मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग ३, Columbus Circle

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
29 May 2016 - 7:12 am

मुळात आपल्याकडे सशक्त कथा, त्या कथेला न्याय देणारे कलाकार आणि त्या कलाकारांकडून कथेला साजेल असा अभिनय करून घेणारे दिग्दर्शक फार कमी.त्यातूनही "नायिकाप्रधान" सिनेमे फारच कमी, कधी-कधी एखादा "कहानी" किंवा "निरजा" (हा मात्र मी टॉकीज मध्ये बघीतला आणि ते पण टिमार्णी नावच्या गावांत.आमच्यासाठी खास शो होता.कारण प्रेक्षक म्हणून फक्त मी, माझी बायको आणि माझी बहीण, असे ३च जण.असो....)

नायिका प्रधान सिनेमे, नेहमीच वेग-वेगळ्या विषयांना हात घालतात.मग तो खामोशी असो किंवा मदर इंडिया किंवा मेमदिदी (https://www.youtube.com/watch?v=hVI7cLHX-Tk) आणि म्हणूनच मला तरी ते बघावेसे वाटतात.

असाच मग कधी-कधी जालावर शोध घेता-घेता, एखादा सिनेमा मिळतो देखील.हा (कोलंबस सर्कल) पण असाच मिळाला आणि लगेच बघून झाला.सिनेमा आवडल्या नंतर तो बायको बरोबर परत बघणे क्रमप्राप्तच होते आणि तिला पण तो आवडला.

काही काही सिनेमे दृश्यापासून पकड घेतात, तर काही काही थीम पासून, हा सिनेमा मात्र श्रेयनामावली पासूनच मनावर पकड घेतो तो सिनेमा संपल्यावर पण २-३ तास ती पकड काही सूटत नाही.

आता थोडक्यात सिनेमाची कथा...

============================================

अमेरिकेतलेच एक कोलंबस सर्कल नावाचे अपार्टमेंट.त्यात रहात असलेल्या एका वृद्ध महिलेचा अपघाती मृत्यू होतो.त्या वृद्ध महिलेच्या बाजूच्याच फ्लॅट मध्ये एक तरूणी (अ‍ॅबिगेल) रहात असते.गेली सुमारे २० वर्षे ती तरूणी घराबाहेर पडलेली नसते.

त्या मृत वृद्ध महिलेच्या जागेत भाड्याने रहायला एक जोडपे (लिलियन आणि चार्ली) येते.चार्ली एक दिवस दारू पिवून लिलियनला मारहाण करतो आणि तिचे रडणे ऐकून अ‍ॅबिगेल तिला आपल्या घरात घेते.

अ‍ॅबिगेल आणि लिलियनची मैत्री होते आणि लिलियनच्या मदतीने अ‍ॅबिगेल परत बाहेरच्या जगात पाय ठेवते.

===========================================

आता मुळात हा अतिशय साधा आणि सरळ सिनेमा आहे, पण लक्षात राहतो तो, सेलेमा ब्लेयर आणि अ‍ॅमी स्मार्टचा अभिनय.

विशेषतः सेलेमा ब्लेयरने वठवलेली "अ‍ॅबिगेल"ची भुमिका आणि अ‍ॅबिगेलचा "सुरवंट ते फुलपाखरू" असा होणारा प्रवास.

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

देशपांडे विनायक's picture

29 May 2016 - 10:21 am | देशपांडे विनायक

आज आनंदच आनंद आहे
१] मेम दिदी हाती आला
२] ipl
३] ipl match पाहण्यासाठी बोलावलेले सारे मित्र येणार
४] match पाहताना लागणारी पेये कालच आणून ठेवली त्यामुळे आज बाहेर जायचे कारण नाही
५] सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सात मिनिटांनी होणार आहे
मेम दिदी बद्दल धन्यवाद

महामाया's picture

29 May 2016 - 9:38 pm | महामाया

ललिता पवार, डेविड, जयंत वाला।

आणि ते पण टिमार्णी नावच्या गावांत.आमच्यासाठी खास शो होता.कारण प्रेक्षक म्हणून फक्त मी, माझी बायको आणि माझी बहीण, असे ३च जण.असो....)
ते शराबी त अमिताभ शोची सगळी तिकीटे विकत घेऊन घेतो त्याची आठवण झाली.
तुमचा साखर कारखाना वगैरे आहे का हो ?

बोका-ए-आझम's picture

29 May 2016 - 12:23 pm | बोका-ए-आझम

म्हणजे अँगर मॅनेजमेंट मधली? मग तर हा बघायलाच पाहिजे.

https://en.wikipedia.org/wiki/Anger_Management_(TV_series)

सिरियल बद्दल बोलत असाल तर, Dr. Kate Walesची भूमिका करणारी म्हणजेच सेलमा ब्लेयर.