शहरातुन गावाकडे होणारा प्रवास
थेट भूतकाळात घेऊन जातो
आधूनिक वादळात हरवलेल्या मनाला
गावची जुनी ओळख करून देतो
खिडकीतून दिसणारी पळणारी झाडे
कुठे नदीचे किनारे
नारळ पोफळीच्या बागांत
स्वैर घोंगावणारे वारे
नटलेल्या हिरव्यागार शेतामध्ये
पिवळ्या फुलांची बहार
उंच उंच कड्याकपारीतून कोसळते
शुभ्र पाण्याची धार
दूर डोकावणारी कौलारू घर
त्यातून उठणारा स्वैपाकाच धूर
आजीच्या हातच्या जेवणाची
आठवण करून देते पुरेपूर
सौंदर्य निसर्गाचं न्याहाळताना
गाडी कधीच वेशीवर येउन थांबलेली
तरळून गेलं डोळ्यासमोरून जुनं गावं
जुनी नाती जुनी माणसं भेटलेली
आठवू लागलो क्षणभर डोळे मिटून
शेवटची भेट घरच्यांची अर्धवट राहिलेली
आली होती आजी वेशीपर्यंत निरोप द्यायला
पदराआड डोळ्यांची कडा भिजलेली
प्रतिक्रिया
20 Feb 2016 - 11:59 pm | चेक आणि मेट
>>तरळून गेलं डोळ्यासमोरून जुनं गावं
जुनी नाती जुनी माणसं भेटलेली
अगदी एक नंबरच
--(एक गावकरी)
21 Feb 2016 - 12:04 am | जव्हेरगंज
मस्तच!
21 Feb 2016 - 10:32 am | अमितसांगली
खुप आवडली.........
23 Feb 2016 - 1:39 pm | एक एकटा एकटाच
मस्त आहे
आवडली