मराठी चित्रपट - "तू ही रे"

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
1 Oct 2015 - 7:48 pm

तू हि रे (मराठी)

मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक.

कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.

अभिनय:
मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.

दिग्दर्शन:
संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की.

संगीत आणि गीतकार:
मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे.
मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

परीक्षण छान छान मला मुळात सई आणि स्वप्निलजोशी हे कपल म्हणूनच आवडत नही तुमच परीक्षण वाचुन बघ्नेब्ल वाटतोय टीवी वर येईल तेव्हां बघू :)

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:01 pm | समीर_happy go lucky

^^^^^^^^^^^^
हीच मानसिकता आहे मराठी "फुकटात" बघण्याची, म्हणून मराठी चित्रपट टिकत नाही आणि सरकारला कायदा करावा लागतो कि "प्राइम टाईम" द्या म्हणून

तर्राट जोकर's picture

1 Oct 2015 - 11:18 pm | तर्राट जोकर

चॅनेलवरचा पिच्चर फुकटात पडतो असं कुणी सांगितलं काका?

कानाकोपर्‍यात घुसनारे टूथ्ब्रश, तिखटमिठापासून मिर्ची-कोथींबीरीपर्यंत कचकून भरलेल्या टूथ्पेस्ट, चार बाय चार चं बाथरूम हजार स्वेफूट राजेशाही बनव्ण्याचा दावा करणारी साबणं, कसले तरी वाय-झेड नावाचे अनाकलनीय व सायन्सच्या तिन्ही शाखांच्या हाती अजूनही न लागलेले विटामिन्स भरलेले शाम्पू, पोरांना युरिआ घातलेल्या रोपांसारखे दुप्पट वेगाने वाढवणारी बोर्न्विटा-कॉम्प्लॅन, आधीच घाण मिस्ळलेली सफेदीकिचम्कारवाली पावडरी, स्वस्त पेन, म्हाग पेन, पेन्सिल, दफ्तर, खायचं तेल, लावायचं तेल, दोनचाकी, चारचाकी, त्यांच्यात टाकायचे पेट्रोल-डीजेल,ऑईल, ते घ्यायल्या पैसे पुरवणार्‍या बँका, घोळात घेणारे इन्सुरन्सप्लान, टी.वी, फ्रीज, बॉडीस्प्रे नावाची बिन्कामाची धुराडं, वीजेच्या बीलानीच गार करणारा एसी, सतत हे विकत घ्या ते विकत घ्या करणार्‍या वेबसाईट्स, माण्साला कम्प्लीट येडा बनवणारी कापडं, दाढ्यांचे केस काढनारे निरनिराळ्या आकारचे फावडे, त्यासाठी भरपूर फेस आणणर्‍या क्रिमा, काळ्याम्हशीला लावाल तर तीचा कॉन्फीडन्स वाढून दहापट दूध देइल असा दावा करणार्‍या पांढर्‍या-प्रेमळ क्रिम्स, फर्निचर, घरं, ते (किंवा तुम्हाला) बनवनारी माणसं, त्याचे पेंट्स, त्याखाली पुट्टी, त्यावर फिनिशींग करणारे सेलेब्रिटी, त्यांची कमोडं, विमानं, परदेशी लोकांची चित्रात सुंदर दिसणारी अनाकलनीय पर्यटनस्थळं, ते फिरवून आनन्याचा दावा करणारी कित्येक हिम्द्केसरी, हे सर्व बघून डोकेदुखी होइल म्हणून काळजी करणारे औषध-उत्पादक, टीवी-बघुन-बघुन तुमचे कंबर-पाठ दुखून्ये म्हणुन लोशनं, लादीपुसायची लिक्वीडं, भांडीघासायची साबणं, फक्त ९५ हजारात गरज नसलेले गुडघे बदलून देणारी मानसाची ग्यारेजं, पोरांना डोक्याने आणि आइबापांना खिशाने हलकी करणारे गोळ्या-बिस्किटं-वेफरे, वायूभरलेली पेयं, स्टेट्स वाढल्याचा फील देनारी अमेरिकन वडापाव-भुर्जीपावची दुकानं, फुंकर मारली की धारावीचं स्वित्झर्लंड बनवणार्‍या गोळ्या, सनीताइच्याअनुभवानेसिद्ध छ्त्र्या...............................

इतकं सगळं घ्यायला लागतं तेव्हा कुठे तो तुमचा 'आयुष्यात दुसरं आता काहीच बघण्यासारखं राहीलं नाही'चा फील देणारा चित्रपट बघायला मिळतो.

