धर्मासाठी...........

एकप्रवासी's picture
एकप्रवासी in जे न देखे रवी...
8 Feb 2016 - 10:08 pm

धर्म जाणताना किती चुकामूक झाली
धर्माच्याच नावे किती कत्तले पाहिली

धर्मासाठी माणसा माणसात अंतरे
माणुसकीच्या नात्यांची उरली वेशीवर लक्तरे

धर्म सांगतो प्रेम घ्यावे वाटावे
प्रेमाचीच दुनिया सारी मर्म त्याचे जाणावे

महोत्सव धर्माचा भवती जरा थांबून पाहावे
निसंकोचपणे त्यातून चांगले ते घ्यावे

प्रेम वजा जगती अंती उरतेच काही
तिमिरातून तेजाची मग वाट भेटत नाही

कविता माझीधर्म

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

8 Feb 2016 - 10:33 pm | सतिश गावडे

कवितेतला भाबडेपणा आवडला.

मात्र खरंच जर तुम्ही जगातील विविध धर्मांचा खोलात जाऊन अभ्यास केलात तर या कवितेतील एकूण एक ओळ तुम्ही मागे घ्याल. अर्थात "धर्म चांगलेच सांगतो. माणसेच त्याचा चुकीचा अर्थ लावतात" अशी पळवाट शोधली नाहीत तर. ;)

राघव's picture

8 Feb 2016 - 11:04 pm | राघव

खरंच?

सतिश गावडे's picture

8 Feb 2016 - 11:16 pm | सतिश गावडे

उदाहरणादाखल सम्राट अशोकानंतर झालेला राजा पुष्यमित्र शुंग याचा इतिहास आणि Buddhist Warfare वाचा.

बरं.. बाकी धर्मांबद्दलची उदा. देखील वाचावी म्हणतो. कृपया द्यावेत.

भंकस बाबा's picture

8 Feb 2016 - 10:39 pm | भंकस बाबा

नक्की कोणत्या धर्माबद्दल बोलत आहात तुम्ही कविराज?

आपण विज्ञानवादी सगळे नवनवीन यंत्र कालानुरूप बदलत असतो ते अद्ययावत ठेवत असतो तसं आपण आपल्या धर्माबद्दल का अद्ययावतपणा ठेवत नाही, सभोवती मला धर्माचा महोस्तव आहे असं वाटत, त्यातून तुम्ही चागल्या गोष्टी घेयू शकता, शिकू शकता त्यासाठी आपल्याला संकुचित वृत्ती सोडावी लागेल अस मला मनापासून वाटत.

एकप्रवासी's picture

9 Feb 2016 - 12:24 am | एकप्रवासी

माणुसकीच्या धर्माबद्दल मी माझ मत मांडण्याचा प्रयत्न केलाय.

एकप्रवासी's picture

9 Feb 2016 - 12:25 am | एकप्रवासी

जगामध्ये सगळ्याच चांगल्या गोष्टी नाही आहेत मान्य पण ज्या थोड्या फार आहेत त्यांचा आपण आदर त्यांचं आचरण नक्कीच करू शकतो मित्रहो... तरी आपण उपस्थित केलेल्या शंकांबद्दल मी नक्कीच वाचन आणि त्यावर विचार करीन.

चेक आणि मेट's picture

9 Feb 2016 - 7:09 pm | चेक आणि मेट

निसंकोचपणे त्यातून चांगले ते घ्यावे

तेच तर कोणी घेत नाही ना!!!