्वच्छंद स्वप्न हे उरी दाटलेले
ओलावल्या क्षणांना छेडून आस गेली
अन्
हलकेच पापणीला हळूवार जाग आली.
पहाट ही ओली सुखावून जाते
बावरे मन हे मग शहारून जाते
गोड त्या स्वप्नांनी मने भारावून गेली
अन्
हलकेच पापणीला हळूवार जाग आली.
प्रतिक्रिया
23 Nov 2015 - 8:28 pm | मांत्रिक
क्लासच्च!!!
लिखते रहो भौ!!!
23 Nov 2015 - 8:34 pm | माहीराज
_^_ धन्यवाद
23 Nov 2015 - 8:42 pm | मयुरMK
छान लिहिता तुम्ही
ह्या ओळी खुप आवडल्या
24 Nov 2015 - 11:39 pm | माहीराज
धन्यवाद