तुम्हाला आम्हास फुक्टे म्हणुन हिणवण्यचा काहीच अधिकार नाही. थेटरात जाऊन तुम्ही फक्त मराठी चित्रपटवाल्यांना जगवता, आम्ही घरी बसून अक्ख्या देशाला जगवतो. आहात कुठं? आले मोठे आम्हाला फुकटे म्हणणारे.....

(अवांतरः ते तुमचं प्री़क्षन मधे कहानी मदे काहीच लिवलं नाय, अभ्यास वाडवा, शुभेच्हआ..)

समीर_happy go lucky's picture

2 Oct 2015 - 12:42 am | समीर_happy go lucky

हे जे वर लिहिलंय "वैयक्तिक मत" जाहिरातींबद्दल,ते सिद्ध करते कि चित्रपटामध्ये (ब्रेकमध्ये) येणाऱ्या जाहिराती या तुम्ही फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बघता आणि कपोलकल्पि "हे घेतलं तर असं ते घेतलं तर तसं" असली मनोराज्ये रचून आपल्याच मनाशी आपल्यात विचारसरणीचे समर्थन करून त्यातच रममाण होत राहता
विषयानुरूप: फुकटात बसून सगळी कहाणी वाचून सिनेमाबद्दल आपले जगमान्य मत (!!) काही लोकांना इतरांना सांगण्याची संधी देणे हा परीक्षणाचा हेतू कधीच नसतो तुम्हाला आधी परीक्षण म्हणजे काय या बेसिक अभ्यासाची गरज दिसते आहे त्यामुळे अभ्यास कमीत कमी थोडातरी सुरु करा

नया है वह's picture

2 Oct 2015 - 11:38 am | नया है वह

"तू ही रे" चांगला नसेल तर टी वी वर सुध्दा पाहणार नाही.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:04 pm | समीर_happy go lucky

सई ताम्हणकरला "बिकिनीवाली मराठी मुलगी" न समजता मराठी चित्रपट "सौ शशी देवधर" नक्की बघा, कदाचित एक अभिनेत्री म्हणून तुमचे मत बदलेल

धन्यवाद लगेच धावून आलात ,आता मल्टीप्लेक्स मध्य जाउन्न च पाहींन म्हणते माझ्यामुळे उगाच मराठी चित्रपटाच् नुक्सान नको

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2015 - 8:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तिकिटांचे फोटो पुरावे म्हणुन ग्राह्य धरले जातील. तसचं पॉपकॉर्नांचे बादली दिल्यास एखाद्या धाग्यावर मोफत बाजु घेउन मिळेल.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:10 pm | समीर_happy go lucky

च्यायला नाव नाव कुठून बदलायचं राव मी पा वर??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2015 - 8:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा किंवा प्रचेतस ह्या आयडींना व्यनि करुन काय नावं हवं आहे ते कळवा.

टिकिट परवडेल पॉपकॉर्न आवरा ;)ही गत आहे तू का म्हनुन्नी बाजू घेणार हम हम है बाकी पानी कम हैँ :प

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2015 - 8:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

महाभारतामधे साक्षात युधिष्टिराधी पांडवांना कृष्णाची आणि दुर्योधनाला मृत्युंजय कर्णाची गरज पडलेली. तुम किस झाड की पत्ती पे बैठा हुआ सुरवंट है?

तू कोण म्हणायचा नक्की पांडव का दुर्योधन? आता संपादक काठी घेऊन येतील त्या आधी पळते मी =)

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:07 pm | समीर_happy go lucky

हा टोमणा नसावा अशी आशा आहे आणि चित्रपट बघण्यासाठी हे कारण नको कारण एका तिकिटमुळे "न काही फायदा न काही नुकसान" मी फक्त खर काय ते मत सांगितल राग आला असेल तर सॉरी!!!

पियुशा's picture

1 Oct 2015 - 8:25 pm | पियुशा

समीर जी मला राग नै आला ओपन फोरम हाय म्हणुन शान आपुन आपल् मत मांडल इतकंच

आदूबाळ's picture

1 Oct 2015 - 8:12 pm | आदूबाळ

असंय होय! नावावरून मला ट्रान्सजेण्डर लोकांवर काढलेला सिनेमा वाटला.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:15 pm | समीर_happy go lucky

"ट्रान्सजेण्डर" म्हणजे काय??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2015 - 8:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ळॉळ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! _/\_

तो घोडा, ती शाळा ते मास्तर वाला विनोद आठवला.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:19 pm | समीर_happy go lucky

कस आहे ना "आरश्यासमोर" बसून कीबोर्ड बडवायची सवय नसल कि होते असं

प्यारे१'s picture

1 Oct 2015 - 8:17 pm | प्यारे१

मला आडनाव वाटलेलं...

