मान्य आहे रे लोकानो की दिसतो तुम्हाला माझा पाच आकड़ी पगार
त्या पैशामुळेच वाढनारे वैभव नि हात जोडून उभी असलेली भौतिक सुखेही खुपतातच तुम्हाला
पण एकदा फक्त एकदाच त्यापलीकडे बघाल का हो तुम्ही
एक तारखेचा पगार फक्त ऑफिसची कामे हातावेगळी करून् नाही येत हो
त्याच बरोबर आम्ही हातावेगळे करून येतो आमचे लेकरु
कधी सोडून येतो त्याची ट्रिप तर कधी parents meeting
अगदी aanual dayच्या दिवशीही अगदी आपल्या डान्सला तरी आपली आई नक्की येईल ही आशा नि अगदी डान्स चालू असतानाही भर गर्दीत खुप parents मधे आपलिहि आई असेल नक्की ही लेकराचि आशा ही निराशेत बदलून टाकतो आम्ही
इतकेच कशाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही आईला बाय बाय करुन जाताना ..आता आई आज संध्याकाळी तरी वेळेवर घरी येईल का हे प्रश्नचिन्ह तिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतं
..तुम्हाला कधी दिसेल का ही व्यथा???
प्रतिक्रिया
18 Mar 2016 - 5:13 pm | चांदणे संदीप
दाटून कंठ येतो....
.
.
असे काहीसे झाले!
Sandy
22 Mar 2016 - 9:48 pm | एक एकटा एकटाच
टोचली