प्रतीक्षा

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
29 Jan 2016 - 3:29 pm

निळ्याभोर उंच नभी
सावळे काळे विखुरलेले मेघ
त्याखाली अथांगशा धरणीवर
हिरवेगार एक छोटेसे शेत
-जसे माझे स्वप्नातील सुंदर जग-

शेताच्या मधूनच जाते लांबडी
पायवाट एक हिरवट तांबडी
एक रेषा जशी आडवी तिडवी
छेदीत त्या शेताला वाकडीतिकडी
-करीत जणू माझिया स्वप्नांचा भंग-

वात जिथे संपते तिथेच जवळ
खूण म्हणोन उभी एक बाभळ
फांदीवरी तिच्या कृमींची दाटण
विणुनी जाळी कोळ्यांनी चाळण
- सांगती जणू ते मन्मनीचीच गुंत-

त्या काटेरी बाभळीच्या काटेरी सावलीत
निर्जनशा दूर एकांतात .............
भोगतो आहे मी एक असह्य शिक्षा-
करतो आहे अखंड ......
फक्त तुझीच-
प्रतीक्षा.......!

कविता माझीमुक्तक

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

29 Jan 2016 - 3:33 pm | विजय पुरोहित

मस्त...

मयुरMK's picture

30 Jan 2016 - 10:31 am | मयुरMK

धन्यवाद