तू हिरे.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:20 pm | समीर_happy go lucky

^^^^^^^^^^^^^^"तू" हे नाव वाटलं????
मुजरा !!!!!!!!!!!

प्यारे१'s picture

1 Oct 2015 - 8:22 pm | प्यारे१

तुकाराम हिरे.

जयश्री टी चालतंय, व्ही शांताराम चालतंय आणि तू हिरे चालत नाही होय?

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:24 pm | समीर_happy go lucky

हा हा हा हा हा हा हा हा हा

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:24 pm | समीर_happy go lucky

हा हा हा हा हा हा हा हा हा

प्रसाद गोडबोले's picture

1 Oct 2015 - 8:43 pm | प्रसाद गोडबोले

च्यायला

लग्न नवरा बायको पोरं सासु सासरा इतर नातेवाईक विवाहबाह्यप्रकरणं मुळूमुळु प्रेमकहाण्या इन जनरल मानवी नाते संबंधांची गुंतवणुक ह्या सार्‍यातुन मराठी चित्रपट सृष्टी कधी बाहेर पडणार ?
म्हणजे मानवी नाते संबंध हा एक पैलु असायला हरकत नाही पण त्या पलीकडेही जग आहे की हो !

एखादा मस्त युध्दपट बनवा की पानिपतावर किंव्वा नारळीकरांच्या अन इतरांच्याही इतक्या विज्ञान कथा आहेत त्यावर सायन्स फिक्स्न बनवा , नारायण धारपांच्या कथांवर भयपट बनवा किंव्वा गेलाबाजार चांगल्या दाक्षिणात्य चित्रपटांचे चांगले रीमेक करा , किंवा जरा जुने मराठी चित्रपट सिंहासन वगैरे सारखे काही तरी बनवा , ग्यँग्स ओफ वासएपुर सारखा एखादा गुन्हेगारीवरील चित्रपट बनवा , हॉलीवुड सारखे गॉडफादर , पल्प फिक्श्न , मेमेंटो , शॉश्यँक रीडेंम्पशन सारखे काही बनवायचा प्रयत्न तरी करा राव !!

कवितानागेश's picture

2 Oct 2015 - 5:37 pm | कवितानागेश

नॉशिया आलाय लग्न आणि प्रेम याबद्दलच्या नाटकांचा.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 8:47 pm | समीर_happy go lucky

^^^^^^^^^^^^
चायला घरी बसून टीव्हीवर कोणताही चित्रपट बघता बघता "चिंता करितो विश्वाची" हे एकमेव काम जमणार्या मराठी मानसिकतेला थेटरात आणणार कोण?? कि त्यासाठीही कायदा करायला पाहिजे तुमच्या मते??

पिशी अबोली's picture

1 Oct 2015 - 9:28 pm | पिशी अबोली

अगदी गोग्गोड आहे की म्हणजे हा.. सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचंच काम अगदी अत्युत्कृष्टच झालेलं दिसतंय.. उगाच बुवा कोर्टला ऑस्कर साठी पाठवायची घाई केली.. ;-)

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 9:50 pm | समीर_happy go lucky

ऑस्कर म्हणजे हायेस्ट पॉईण्ट का?? excellency चे ठोकताळे कोणते?? इंग्रजी सग्गळ सग्गळ उत्तम ही मानसिकता कधी सुटणार काय माहित!!!!!!!!!!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2015 - 10:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अलका कुबलने ज्या मराठीमधे थोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पिच्चर बनवले त्या भाषेतल्या चित्रपटांवरुन माझा विश्वास कधीचं उडालेला आहे.

