ती येणार म्हणून ......
पहिलाच प्रयत्न आहे .....
ती येणार म्हणून
मी फुलांचा गुच्छ केला
नवा पोशाख केला
अत्तराचा वास केला
नजरेचे करून बाण
तिच्या रस्त्यावर लावले
कल्पनाचे तन मनात वाढले"१"
दुसरं काहीच सुचत नव्हतं
माझं प्रेम फक्त तिच्यावर होतं
डोळ्यासमोर चेहरा
मनातले विचार फक्त तिचे होते "२"
चातका परी वाट पाहीली
पहिली घटका निघून गेली
पाण्याविना मासा
तळमळला जीव तसा"३"
वादळाने पाने गळावी
तशी स्वप्ने गळाली
तरी राहावत नव्हतं
तिथून जावत नव्हतं "४"