अॅनी हॉल: एका नात्याचा प्रवास
प्रौढ नायक अणि तितकीच प्रौढ नायिका टेनिस खेळायच्या निमित्याने भेटतात. मग त्यांच्या भेटी होत जातात. लगेच बेडरुमपर्यंत जातात. मग दोघे एकत्र राहायला लागतात. मधेच भांडणे होतात तेंव्हा रागावून काही काळ विभक्त होतात. दोघे एकमेकापासून दूर राहू शकत नाही म्हणून मग परत एकत्र येतात. आयुष्याच्या एका टप्प्यावर दोघांनाही जाणवते का आता आपले एकत्र राहणे शक्य नाही. परत विभक्त होण्याचा निर्णय घेतात, आता मात्र शांतपणे विचार करुन हा निर्णय घेतला असतो. तरीही तो तिच्याकडे येतो तिला सोबत चल म्हणतो. ती नाही म्हणते. मी आनंदी आहे असे सांगते. तो तुटतो. नंतर परत ती त्याच्या गावात जाते आणि चित्रपट संपतो.