ए रताळ्या म्हणणारे अनासपुरे साहेब, गलगले निघाले वाला भरत, पती सगळे उचापतीपासुन एकचं एक अ‍ॅक्टिंग करणारे चेतन दळवीसाहेब ह्यांचे चित्रपट पहायचं महान कार्य आम्ही चुकवलं त्याबद्दल क्षमा करा.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 10:37 pm | समीर_happy go lucky

शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी असे मराठीचे दोन प्रकार पडतात (practically हि शहरी लोकांनी यथेच्छ उडवलेली "ए रताळ्या" म्हणण्याची मकरंद अनासपुरेची पद्धत गरमीन भागात मी लोकपिय बघितलेली आहे, साधी सरळ विचार करण्यासारखी गोष्ट आहे, प्रतिसादाचा महापूर असणार्या मराठी चित्रपट दुनियेत, हा गाडी इतका टिकला कसा?? उत्तरापर्यंत पोचलात तर कदाचित विचार बदलतील.
आणि हो अलका कुबलचा एक काळ होता त्या काळात इतर कुणी ताकदीच नव्हत म्हणून ती चालून गेली. त्या ७-८ चित्रपटानमुळे सगळ्या मराठी चित्रपट सृष्टीवर टीका करणे हे चुकीचे आहे.

आणखी एक "गलगले" हि भारत जाधवच्या सही रे सही नाटका मधल्या चार मधली एक व्यक्तिरेखा. त्याबद्दल "उडवणे" या अनुषंगाने मतप्रदर्शित करण्याआधी फक्त एकदा " पुन्हा सही रे सही" बघाच......

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Oct 2015 - 10:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

समीर सर ते नाटक जवळपास पाठ आहे माझं. =))
मला मकरंद अनासपुरे किंवा इतर कोणावरही टिका करायची नाहिये. जो तोच तोचपणा नव्या लेबलाखाली मारायचा प्रयत्न चालु आहे त्याबद्दल आक्षेप आहे. केवळ अनुदान मिळतं म्हणुण चित्रपटातला चि पहिला का दुसरा हे माहित नसणारे लोकही यायला लागलेत त्याबद्दल आहे. कलावंत म्हणुन हे सगळे लोकं खंग्री आहेत ह्यात शंका नाही. =))

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 10:49 pm | समीर_happy go lucky

चुकीची समजूत आहे, मराठी चित्रपटांना मिळणारे अनुदान- एकूण खर्च - वितरण -प्रतिसाद - निर्मात्याचा फायदा/नुकसान या सगळ्या समजुतीवर आधारित कल्पना आहेत, त्याची खात्री नाही असती तर आज दर पंधरवड्याला एक चित्रपट झळकला असता. आज जी काही थोडी थोडकी मराठी चित्रपट सृष्टी टिकून आहे त्यात उल्लेखलेले लोक हे प्रमुख आहेत

पिशी अबोली's picture

1 Oct 2015 - 10:16 pm | पिशी अबोली

काही कळेना बुवा तुमच्या प्रतिसादातलं विंग्रजी..

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 10:38 pm | समीर_happy go lucky

बर...........

आयला, तु ही रे वरून आ ss रे ! तु ss रे ! झाले नाही म्हणजे मिळवले

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 10:40 pm | समीर_happy go lucky

विनोद?? काहीही जमला नाही !!!!!!!!

रेवती's picture

1 Oct 2015 - 10:30 pm | रेवती

स्वप्नील जोशीसारख्या अभिनेत्यासाठी चित्रपटगृहात जाण्याचा प्रश्न येतच नाही. जालावर येईल तेंव्हाच फुकट बघितला तर बघेन. तुम्ही पाच पैकी पाच चांदण्या देताय म्हणजे निदान झोप तरी येणार नाही अशी ग्यारेंटी आहे असे मानते. आत्ता त्याचा ट्रेलर बघितला व गांव की गोरी सई शहरात येऊन झक्क दिसतिये असे नोटीस केल्या गेले आहे. ;) ती अभिनेत्री म्हणून मला बरी वाटते. दुसर्‍या मुलीचे काम फक्त नांदीमध्येच बघितलेय.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 10:40 pm | समीर_happy go lucky

मी स्वप्नील जोशी किंवा सी ताम्हणकरचा आक्रमक चाहता वगेरे नाही, त्यामुळे तुमचे वैयक्तिक मत पटले

अस बघा काहिना काहीही आवाडु शकत आपल्याला रटाळ वाटनारे पिक्चर एखाद्याला सुप्पर वाटू शकतात किना सिचुएशन उलटी पण होते ज्याची त्याची आवड इत्यादि त्यामुळे लेख लिखनेका और मिपाको अर्पण करनेका ज्यादा सोचनेका नै खानेका पीनेका मस्त मस्त पिक्चर देखनेका और इधर कुछ दिलपे मत लेनेका वोक्के =)

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 11:01 pm | समीर_happy go lucky

बरोबरे पण मला ऑर्कुटची सवय आणि इथे आल्यावर मला ऑर्कुटवर परतल्यासारख वाटते आहे नथिन्ग ब्ट्बट्फिक बट आय लाइक्ड धिस ;)

यशोधरा's picture

3 Oct 2015 - 5:38 pm | यशोधरा

ऑर्कुट म्हटल्यावर मला मायबोलीवरच्या एका दे दणादण धागे पाड आयडीची आठवण झालेय!
कहीं, आप वोही तो नहीं?

