दगडी चाळ

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
3 Oct 2015 - 11:05 am

मराठी चित्रपट - दगडी चाळ

"दगडी चाळ" या दोन शब्दांनी सगळ्यात आधी काय आठवते? तर मुंबईतला राजकारणी बनलेला डॉन अरुण गवळी अन त्याच्या कारवाया. कारण दगडी चाळ हा मुंबईतला भायखळा भागातला भाग हा त्याचा अड्डा किंवा घर होते कैक काळ. त्यामुळे दिग्दर्शकाने कितीही स्पष्ट पाटी दिली (सुरु होण्या आधी) तरी चित्रपटाच्या नावावरून आणि एका मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आणि बाकी डीटेल्स वरून प्रेक्षकांना काय तो अंदाज लागतोच.

दगडी चाळ आणि १९९६च्या आसपास असलेली तिथली मुंबईतली दहशत अन या दहशतीखाली फुलणारे प्रेम या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे दगडी चाळ.

अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे नायक व नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत आणि मकरंद देशपांडे हे डॅडी उर्फ अरुण गवळी च्या भूमिकेत आहेत.मकरंद देशपांडे यांनी अगदी अप्रतिम रित्या दगडी चाळ मधला डॉन डॅडी उभा केलेला आहे. त्यात राजकारणात घुसल्यामुळे कि काय पण अरुण गवळी च्या इमेजला धक्का न लावता त्याला थोडं उच्च पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अगदीच त्याचे निर्दोष असणे सिद्ध करणे हा हेतू नसला तरी त्याच्या प्रतिमेला उंचावणे हा हेतू आहे आणि मकरंदजी यात दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरेपूर उतरतात. पूजा सावंत हिच्या "सोनल" या भूमिकेचा उल्लेख करावाच लागेल कारण तिने उत्तम रित्या सगळी जबाबदारी निभावलेली आहे.
चंद्रकांत कणसे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. नवीन वाटताहेत कारण या आधी त्यांचे नाव मी तरी कधीच ऐकले नाही. त्यांचा हेतू अरुण गवळी यांची प्रतिमा उंचावणे अन जमल्यास प्रेक्षकांचे मनोरंजनहि करावे असा सीमित जाणवतो बर्याच प्रसंगात.

अमित राज यांचे संगीत चित्रपटाला असून अजय ताम्हाणे आणि प्रविण कमले यांची गीते आहेत. गाणे सगळे ठीक आहेत पण "धागा धागा" या हर्ष वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेल्या गाण्याचा उल्लेख हा करावाच लागेल कारण ते गाणे शब्दश: अप्रतिम आहे. पूजा सावंत जिचे त्या गाण्यातले सौंदर्य लक्षवेधक आहे.
मोरया मोरया हे सुरवातीचे गाणेही उत्तम असले तरी धागा धागा च्या सुरवातीच्या दोन ओळींचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर बर्याच ठिकाणी वापर आहे. कदाचित त्यामुळेच ते गाणे आपोआप लक्षात राहते प्रेक्षकांना.
मराठी सिनेमा अगदी डॉनची कहाणी वगेरे असला तरी "प्रेम" या कल्पनेपासून सुटलेला नाही. पण कहाणीत अजिबात टिकलेला नाही अभिनयाने तरला असला तरी मुळ कहाणीच ठिसूळ असल्यामुळे काय बोलणार? त्यामुळे मी या चित्रपटाला मला पूजा सावंत बेहद्द आवडते म्हणून केवळ तिच्या प्रयत्नासाठी १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

3 Oct 2015 - 11:23 am | तर्राट जोकर

अगदी सुमार चित्रपट परिक्षणः परिक्षणास ५ पैकी ०.५ गुण. टंकनश्रमासाठी.

माझा अपेक्षभंग झाला. दगडी चाळ व अरुण गवळी वगैरेंवर काही सत्यप्रसंगातुन दमदार कथा उभी केली असेल अशी आशा होती. फोल ठरली. निम्मा वेळ अतीशय रटाळ व अनावीन्यपुर्ण संथ प्रेमकथा बघण्यात अन उरलेला विशेष परिणामकारक नसलेली काल्पनीक कथा चघळण्यात संपता संपत नाहीये म्हणता म्हणता संपुन जातो.

सर्वांचाच तगडा अभिनय व उत्तम तांत्रीक सफाइदार चित्रीकरण हीच चित्रपटाची अतिशय जमेची बाजु बाकी सर्वंआनंदी आनंद. पण कलाकार आवडत असतील तर अवश्य वन टाइम वाच.

सत्याचे प्रयोग's picture

3 Oct 2015 - 4:37 pm | सत्याचे प्रयोग

आजच पाहून आलो एकदा पाहण्यासारखा मसालेदार सिनेमा आहे. मकरंद देशपांडेंनी हुबेहुब डॅडी रंगवलाय.
चुकीला माफी नाही.

समीर_happy go lucky's picture

3 Oct 2015 - 6:38 pm | समीर_happy go lucky

खर आहे, "जय शंभूनारायण" ;) मकरंद देशपांडे हा एक गुणी अभिनेता आहे, पण साउथ आणि रामगोपाल वर्मा कॅम्प मध्ये जाऊन वाया गेला माझ्या मते

पूजा सावंतचे डोळे आवडले. बाकी सिनेमा साहजिकच पाहणार नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Oct 2015 - 10:46 pm | निनाद मुक्काम प...

सध्याच्या काळात सर्वात चांगला कमानीय देह व फिटनेस माझा आहे असे एका मुलाखतीत सांगणार्या पुजाला अभिनयाच्या शेत्रात नाणे खणखणीत आहे हे दाखविण्याची संधी नुकतीच नीलकंठ मास्तर ह्या सिनेमात मिळाली.
ह्या सिनेमातील हे गाणे जुन्या काळातील वारा आला वारा ची आठवण करू देते

आवडते गाणे. त्यात ती खरच चांगली दिसलीये. तो सिनेमा जालावर आल्यास पहायचा आहे.

समीर_happy go lucky's picture

4 Oct 2015 - 9:55 am | समीर_happy go lucky

नीलकंठ मास्तर येउन गेला बहुतेक, झी मराठीवरही मागच्या महिन्यात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2015 - 6:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गाणं मस्तय. आता दगडी चाळ पूजा सावंतसाठी पाहणं आलं. :)

-दिलीप बिरुटे
(अजुन तरी सै च्या डोळ्याचाआणि गालाचा फ्यान असलेला)

मराठी मधे फक्त हीरो किंवा हीरोइन आवडली म्हणून पिक्चर ला ग्रेस मार्क्स देण्याची पद्धत सुरु झालीय का?