सामान्य माणूस काही आंधळा नाही आहे, कि डोळे बंद करून कुणावर विश्वास ठेवणार. सामान्य माणसाचा जगण्याचा उद्देश्य असतो - सुखी संसार, स्वस्थ्य शरीर आणि भरपूर पैसा. दुसर्या शब्दात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी या तीन बाबी भौतिक जगात महत्वाच्या.
खान-पान, जीवनमान, व्यायाम इत्यादी बाबींचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतोच. स्वस्थ्य राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे कामे करावी लागतात. खाण्यापिण्या वर हि नियंत्रण ठेवावे लागते. हे जर जमले नाही तर मनुष्य आजारी पडतोच. एकदा आजार झाला कि दीर्घकाळ औषध-उपचार हि करावा लागतो, पथ्य हि पाळावे लागतात. भरपूर पैसा हि खर्च होतोच. योगाचे म्हणाल तर तो ही नियमितपणे दीर्घकाळ करावा लागतोच. बहुतेक लोकांना हे जमत नाही. त्यांना सौपा उपाय पाहिजे. मग जर कुणी झाड-फूंक, गंडा, ताबीज बांधून किंवा उपाय सांगून आजार बरा करत असेल तर साहजिकच आहे, लोक त्याच्या मागे धावणारच.
सुख प्रत्येकालाच हवे असते. चांगली बायको/नवरा, आज्ञाकारक मुले, घरा बाहेर हि नौकरी- धंद्यात सर्वकाही आपल्या मनासारखे घडावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. पण संसार म्हंटले कि समस्या या येतातच. मुलीचे लग्न ठरत नाही, मुलगा घर सोडून चालला जातो, बायकोचे प्रेम मिळत नाही. नौकरी धंद्यातल्या समस्या, राजनेता असेल तर विरोधकांचे षडयंत्र इत्यादी. कधी-कधी दुसर्याचे सुख पाहून हि माणूस दुखी होतो. आयुष्यातल्या समस्या स्वत: सोडवाव्या लागतात. त्या साठी कधी-कधी स्वत:ला बदलावे लागते. दुसर्यांना समजून घ्यावे लागते. योग्य मार्ग आणि योग्य दिशेने प्रयत्न करावे लागते. पण जर कुणी उपाय सांगणारा, ज्योतिषी किंवा तंत्र-मंत्र करणारा बंगाली तांत्रिक तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडविणार असेल तर साहजिकच आहे, तुम्ही त्याच्या मागे धावणारच.
पैसा हि सर्वांना पाहिजेच. पैसा कमविण्यासाठी कुठला तरी रोजगार, शेती इत्यादी करावीच लागते. त्या साठी ज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि अविरत परिश्रम हे करावेच लागते. आता जर कुणी पैश्यांचा पाऊस पाडणारा, लॉटरीचा आणि सट्ट्याचा अंक सांगणारा, गुप्त धनाचा ठाव ठिकण्याची माहिती देणारा इत्यादी भेटला तर मेहनत करायची काय गरज. घर बसल्या पैसा भेटेल. ज्योतिषी, तांत्रिक, बाबा लोक अश्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढ्तातच.
स्पष्टच आहे, बिना ज्ञान, परिश्रम करता, माणसाला सुख समृद्धी आणि स्वास्थ्य पाहिजे असेल तर तो सौपा शोधतो. ज्योतिषी, तांत्रिक, बंगाली बाबा इत्यादींचा नादी लागतो. शेवटी आपले सर्वस्व हरवून बसतो.
सौप्या भाषेत सांगायचे तर भौतिक संसारिक समस्यांचे समाधान अभौतिक रीतीने शोधणे म्हणजेच अंध विश्वास.
क्रमश:
प्रतिक्रिया
7 Jul 2016 - 1:37 pm | स्वीट टॉकर
तुम्ही 'अंधविश्वास' हा अगदी योग्य शब्दप्रयोग केलेला आहे. बहुतेक जण 'अंधश्रदधा' असा शब्दप्रयोग करतात ज्यामुळे त्यावरची चर्चा वेगळ्याच रस्त्यानी जाते.