अवांतरः नसूदेत, नसूदेत, नसूदेत रे बाप्पा!

पियुशा's picture

1 Oct 2015 - 11:03 pm | पियुशा

ब्ट्बट्फिक हे काय होत?

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 11:06 pm | समीर_happy go lucky

"स्पेसिफिक" इट वास टायपो

आदूबाळ's picture

1 Oct 2015 - 11:30 pm | आदूबाळ

बटबटीत + स्पेसिफिक चा मध्यमपदलोपी समास.

अजया's picture

2 Oct 2015 - 5:51 pm | अजया

महा लोल =))

कविता१९७८'s picture

1 Oct 2015 - 11:04 pm | कविता१९७८

मुळात सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी दोघेही आवडत नसल्याने चिञपट पाहीला जाणार नाही.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 11:08 pm | समीर_happy go lucky

आपण बघत नाही म्हणजे कुणीच बघणार नाही या समजुती मागे तर्क कोणता??

कविता१९७८'s picture

1 Oct 2015 - 11:10 pm | कविता१९७८

अहो भाउ, हा चिञपट माझ्याकडुन पाहीला जाणार नाही , बाकीच्यानी पाहायला हवा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्नय

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 11:12 pm | समीर_happy go lucky

मग यात खळबळजनक/नवीन/वेगळ अस काय?? हे निखळ सत्य आहे

कविता१९७८'s picture

1 Oct 2015 - 11:14 pm | कविता१९७८

अच्छा

प्यारे१'s picture

1 Oct 2015 - 11:11 pm | प्यारे१

समीर भौ, आणखी कुठल्या मराठी संस्थळावर आहात काय?

आपका कुंभ के मेले मे बिछडा हुआ एक भाई हमको दुसरे एक संस्थळ पे दिखा था.
वहा पे हम कधी कधी फक्त 'गुड मॉर्निंग मॅडम' कहने जाते थे!
-प्यार्टाकस.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 11:13 pm | समीर_happy go lucky

फेस्बुक

प्यारे१'s picture

1 Oct 2015 - 11:20 pm | प्यारे१

नवीन मराठी संस्थळ कळवल्याबद्दल आभारी आहोत.

समीर_happy go lucky's picture

1 Oct 2015 - 11:24 pm | समीर_happy go lucky

कुंभमेळ्यात बिछड्लेल्या भावांना मिळवणार्या स्पार्टाकस या ग्रीक महापुरुषासाठी एका मराठी संस्थळावर काही मदत करायला मिळणे हे माझ भाग्य हो, आभार कसले त्यात??

नया है वह's picture

2 Oct 2015 - 11:34 am | नया है वह

मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो

हे फक्त Bollywood ला लागु होतं

द-बाहुबली's picture

2 Oct 2015 - 11:44 am | द-बाहुबली

चित्रपट मनोरंजनासाठी असतो केवळ भाषा हा निकश डॉळ्यासमोर ठेवुन तो मी कधीच बघणार नाही, कुनेच बघत नाही त्यामुळे बेटर इट शुड बी अमेसिंग...

मृत्युन्जय's picture

2 Oct 2015 - 12:02 pm | मृत्युन्जय

स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी

तेजस्विनी पंडित आणि गिरीश ओक नवरा बायको दाखवले आहेत चित्रपटामध्ये???????????????????

गिरीश ओक म्हणजे गिरीजा ओक यांचे पिताश्री ना? गिरीजा ओक आणि तेजस्विनी पंडित यांच्या वयात फारसा फरक नसावा. जरठ - कुमारी विवाह दाखवला आहे का चित्रपटात?

