मिस करू नये असे टीवी कार्यक्रम
आपण रोज टीवी पाहतोच, त्यात बहुसंख्य भरणा हा निरर्थक सीरियल किंवा तद्दन हलक्या दर्जाचे रियलिटी शो वगैरे असतात.
पण ह्या सगळ्यांच्या मधे हिस्ट्री टीवी १८ किंवा नॅशनल जियोग्राफिक, डिस्कवरी वगैरे कधी कधी प्रसंगानुरूप प्रचंड उत्तम अन चांगले कार्यक्रम देतात, जागतिक उतरंडीमधे भारताची पोजीशन जशी थोड़ी थोड़ी बळकट होत जाते आहे तसे तसे २६ जानेवारी १५ ऑगस्ट वगैरे ला किंवा भारतीय सणवारांना किंवा मंगलयान प्रक्षेपण सारख्या इवेंट्स ना ह्या चॅनल वर डॉक्यूमेंट्री स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते हे मागच्या २ वर्षांपासुन दिसते आहे,