जग हे मधुशाला
जग हे मधुशाला
कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला
ज्याची त्याला प्यारी बाटली
बाटली तले सखे सौंगडी
देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला
जो तो अपुल्या जागी लुडके
नजर न धावे चकण्या पलीकडे
गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला
कुणा न माहीत किती ढोसले ते
कोठुन आलो ते नच स्मरते
उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला
सुभानल्ला! माशाल्ला!
अकु लेखनाचा विजय असो
पेदाड
मजा आली वाचून
जब्रा :)