समीर_happy go lucky's picture

2 Oct 2015 - 2:00 pm | समीर_happy go lucky

बाप-मुलगी एक असंही नातअसते घराघरात, कदाचित माहीतही असेल

प्यारे१'s picture

2 Oct 2015 - 2:05 pm | प्यारे१

वाक्य रचना योग्य असणं हेही महत्त्वाचं असतं मालक. त्या दोघांची मुलगी म्हणजे कुणाची मुलगी?
मृत्युंजय ने त्याबाबत विचारलं आहे. स्व जो स ता आणि त्या दोघांची मुलगी हवं ना? ते गिरिजा ओक आणि ज्येष्ठ कलाकार यांच्याबद्दल वाटतंय.
वाक्य पुन्हा वाचून नंतर चावा आपलं लिहा.

प्यारे१'s picture

2 Oct 2015 - 2:06 pm | प्यारे१

ते गिरीश ओक आणि तेजस्विनी पंडीत असं वाचा.

मृत्युन्जय's picture

3 Oct 2015 - 4:02 pm | मृत्युन्जय

काय बोलता. नात्यांची थोडीथोडी जाण आहे म्हणता तुम्हाला मग. जरा वाक्यरचना नीट करा की मग.

अभ्या..'s picture

2 Oct 2015 - 12:06 pm | अभ्या..

पकाऊ परिक्षण, खड्यासारखे लागणारे इंग्रजी शब्द, परिक्षणासाठी निवडलेला चुकीचा फॉर्म अन थोडी अकृत्रिम भाषा.

नाही आवडले.

नाखु's picture

2 Oct 2015 - 12:34 pm | नाखु

शांत हो

काही जण पटाईतपणे उत्पादनांची जाहीरात करतात काही जण सराईतपणे.

जर सिनेमा खरंच चांगला असेल तर परिक्षणा-सुचविण्याची गरज भासाणार नाही आणि नाहीतर त्याचा टाईमपास-२ आप्सूकच होईल.

अभामिपामांकासंचालीतभुस्काटसिनेमेलक्तरेलोळविण्संघाचे धोतरफेड्समीक्षण समीती सभासद.

समीर_happy go lucky's picture

2 Oct 2015 - 2:01 pm | समीर_happy go lucky

असो, वाचल्याबद्दल (बारकाईने) धन्यवाद

बोका-ए-आझम's picture

2 Oct 2015 - 12:09 pm | बोका-ए-आझम

मला त्यात एकूण तीन गोष्टी आवडल्या - सई, तेजस्विनी आणि द एन्डची पाटी. संजय जाधव मूळचे कॅमेरामन असल्यामुळे प्रत्येक फ्रेम चकाचक आणि ग्लाॅसी आहे पण कथेच्या नावाने बोंब आहेे. रच्याकने माझ्या मनात आलेला विचार - स्वप्निलची बायको तेजस्विनी दाखवून नंतर जर सई त्याच्या आयुष्यात येते अशी कथा असती तर चित्रपट वेगळ्याच वळणावर गेला असता आणि इंटरेस्टिंग झाला असता. बायको सर्वसामान्य आणि गर्लफ्रेंड बेब हा आता चावून चोथा झालेला प्लाॅट आहे. पण बायको बेब आणि गर्लफ्रेंड सर्वसामान्य असं अजून कुणीच केलेलं नाही.

भाते's picture

2 Oct 2015 - 12:31 pm | भाते

आपल्याच धाग्यावर प्रतिसादांची संख्या वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न. एकूण प्रतिसादातले निम्मे प्रतिसाद धागाकर्त्याचे आहेत. एरवी धागाकर्ता (गरज पडल्यास) एक-दोन वेळा प्रतिसाद देतो किंवा अनेक प्रतिक्रियांवर एकदाच सविस्तर प्रतिसाद देतो. इथे मात्र प्रत्येक प्रतिसादावर धागाकर्त्याची प्रतिक्रिया आहे.

आता स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांचा अभिनय(?) पहावत नसल्याने माझ्याकडुन पास. अगदी टिव्हीवर आला तरी पाहणार नाही.
दोन तासांच्या चित्रपटासाठी त्या एक तास जाहिराती कोण सहन करणार?

अभ्या..'s picture

2 Oct 2015 - 12:39 pm | अभ्या..

नाही रे भाते, ती ऑर्कुट लेखकूंची टिपिकल स्टाइल हाय, अशा प्रतिसादानी तिथे सुपरस्टार समजनारे पण रूपायाला तीन किलो आहेत. चेपूवर पण चालते तसे म्हणे.

