आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते,
स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते...
आपल्या "माँ" ची सेवा सोडून याले "राधे माँ" लागते,
फक्त "माँ" च काहून तर मग सोबत "बापू" पण लागते,
याचा डोक्यातले दही डोक्यातच कसे नासते,
स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते
आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते....
प्रेमिकेला प्रियकरापेक्षा आजकाल कांदा जास्त रडवते,
नाते संबंध आजकाल फक्त "Whats App" घडवते,
नोटांचा काल खंड गेला, आता खरेदी "card" वरच असते,
स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते
आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते....
नुसती माणसेच नाय तर Technology पण smart झाली,
"मन कि बात" करायला redio ची गरज आज आली,
"search Engine" पण आपली हुशारी कमालीची दाखवते,
सनी म्हंटले कि गावस्कर सोडून लेओने पहिले दाखवते,
आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते
स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते.......PK
प्रतिक्रिया
14 Feb 2016 - 10:53 pm | टवाळ कार्टा
जमलयं :)
16 Feb 2016 - 2:11 pm | विनायक पन्त
जबरदस्त...शानदार...झिन्दाबाद...
16 Feb 2016 - 2:19 pm | पैसा
:)