7 Jul 2016 - 1:42 pm | कविता१९७८
छान सुरुवात
8 Jul 2016 - 12:58 am | सतिश गावडे
माझ्या एका मित्राने त्याने कुठेसे ऐकलेलं वाक्य मला ऐकवलं होतं: materialistic problems need materialistic solutions.
असे materialistic solution नाही सापडले की माणूस non materialistic solution शोधू लागतो. असा शोध घेता घेता एखादा गुरुत्वाकर्षण बलाचे पाश तोडून अवकाशात निसटतोही. बाकीचे असत्यालाच सत्य मानून त्याभोवती परिभ्रमण करत राहतात.
8 Jul 2016 - 9:28 am | विवेकपटाईत
इशोपनिषद मध्ये लिहिलेले आहे, अविद्याच्या ( भौतिक विद्या)मदतीने मृत्यू वर विजय प्राप्त होते. अर्थात भौतिक पदार्थांनी बनलेल्या शरीराला जागविण्यासाठी भौतिक पदार्थांची गरज असते. अन्यथा मृत्यू निश्चित. उदा. तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर पुरुषार्थ करावा लागेल किंवा दुसर्याला लुटावे लागेल. पण कुठली अंगठी घालून किंवा गंडा, ताबीज बांधून किंवा पूजापाठ करून पैसा मिळणार नाही उलट खर्चच होईल.
8 Jul 2016 - 4:56 pm | शरद
श्री.पटाईत यांनी ईशावास्योपनिषदातील "अविद्या" म्हणजे "भौतिक बिद्या" असे म्हटले आहे. ते पटत नाही. ईशावास्योपनिषदाचा काळ हा इ.स.पूर्व ६०० पूर्वीचा. त्याकाळी भौतिक विद्या" असे काही होते अशी परिस्थितीच नव्हती. धार्मिक ज्ञान व युद्धे सोडली तर समाजात काय होते ? व्यापार सोडा. त्यात भौतिकच काय कोणतीच धर्मबाह्य विद्या नव्हती. उरले काय ? लोहार, सुतार, विणकर, खनिजावर काम करणारे, शेती, गोपालन..... सगळे आपल्या वाडवडीलांकदून मिळालेल्या माहितीवर गुजराण करणारे. एखाद्याला चुकून काही नवीन सापडले तर ते हळुहळु इतरत्र पसरणार. भौतिक विद्या ? शून्य.
उपनिषदातील अविद्या म्हणजे यज्ञातील कर्मकांडे. अपराविद्या. कर्म करणारा मृत्यू टाळतो म्हणजे स्वर्ग मिळवतो. समन्वयवादी याज्ञवल्क्य कर्माला व ज्ञानाला दोहोंना महत्व देतात. गीतेतही तसे विचार मांडले आहेत. इतर उपनिषदे या कर्मकांडाला काडीमात्र किंमत देत नाहीत.
आजच्या काळातील विषयांवर लिहतांना ३००० वर्षांपूर्वीचे संदर्भ देतांना थोडी काळजी घेतली पाहिजे. (एक न मागितलेला सल्ला.)
शरद
11 Jul 2016 - 11:06 am | माहितगार
पटाईतजी नेमका श्लोक शब्दार्थांसहीत उधृत करावा ही विनंती.
8 Jul 2016 - 1:00 pm | शरद
सौप्या भाषेत सांगायचे तर भौतिक संसारिक समस्यांचे समाधान अभौतिक रीतीने शोधणे म्हणजेच अंध विश्वास.
इथे "समाधान" बरोबर वाटत नाही. समस्यांचे समाधान कसे काय शोधणार ? श्री गावडे म्हणतात त्याप्रमाणे solution, "समस्येचे उत्तर शोधणे" असे आपल्याला म्हणावयाचे आहे का ? यावर जास्त आपली लेखमाला
संपल्यावरच लिहीन.
शरद
8 Jul 2016 - 8:08 pm | बोलघेवडा
शरद साहेब तुम्ही म्हणता तसाच पटाईत साहेबाना म्हणायचं असाव. हिंदी प्रभावामुळे "समस्येच उत्तर" याला त्यांनी "समाधान म्हणाल असावं.