समीर_happy go lucky's picture

2 Oct 2015 - 2:07 pm | समीर_happy go lucky

एखाद्या प्रतिक्रियेवर आपण सब-प्रतिक्रिया दिली तर ती हि प्रतिक्रिया म्हणून धरल्या जाते टोटल मध्ये इथे हे माहित नव्हत आत्ता समजल

अभ्या..'s picture

2 Oct 2015 - 2:12 pm | अभ्या..

आपण फक्त लेख अन त्यावर सबप्रतिक्रीया लिहिणे एवढेच करायचे नसते. इतर लोक पण लिहितात. त्यांना पण लेख वाचून प्रतिसाद द्यायचे असतात. इथे खूप जण खूप छान छान परिक्षणे लिहितात. त्यांची पण वाचने करावीत. फारेण्डरावांची किंवा समीरसूराची परिक्षणे समोर ठेवून इथे कुठल्याही परिक्षकाला जज केले जाईल इतकी चांगली असतात.
नंतर म्हणू नका म्हैत नव्हते. ;)

मधुरा देशपांडे's picture

2 Oct 2015 - 12:57 pm | मधुरा देशपांडे

तुमच्याच हिंदी चित्रपटाच्या परीक्षणाच्या धाग्यावर 'इथे कुणी मराठीत लिहित नाही का?' असे विचारले आणि त्यानंतर लगेच हा धागा आला. हा योगायोग आहे की लगेच 'आता लगेच लिहुयात मराठी चित्रपटाबद्दल पण' असे वाटुन हे लिहिले आहे? यापैकी दुसरे कारण असेल, तर इथे मिपावर उत्तमोत्तम चित्रपट परीक्षण आलेले आहेत, मराठी चित्रपटांचे सुद्धा. २-४ महिन्यात समजा आले नाहीच आणि, तर लगेच काही आभाळही कोसळत नाही. तेव्हा तुम्हाला मनापासुन जे वाटते ते लिहा, केवळ 'इथे हेही होते' असे दाखवायला म्हणुन नको.
हे परीक्षण केवळ मराठी चित्रपट म्हणुन गोग्गोड, कौतुकास्पद लिहिल्यासारखे वाटले. मराठी चित्रपटावर लिहिताना सतत 'मी मराठी' असे झालेच पाहिजे असे नाही, सतत त्यात बॉलीवुड, दाक्षिणात्य सिनेमे यांच्याशी तुलनाही होऊ नये. आणि लिहिताना मराठी लोक आणि चित्रपट याबद्दल बरेच सरसकटीकरण वाटले. लिहिताना इंग्रजी शब्द शक्यतोवर टाळा. शिवाय या चित्रपटाला वाईट म्हटले म्हणुन ते लोक मराठीचे शत्रु आहेत असेही समजु नका.

समीर_happy go lucky's picture

2 Oct 2015 - 2:08 pm | समीर_happy go lucky

ओके

अन्या दातार's picture

2 Oct 2015 - 3:18 pm | अन्या दातार

कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.

हे वाचून "परिच्छेदात कहाणी हुडका व मिसळपाव पार्टी जिंका" अशी नवी स्पर्धा सुचवतो. आदूबाळा, वाचतोयस ना?

तर्राट जोकर's picture

2 Oct 2015 - 8:00 pm | तर्राट जोकर

"कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही."

एकच नव्हे पाच पाच "कहाणी" आहेत. द्या पार्टी. चला लवकर...!

बोका-ए-आझम's picture

2 Oct 2015 - 5:08 pm | बोका-ए-आझम

मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.

समीरजी - वरचा जो परिच्छेद आहे त्यात बराच गोंधळ झालाय.स्वप्निल जोशी हे अभिनेत्याचं नाव आहे आणि सिद्धार्थ हे त्याच्या व्यक्तिरेखेचं म्हणजे अभिनेत्याचं नाव कंसाबाहेर आणि व्यक्तिरेखेचं कंसात. पण लगेच पुढे तुम्ही भैरवी भानुशाली(तेजस्विनी पंडित) असं लिहिलंय. काय समजायचं वाचकांनी?
बरं, हे सगळे आपापल्या भूमिकांमध्ये शोभून गेलेले आहेत - कसे? ते सांगा. का असं वाटतंय तुम्हाला? शेवटी जे तुम्हाला वाटतंय ते इतरांना सांगण्यासाठी लेख लिहिलाय ना तुम्ही?
अजून - नंदिनी ही एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. खेडवळ लग्न? ते असं पाहिजे - लग्न झाल्यावर शहरात गेलेली खेडवळ स्त्री.
अजून - अभिनयामुळे हा फरक manipulate होईल? establish हा शब्द तिथे बरोबर आहे असं वाटतं.

