( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका
सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
राया तो माजा
भ्येटंल काय, न भ्येटंल काय,
वाट पहायाची आपली
पुरी तयारी हाय,
दैवाचीबी परीक्शा
घेइन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
जीवाचा सखा
गावंल काय, न गावंल काय,
समदं ह्या कपाळी
लिव्हल्यालं हाय,
नशिबासंगं आज
पैज लावीन म्हनते,
मी बी पिरेम करीन म्हनते...