8 Jul 2016 - 8:12 pm | बोलघेवडा
पटाईत साहेब हे वाक्य फार आवडलं
9 Jul 2016 - 5:32 pm | विवेकपटाईत
शरद साहेब,ईशोपनिषदा वर अनेक लेखकांचे भाष्य मी किती तरी वेळा वाचले असेल. आपल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो.
अविद्या म्हणजे नष्ट होणारे ज्ञान. नष्ट काय होते जे भौतिक पदार्थांपासून बनते अर्थात वायू, जल, पाणी आणि माती.
माणसाचे भौतिक शरीर याच चार पदर्थान पासून बनलेले आहे. शरीरला जिवंत ठेवण्यासाठी याच चार पदार्थांची गरज असते. अन्यथा माणसाचे शरीर नष्ट होते. यालाच मृत्यू असे म्हंटलेले आहे. मृत्यूला दूर ठेवण्यासाठी 'भौतिक ज्ञानाची गरज असते.
विद्याचा अर्थ भौतिक पदार्थांच्या सहाय्याने ज्या ज्ञानाची ओळख पटू शकत नाही असे ज्ञान जेणे स्वत:ला जाणता येईल. म्हणूनच वेदांनी नेति नेति असे म्हंटले आहे.
बाकी लोहार, सुतार, विणकर, खनिजावर काम करणारे, शेती, गोपालन...याला भौतिक ज्ञान म्हणत नाही हे वाचून तुमचे ज्ञान किती अगाध आहे हे कळतेच. आपल्याच म्हणण्याच्या हिशोबाने पुढील ५० वर्षांनंतरची २०१६त विद्यमान लोकांचे भौतिक ज्ञान शून्य होते.
बाकी हिस्ट्री चेनल वर माणसांचा प्रवास हि मालिका बघितली असेल तर कळेल ५०,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून मानव भारतात आला. भारतातून त्याचा प्रवास ११०००० वर्षांपूर्वी बेरिंग जल्संधी (त्या वेळी बर्फानी आच्छादित होती) अमेरिकेत पोहचला. अमेरिकेत हि भारतीय लोकांना कधी कधी मेक्सिकन लोक तेथील नागरिक समजतात. तुम्ही अजूनही so called आर्यन सिद्धांतावर विश्वास ठेवतात असे वाटते. हे उपनिषद महाभारत कालीन आहे अर्थात ५००० वर्षांपूर्वीचे.
11 Jul 2016 - 10:46 am | माहितगार
व्यक्तिगत टिका इतर अनेक जण करतात, पटाईतांकडून असे सहसा होईल असे वाटत नाही पण इथे झालेले दिसते. पटाईत यावर विचार करतील असे वाटते.
11 Jul 2016 - 11:21 am | माहितगार
मी वर नेमका श्लोक आणि संदर्भासहीत अर्थाची विनंती केली आहेच.
नष्ट होणारे ज्ञान आणि नष्ट होणार्या गोष्टीचे ज्ञान यात फरक आहे का ? यातील आपल्याला नेमके कोणते म्हणावयाचे आहे ?
पण आजच्या विज्ञानाच्या कसोट्यांवर हे खुप अधिक सिंप्लीफीकेशन वाटत नाही का ? दुसरे वाक्यात जल आणि पाणी या एकाच अर्थाच्या शब्दांचा पुर्न उल्लेख झाला आहे तिथे आपल्याला काही वेगळा शब्द पाहिजे का ? (मृत्यूला दूर ठेवण्यासाठी 'भौतिक ज्ञानाची गरज असते. हे मान्यच. )
9 Jul 2016 - 6:10 pm | कंजूस
मृत्युची उकल कुणालाच झालेली नाही हेच सत्य आहे.भौतिक वगैरे या शब्दांच्या कोलांट्या उड्या मारून काहीच सिद्ध होणार नाही.सर्व प्रकारचे ज्ञान मिळो न मिळो मृत्यु अटळ आहे.
11 Jul 2016 - 10:43 am | माहितगार
"मृत्यु नंतर कायची उकल कुणालाच झालेली नाही हेच सत्य आहे"