चुकीचे शब्द आणि वाक्यरचना असेल तर आपला आशय तर सोडा, मूळ मुद्दाही वाचकांपर्यंत पोहोचत नाही. आशयाबद्दल तर आधीही बोललो आहे. नुसतं सांगणं आणि त्याच्यामागचं तुम्हाला वाटणारं कारण उलगडून दाखवणं यात सरकारी ट्रॅव्हल गाईड आणि प्रवासवर्णन यात असतो तेवढा फरक नसेल तर लोक गाईडच वाचतील.

chetanlakhs's picture

3 Oct 2015 - 7:10 am | chetanlakhs

हे स्वप्निल जोशी साहेब ज्या दिवशी श्रीयुत शाहरुख़ खान साहेबांची नक्कल करणे बन्द करतील तो दिवस मराठी चित्रपटांसाठी एक सुन्दर दिवस असेल
त्याने आणि मुक्ताने "मंगलाष्टक वन्स मोर" मधे जो धुमाकूळ घातलाय तो बघुन "डोक्याला शॉट" बसलाय..

नीलमोहर's picture

3 Oct 2015 - 4:44 pm | नीलमोहर

स्वप्नील जोशींचे चित्रपट लोक पाहतात ???
तेही थिएटरला जाऊन ?????

दुनियादारी ने कोटिंच्या उड्या मारल्या की. त्यात स्वजो होता की!

नीलमोहर's picture

3 Oct 2015 - 5:38 pm | नीलमोहर

दुनियादारी.. स्टोरी, अंकुश चौधरी, जितू जोशी, उर्मिला कानेट्कर बाकी सर्वांमुळे चालला,
हे सगळे नसते तर काय राहिलं असतं पाहण्यासारखं - सई आणि स्वजो ??

तो कोणत्या अँगलने कॉलेज कुमार वाटत होता त्यात,
स्वजो होता म्हणून काहीच कोटींपर्यंत उड्या मारल्या, नाहीतर अजूनही कमवले असते.. :)

प्यारे१'s picture

3 Oct 2015 - 6:08 pm | प्यारे१

मे-हु-ना सारखा 10 वर्षांनी कॉलेज पूर्ण करायला आलेला तरुण असाच दिसतो. मूळ पेर्ना शारुख्खान ची असणार.

समीर_happy go lucky's picture

3 Oct 2015 - 6:31 pm | समीर_happy go lucky

असहमत, तो एक चांगला अभिनेता आहे, दुनियादारी मध्ये जे एक्स्प्रेशन तो फक्त डोळ्यांनी देतो ते बाकीच्यांना जमत नाही आणि शाहरूखशी त्याची बरोबरीच नाही !!!

बोका-ए-आझम's picture

3 Oct 2015 - 11:55 pm | बोका-ए-आझम

मग त्याने मुक्याचा रोल करावा. त्याने तोंड उघडलं की आम्हाला डोळे मिटावेसे वाटतात त्याचं काय?

प्यारे१'s picture

3 Oct 2015 - 11:59 pm | प्यारे१

अअं आय अंआय ओआ ए आअअ

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:05 am | टवाळ कार्टा

मांयया ओय =))

कॉमेडी एक्सप्रेस नावाच्या ई टीव्ही वरच्या कारेक्रमात आशीष पवार ह ची भाषा बोलायचा.
'हाय रे हक्या हाय हरतोय???' असं!
बाकी तुषार कपूर गोलमाल मध्येच बरा वाटतो...

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:30 am | टवाळ कार्टा

शेट्टी अण्णाचा गोलमाल परत बघ...समजेल मी काय लिहिले ते =))

प्यारे१'s picture

4 Oct 2015 - 12:47 am | प्यारे१

:)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2015 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

हल्ली जे मराठी चित्रपट धंद्याला-बसतात , त्यातलाच हा एक! नावानीच सुरवात होते अश्या सिनेमांची .
"तू ही रे" हे नावच मुळात हिन्दाळलेल...
साध्या सरळ मराठी गाण्यांमधे अचानक तीसरी लाइन हिन्दी येते तस....जातिवंत अभद्र!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:18 am | टवाळ कार्टा

चायला तुमी डायरेक धंद्यालाच लाव्ले =))
मी तवा
तू हिरे
आता "ती कडे" असाही येईल कदाचित

अद्द्या's picture

4 Oct 2015 - 9:33 am | अद्द्या

धंद्याला-बसतात

=]] =]]