हे ठिकाण

पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
14 Mar 2016 - 2:57 pm

।। जय शिवराय ।।

मित्र मैत्रिणीनो

येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती.

कट्ट्यावर:

१. सर्वांचा संक्षिप्त परिचय
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा
३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ
४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा
५. अनौपचारिक गप्पा
६. बालगंधर्व कलादालनास भेट

हे ठिकाणसद्भावना

१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
11 Mar 2016 - 7:37 am

"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत.

हे ठिकाणमांडणीवावरप्रकटनविचार

नाव सोनीबाई आणि ................

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 7:52 am

परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा -----

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतसल्लामाहितीसंदर्भचौकशीमदत

विश्वाचे आर्त - भाग २० - उत्क्रांतीचे पुरावे - भूस्तरीय अवशेष

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
2 Mar 2016 - 10:35 pm

1
.

हे ठिकाणविचार

क्रिकेट शौकीन ग्राहकाचा ग्राहक न्यायालयातील षटकार !

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 7:01 am

कसोटी सामन्यात फलंदाजाने एखादा टोलेजंग षटकार लगावल्यावर प्रेक्षक उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण एखादा क्रिकेट शौकीन चक्क ग्राहक न्यायालयात जाऊन षटकार ठोकतो त्यावेळी आपण सर्व ग्राहकांनीही त्याचं असंच भरघोस कौतुक करायला हवं. 

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचार

ते... (तेवीस वर्षांपूर्वी!) भाग-२

सटक's picture
सटक in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 9:57 pm

देगल्याच्या बापाला काळी विद्या वश होती!
जारण-मारण, मूठ-करणी, वशीकरण, भानामती, स्मशानविद्या...सगळे येत होते त्याला. हाताशी चार दोन पिशाच्चेही होती. सतत तांबारलेल्या डोळ्यानी आणि दारूचा दर्प असणार्‍या तोंडानी वावरणारा देगल्याचा बाप बगलुआईचा भक्त होता.

जागल्याच्या ताब्यात अख्खे रुसाळे होते!

हे ठिकाण

ते...

सटक's picture
सटक in जनातलं, मनातलं
23 Feb 2016 - 3:14 am

शेवटी तो गावी पोचला होता. बरोब्बर २३ वर्षांनी. त्याच्या मनातला ध्यास आता पूर्णत्वाकडे जाण्याची चिन्हे त्याला स्पष्ट दिसू लागली होती. तेरा वर्षात अफ्रिकेच्या जंगलातून त्याने जी विद्या घासून पुसून आणली तिच्या वापराने त्याचा सूड पूर्ण होणार होता.

हे ठिकाण

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
22 Feb 2016 - 9:33 am

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

हे ठिकाणधोरणसमाजजीवनमानप्रकटनविचारलेखबातमीअनुभवमाहितीसंदर्भमदत