घोस्टहंटर-२
बावीस दिवसांपूर्वी!
एक तरुण रस्त्याने जात होता. त्याच्या शरीरावर अत्यंत उंची वस्त्रे होती.त्याने रस्त्यावरील एका टॅक्सीला हात दिला.
"मेरीओ हॉटेल!"
भरधाव वेगाने टॅक्सी निघाली.
मेरीओ हॉटेल ही लंडनमधील अत्यंत उंची हॉटेल म्हणून गणली जात असे. अनेक अभिनेते,उद्योजक,नेते,या हॉटेलमध्ये विचारविनिमय करत असत.जगातल्या सर्व सुखसोयी या हॉटेलमध्ये होत्या.
"हॅलो मि. ग्रेग!" तो तरुण म्हणाला.
ग्रेगने मान हलविली!
"मी काउंट मॉर्सेलिस. माफ करा मला थोडा उशीर झाला."
"इट्स ओके!" ग्रेग हसत म्हणाला.
कॉफी विदाऊट शुगर! मॉर्सेलिसने ऑर्डर दिली!